Sunday, October 27, 2024

लोकमत सखींचा रौप्य महोत्सव...

Oct. 18, 2024 लोकमत सखींचा रौप्य महोत्सव...
लोकमत सखी मंच बघता बघता रौप्य महोत्सवी वर्षाच्या टप्प्यावर पोहोचला. लोकमतच्या वाचक परिवारातील महिला भगिनींना त्यांची कार्यकुशलता व क्षमता सिद्ध करण्यासाठी स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देत श्रीमती ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी 'लोकमत सखी मंच'ची स्थापना केली. 'या मनातलं बोलूया..' अशी साद घालत आकारास आलेला हा मंच म्हणजे ज्योत्स्ना भाभीजींच्या सहृदय व संवेदनशील भावनेचा उत्कट असा प्रत्ययच आहे. जळगावमधील प्रख्यात समाजसेवी स्व. भिकमचंदजी जैन कुटुंबातील संस्काराचा वसा व वारसा लाभलेल्या ज्योत्स्ना भाभीजींनी वात्सल्य व करुणेचा हुंकार भरीत या मंचच्या माध्यमातून लाखो सखींच्या कलागुणांना वाव मिळवून दिला. आकाश कवेत घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ भरले.
आज 25व्या वर्षाच्या प्रारंभाच्या टप्प्यावर पोहोचताना संपूर्ण राज्यात तब्बल पाच लाखांहून अधिक सखी यात सहभागी झाल्या आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ करताना 'लोकमत सखी'च्या नवीन लोगोचे अनावरण जळगाव येथे एका शानदार समारंभात करण्यात आले. जळगाव हे ज्योत्स्ना भाभीजींचे माहेर. त्यामुळे या कार्यक्रमाला होती एक भावनिक किनार. भाभीजींच्या सहवास व सहृदयतेच्या आठवणी जागवत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. एरव्हीही 'लोकमत सखी'चा कार्यक्रम म्हटला की आनंद व उत्साहाचा खळखळता अविष्कारच अनुभवयास मिळतो. यातही तसेच झाले. बिग बॉसमधील स्पर्धक व विविध मालिकांमधील अभिनेत्री मीना जगन्नाथ हिची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळची काही सहभाग चित्रे... Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatSakhi #LokmatSakhiJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment