Sunday, October 27, 2024

स्तब्ध करून जाणारा नाट्यमय प्रवास !

Oct. 05, 2024 स्तब्ध करून जाणारा नाट्यमय प्रवास !
काही शब्द आणि रचना अशा असतात, की ज्या अस्वस्थ करून जातात. त्यातूनच अंतर्मुख व्हायला भाग पडते. असाच एक अनुभव आला तो आमच्या जळगावच्या अतिशय ताकदीच्या व संवेदनशील नाट्यकर्मी शंभूदादा पाटील यांच्या एका प्रयोगातून. **** इतिहास काळातील अपाला, मदर मेरी, हिपेशीया, रबिया, लैला, मैमून अशी स्त्री पात्रे, त्यांचे दु:ख, वेदना सांगत अश्रूंना वाट मोकळी करून देत पुढे सरकत जाणारा नाट्यमय प्रवास... अनेकांना स्तब्ध करून गेला. निमित्त होते, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (केसीई) संचलित कान्ह ललित कला केंद्र आयोजित आणि परिवर्तन निर्मित 'भिजकी वही' या कवी अरुण कोल्हटकर यांच्या कवितांवर आधारीत नाट्यमय सादरीकरणाचे आणि तेही नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या स्त्री सन्मानाच्या जागराच्या पार्श्वभूमीवर. **** खूप परिणामकारक असा हा प्रयोग आहे. त्यात सुदीप्ता सरकार, मंजुषा भिडे, सोनाली पाटील, जयश्री पाटील, मोना तडवी, अंजली पाटील, नेहा पवार व विकास वाघ यांनी खूप ताकदीने विविध पात्रे साकारली आहेत. कार्यक्रमाची संकल्पना हर्षदा कोल्हटकर यांची होती. दिग्दर्शक नारायण बाविस्कर, नेपथ्य मंगेश कुलकर्णी, प्रकाश योजना राहुल निंबाळकर, रंगमंचव्यवस्था गणेश सोनार, पवन भोई यांची होती. अर्थातच, सूत्रधार शंभू पाटील. ****
यानिमित्ताने 'केसीइ' सोसायटीच्या कॅम्पसमध्ये प्रथमच जाणे झाले. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे दादांनी स्वागत केले. शिक्षण क्षेत्र व अध्यात्मावर यावेळी त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील आदी यावेळी समवेत होते. Thanks Shambhudada... आपल्या आग्रहामुळेच हा योग घडून आला. #KiranAgrawal #BhijkiVahi #KCESocietyJalgaon

No comments:

Post a Comment