Sunday, October 27, 2024

लोकमत Political Icons of Khandesh 2024

Oct. 03, 2024 लोकमत Political Icons of Khandesh 2024
राजकारण हे आता 24 तास अखंडित सेवेचे क्षेत्र बनले आहे. नेतेपण सोपे राहिले नाही, कारण जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अशाही स्थितीत राजकीय वारसा लाभलेल्यांपासून ते नवोदितांपर्यंत अनेक जण विकासासाठी व समाजसेवेसाठी राजकारण म्हणून या क्षेत्रात करिअर घडवू पाहात आहेत. लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र सेनानी श्रद्धेय बाबूजी तथा जवाहरलालजी दर्डा यांच्या शिकवणुकीनुसार 'पत्रकारिता परमो धर्म' जपत पत्रकारिता करतानाच समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची भूमिका लोकमत व्यवस्थापनाने नेहमी घेतली आहे. याच भूमिकेतून खान्देशातील राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची पताका फडकविणाऱ्या मान्यवरांना जळगाव येथे विशेष समारंभात #लोकमतPoliticalIconsofKhandesh2024 ने गौरविण्यात आले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खा. स्मिता वाघ, आ. अमरीशभाई पटेल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खा. उल्हास पाटील, उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी समवेत होते. पॉलिटिकल आयकॉन्सच्या व्यक्ती चित्रणाचे कॉफीटेबल बुकही यावेळी प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगीची काही आनंद चित्रे... Kiran Agrawal
#KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent

No comments:

Post a Comment