Sunday, October 27, 2024

राज्यपाल महोदयांसोबतची भेट...

Sept 11, 2024 राज्यपाल महोदयांसोबतची भेट...
क्षेत्र कोणतेही असो, चाकोरीच्या पलीकडे जाऊन काम करणारी व्यक्तीच लक्षवेधी ठरून जात असते. यातच राज्यपाल महोदयांसारखी राज्याच्या प्रमुख पदावरील महनीय व्यक्ती असेल तर ती बाब खास ठरल्याशिवाय राहात नाही. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे दौरे करून प्रोटोकॉलच्या मर्यादा आड न येऊ देता विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला व त्यांच्या भावना, समस्या, अपेक्षा जाणून घेऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राज्याच्या घटनादत्त अधिकार पदावरील सर्वोच्च व्यक्ती आपल्या गावी येऊन आपल्याशी संवाद साधते, आपले म्हणणे ऐकून व समजून घेते ही बाब राजकारणेतर लोकांसाठी खूप समाधानाची तसेच आशादायी ठरते. मा. राज्यपालांच्या या दौऱ्यातूनही तेच घडले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जळगाव येथे आले असता काही संपादक व पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. विभागीय आयुक्त प्रवीण कुमार गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी समवेत होते. याप्रसंगीची ही आनंद चित्रे... #GovernorInJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment