Saturday, June 27, 2020

प्रयागराज कुंभातील पहिलं शाही स्नान अन् शाही मिरवणूक 2019




Prayagraj Kumbhmela.. 2019
Thet Alahabadetun... 

भुजबळांच्या प्रचारासाठी राज ठाकरे नाशिकला जाणार का? | Lok Sabha Election 2019 | Lokmat News


दिंडोरीत कुणाची पुण्याई कामी येणार, 'एटिं'ची की हरिभाऊंची? | Lok Sabha Election 2019 | Lokmat


Chief Minister Devendra Fadnavis यांच्या Maha Jandesh Yatra चे Nashik जोरदार स्वागत |


नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी  (दि. १८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. यावेळी भरपावसातही रोड शो आणि बाइक रॅलीच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान, मनसे व राष्टवादी तसेच छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर काळे फुगे सोडत तसेच फलक दाखवून विरोध नोंदविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा सायंकाळी नाशिकमध्ये पोहोचली. तेव्हा पाथर्डी फाटा येथे फडणवीस यांचे ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. पाच हजार दुचाकीस्वार भाजपचे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. पालकमंत्री गिरीश महाजन, महाराष्ट प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत मुख्यमंत्र्यांसमवेत रथावर आरूढ झाले होते.


Shiv Sena - NCP उमेदवाराला मदत करत आहे का ?


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

उत्तर महाराष्ट्राच्या निकालाने कोण झालं निरुत्तर? #LoksabhaResults2019 | Lokmat News


नाशिक जिल्ह्याचा कौल कुणाला?.. Loksabha Election 2019



नाशिक जिल्ह्याचा कौल कुणाला? नाशिक लोकसभा मतदार संघात हेमंत गोडसे आघाडीवर तर दिंडोरी मतदारसंघात डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली आहे. नाशिकमध्ये भुजबळांना ‘मनसे’ फॅक्टर कामी आला नाही. जाणून घेऊया......

Loksabha Election 2019.. Nashik District analysis..

Friday, June 26, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 25 June, 2020

CoronaVirus News : स्वनियमन टाळून स्वयंस्फूर्त बंद..

किरण अग्रवाल

संकटाला तोंड देण्यापेक्षा त्यापासून दूर पळणे हे सहज सोपे असते; परंतु ते तोंड लपवण्यासारखेही ठरते. कोरोनाच्या बाबतीत काही ठिकाणी आता तेच होताना दिसत आहे. सावधानता बाळगून व खबरदारी घेत या आपत्तीला सामोरे जाण्याऐवजी स्वयंस्फूर्ततेच्या नावाखाली बंद पुकारले जात आहेत. जागोजागची राजकीय मंडळी त्यासाठी पुढे सरसावलेली दिसत आहे, त्यामुळे सामान्यांचे जनजीवन पुन्हा अडचणीत येण्याची भीती व्यक्त होणे साधार ठरून गेले आहे.



कोरोनाचा कहर जागतिक पातळीवरच सुरू असल्याने आपण त्यात अपवाद ठरू नये. आपल्याकडेही म्हणजे भारतात कोरोनाबाधितांची संख्या सुमारे साडेचार लाखांवर पोहोचली आहे, अर्थात भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५६.३८ टक्के झाले आहे. शिवाय आतापर्यंत देशात ७० लाखांहून अधिक नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, पुढच्या काही दिवसात या तपासण्यांची संख्या प्रतिदिनी दोन लाखांपर्यंत नेण्याची शासनाची तयारी सुरू आहे, त्यामुळे जसजशा तपासण्या वाढतील त्याआधारे रुग्णांचे ट्रेसिंग होऊन या आपत्तीवर नियंत्रण मिळवणे सुलभ होणार आहे. आपल्या राज्याबद्दल बोलायचे तर जगात महाराष्ट्र १७व्या स्थानी आहे ही गंभीरच बाब आहे. महाराष्ट्रात बाधितांचा आकडा एक लाख ३५ हजारांच्या पुढे गेला असून, सहा हजारपेक्षा अधिक बळी कोरोनाने घेतले आहेत. बाधित व बळी या दोघांच्याही आकड्याच्या बाबतीत महाराष्ट्र चीन, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, बांगलादेश यांसारख्या काही देशांपेक्षा पुढे आहे, शिवाय राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर व नाशिक यासारख्या महानगरांमधील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे त्यामुळे चिंता वाटणे स्वाभाविक आहे. परंतु ७० हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचीही वस्तुस्थिती आहे. बरे, कोरोना हा काही जा म्हणता जाणारा नाही, तेव्हा घाबरून उपयोगाचे नाही तर सावधानता बाळगणे गरजेचे आहे. समाधानाची बाब म्हणजे अनेक ठिकाणी आता स्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढतच आहे तेथे स्थानिक नागरिकांकडूनच आता स्वयंस्फूर्तीने बंद पुकारले जाण्याचे प्रकार सुरू झाल्याने काही बाबतीत अडचणींना सामोरे जाणे क्रमप्राप्त ठरत आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या सोबतच यापुढील आयुष्याची किंवा जगण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे याबाबत विविध पातळ्यांवर अनेकांनी स्पष्टता केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आहे. प्रारंभीच्या काळात गरजेचा भाग म्हणून देशभर लॉकडाऊन केले गेले होते. या अडीच-तीन महिन्याच्या कालावधीत अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विशेषत: उद्योग-व्यवसाय पूर्णत: उन्मळून पडल्यागत झाले. सामान्यांची तर खूपच दैना झाली. हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे जे स्थलांतर घडून आले व त्यातून त्यांना ज्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले तेही संपूर्ण देशाने पाहिले; तेव्हा आता हळूहळू कुठे पूर्वपदावर येऊ लागलेली व्यवस्था व सावरू पाहात असलेल्या बाजारपेठा पुन्हा लॉकडाऊन करणे हे खचितच योग्य ठरणार नाही, परंतु शासन पुन्हा लॉकडाऊन करत नाही म्हणून जागोजागचे स्थानिक पुढारी पुढाकार घेऊन आपापला परिसर व गावे बंद करून त्याला स्वयंस्फूर्ततेचे नाव देण्याचा प्रकार करू लागल्याने सामान्य व विशेषत: मजूर वर्गाचे हाल होणे व त्यांनी घाबरून जाणे स्वाभाविक ठरले आहे. काही कालावधीसाठी बंद होणाºया या परिसरातील दुकानांवर पुन्हा रांगा लागणे, गर्दी उसळणे व त्यातून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याचे प्रकार घडू लागल्याने धोका कमी होण्याऐवजी तो वाढण्याचीच शक्यता आहे.




महत्त्वाचे म्हणजे, बंद हा काही कोरोनावरील कायमस्वरूपीचा उपाय नाही. परंतु गाव व गल्लीतील पुढारी आता आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी गाव व परिसर बंदचे प्रकार करू लागले आहेत. यात सामान्यांची अडचण होताना दिसत आहे, शिवाय गेल्या तीन महिन्यांपासून जे छोटे-मोठे व्यवसाय पूर्णत: उद्ध्वस्त झाले होते ते पूर्ववत सुरू होऊ पाहत असताना पुन्हा त्यांना हात धरून बसण्याची वेळ आली आहे. बंद करण्यापेक्षा सावधानता बाळगणे किंवा काळजी घेण्यासंबंधी आग्रह धरणे तसेच स्वनियमन गरजेचे आहे; पण येथे राजकारण डोकावताना दिसते. एरवी लॉकडाऊनच्या काळात परागंदा राहिलेले व उपाशीपोटी झोपणाऱ्यांच्या तोंडी घास भरवताना न दिसलेले अनेकजण आता पुढारक्या करताना दिसत आहेत. अपघात होतो म्हटल्यावर सावधानता बाळगण्याचे सोडून वाहन चालवणेच सोडून देण्यासारखा हा प्रकार ठरावा. खरे तर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत उगाच फिरणाºयांना व घोळकेबाजांना आता हटकले जात नाही, पोलीस यंत्रणा याबाबत हात वर करून वागत असल्याचे दिसते. जीवनावश्यक म्हणवणाºया वस्तूंचा साठा करू नका म्हणून केवळ इशारे दिले जातात; परंतु कारवाई होताना दिसत नाही. मास्क न वापरणाºयांवरही कारवाईचे इशारे दिले जातात, परंतु त्याचेही प्रमाण जुजबीच दिसते. अशा बाबतीत दखल घेतली जाणे गरजेचे आहे, परंतु त्याबाबत यंत्रणेला भाग न पाडता बंद पुकारण्याचे प्रकार वाढू लागले आहेत; त्यातून अर्थचक्राला धक्का देण्याबरोबरच अन्य समस्यांना आमंत्रण मिळून गेले तर आश्चर्य वाटायला नको. 

https://www.lokmat.com/editorial/editorial-view-spontaneous-shutdown-avoiding-self-regulation-over-corona-virus-a597/

Wednesday, June 24, 2020

विधानसभा निवडणूक 2019 ; Pls Vote




विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या निमित्ताने लोकशाहीचा उत्सव सोमवारी साजरा होत आहे. संविधानाने दिलेला लोकशाहीचा अधिकार सर्व मतदारांनी आवर्जून बजवावा, असे आवाहन 'लोकमत'तर्फे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले आहे.

Please Vote... लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी लोक'मत' गरजेचं! | Election 2019 | Lokmat News


लोकशाहीचा उत्सव... मतदान करुया...



मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव. चला, आपण सारे या उत्सवात सहभागी होऊया, मतदान करुया... लोक'मत'चे आवाहन.. Loksabha Election 2019 

आमदार निर्मला गावित यांनी बांधले शिवबंधन | Mumbai | Lokmat News


इगतपुरीच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूरातील नेत्या रश्मी बागल यांनी बुधवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव यांनी या दोघींना शिवबंधन बांधले.

