Sunday, October 27, 2024

ती'चा गणपती...

Sept, 09, 2024 ती'चा गणपती...
पूजेचे ताट 'ती'च सजवते आणि पुरुषांच्या हाती देते, ही झाली नेहमीची परिपाठी. पण या 'ती'लाच 'श्रीं'च्या स्थापनेचा, पूजेचा व विसर्जनाचाही मान देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला तो लोकमत सखी मंचने; कारण 'ती' आहे शक्ती स्वरूपा. महिलांना त्यांचे स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी सौ. ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी स्थापन केलेला लोकमत सखी मंच म्हणजे महिलांच्या स्वयंसिद्धतेची एक चळवळच बनली आहे. या चळवळीला पुढे नेण्यासाठीच लोकमततर्फे खास 'ती'चा गणपती उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
जळगाव येथील स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या अंगणात यासाठी प्रतिदिनी माता भगिनींचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सोमवारी रांगोळीसह मोदक स्पर्धा पार पडल्या. नेहमीपेक्षा कितीतरी वेगवेगळे मोदक यावेळी बघावयास व चाखावयास मिळालेत. खासदार स्मिताताई वाघ व आमदार राजूमामा भोळे आदींच्या हस्ते सायंकाळची आरती करण्यात आली. ।। ..गणपती बाप्पा मोरया.. ।। #LokmatJalgaon #LokmatTichaGanpati #LokmatSakhiManch #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment