Saturday, January 27, 2024

कण कण मे है राम...

Jan. 22, 2024 कण कण मे है राम...
राम हे फक्त नाव नाही, तर ती शौर्य, स्नेह, मर्यादा, उत्तमोत्तम, आत्मविश्वासाची अनुभूती, प्रेरणा, ऊर्जा आहे. आयोध्या नगरीत प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या आजच्या ऐतिहासिक दिनी संपूर्ण भारतभर जणू दिवाळी साजरी होत आहे. अवघा देश राम रंगी रंगला आहे. कणकण मे है राम.. ची प्रचिती यातून येत आहे. याचनिमित्त अकोल्यातील प्रख्यात व 155 वर्षांची परंपरा असलेल्या पुरातन श्री गोरक्षण संस्थेत प्रभू श्रीराम पूजनाचे सौभाग्य लाभले. प्रख्यात कथावाचक, आचार्य प. पु. डोंगरे महाराज स्थापित श्री व्यंकटेश्वराची आरती, गोपूजन केले. तुलादानाने गोखाद्य दिले गेले. यानिमित्त या परिसरात वावरताना एका वेगळ्याच अनामिक ऊर्जेची अनुभूती लाभली. योगायोग असा की, अकोल्यातील प्रख्यात समाजसेवी, दानशूर स्व. चिमनलालजी भरतिया व काळूरामजी रुहाटीया यांच्यासोबत युवावस्थेत काम करण्याची संधी मला लाभली होती. या दानशूरांच्या दातृत्वाच्या खुणा अकोल्यात ठायीठायी दिसतात. त्यांचीच पुढची पिढी गोरक्षण संस्थेची धुरा वाहत असून त्यांनी आज आठवणीने बोलावून हा सन्मान दिला.
गोरक्षणचे अध्यक्ष श्री दीपककुमारजी भरतिया, उपाध्यक्ष श्री महेशकुमारजी खंडेलवाल, सचिव श्री विजयकुमारजी जानी, विश्वस्त श्री श्रीप्रकाशजी रूहाटिया, श्री अंकुशजी भरतिया, सुदीपजी नैवेटिया, व्यवस्थापक मनीष विश्वकर्मा, समाजसेवी पुरुषोत्तम शिंदे, अमोल कडू,प्रवीण राउत,नितिन मोडक, प्रवीण काले, गजेंद्र कानकिरड़, जयेश अग्रवाल, मयूरजी सिंघानिया, गोविंदजी केडिया, सतीशजी पीम्पले, पंडित कैलाशनाथ मिश्रा आदि यावेळी उपस्थित होते. #KiranAgrawal #GorakshanAkola

No comments:

Post a Comment