Monday, June 22, 2020

Yoga with Shruti Kruti

दि  21 June, 2020· नाशिक  ·





असाही योगायोग... काल रात्री 12 नंतर जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा आजच्या फादर्स डे निमित्त पोरी लाडात आल्या, मी तीच संधी घेत आज पहाटे त्यांना जागतिक योग दिनानिमित्त घेतले सोबत.
एरव्ही सकाळी लवकर उठून काही करायचे म्हटले की नाकं मुरडतात, आज फादर्स डे असल्यानं माझं ऐकावं लागलं. उठल्या गपगुमान आणि केला योगा माझ्यासोबत. लोकमतमुळे घरच्या घरी ऑनस्क्रीन प्रख्यात योग तज्ज्ञ प्रज्ञा पाटील यांचे मार्गदर्शन उपलब्ध झालेच होते हे बरे झाले.
चला असाही योगायोग म्हणायचा ... !

#ShrutiKruti #LokmatYoga #KiranAgrawalYoga

#Saraunsh published in Lokmat on 21 June, 2020

Thursday, June 18, 2020

Shruti.. CA

January 17, 2018  ·



आमची श्रुती CA झाली...
माझी थोरली कन्या श्रुतिका आज सीए झाली.
हृदय भरून आलेय, डोळे चिंब आहेत, कारण माझ्या व्यापात मी तिच्याकडे लक्षच देऊ शकलो नव्हतो. इतर पालकांप्रमाणे ना कुठे तिच्या ऍडमिशनला गेलो, ना कॉलेज, क्लासेसला अथवा परीक्षेच्या काळात तिला कधी सोडायला गेलो. तिनेही पत्रकार बापाचा कधी कुठे उल्लेख न करता स्वतःच्या हिकमतीवर व परिश्रमाने हे यश मिळवले.
पालक म्हणून मी निश्चितच कमी पडतो, पण ती नेहमी माझ्या संभ्रमाच्या, अडचणीच्या व वेदनेच्या काळात मला बळ देत पाठीशी उभी राहते. 
Really I'm proud of her..
माझी कन्या, माझा अभिमान

#shruti

Kolhapurchya lekich krantikari paul...

12 जुलै, 2018  ·



'कोल्हापूरच्या लेकीचं क्रांतीकारक पाऊल'..

   सध्या बेटी बचाओ,बेटी पढाओ सारख्या घोषणांचा मनमुराद पाऊस पडतो आहे.अर्थात या घोषणा उर्जा देणा-या नक्कीच आहेत.परंतु एखादी परंपरा मोडून प्रागतिक विचार कृतीत आणणं, हे नक्कीच मोठं धाडस आहे.
     हिंदू समाजाच्या रचनेत विविध जाती समुह आपापले सोपस्कार पार पाडत आपलं धार्मिक अधिष्ठान जपतांना दिसताहेत.परंतु अगरवाल समाजातील एक गृहिणी जेव्हा पित्याच्या तिरडीला खांदा देते, चितेला मुखाग्नी देते व पाण्याने भरलेल्या मडक्यासह चितेला फेरी मारून ते मडकही फोडून घेते आणि जमलेला समुह निरोप घेतांना या रणरागीणीच्या धैर्याला नमस्कारही करतो! आश्चर्य आहे ना ?
     एका रचित कथेला शोभेल असा हा दुर्मिळ प्रसंग घडलाय समता विचाराचे प्रेरक क्रांतीकारी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरात. कोल्हापूरातल्या अगरवाल समाजातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. जेव्हा कुण्या महिलेने स्मशानात पाऊल ठेवले.एकीकडे पावसामुळे नदी नाल्यांना आलेले पाणी कवेत घेऊन पंचगंगा दुथडी भरून वाहात होती, तर दुसरीकडे याच पंचगंगातीरी लेकीकडून पितृ कर्तव्यपूर्तीचा अनुपम साक्षात्कार घडून येत होता. हाच तर आहे शाहू महाराजांचा संस्कार व त्यांचा आदर्श.
सौ.निलम अग्रवाल असं या धैर्यवान भगिनीचं नांव आहे ! कोल्हापूरच्या बझार गेट येथे माहेर असलेल्या निलमताई आमच्या नाशिकवासी आहेत,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. निलमताईंनी आपले वडिल कालकथित शंकरलालजी अग्रवाल यांची अंतिम श्वासापर्यंत आपल्या घरी, नाशिकला अविरत सेवा केली व आपल्या वडिलांची अखेरचे संस्कार आपल्या आप्तेष्ट व गोतावळ्याच्या गावगराड्यात करायची इच्छाही पूर्ण करीत  कोल्हापुरात पंचगंगेच्या तिरी स्वतः त्यांचेवर अंतिम संस्कार केलेत.
अर्थातच, निलमच्या या धाडसी निर्णयात तिच्या भगिनी डॉ अर्चना आशिष अग्रवाल (पिंपरी चिंचवड) व मनीषा अनिल मोहनका (हुबळी कर्नाटक) यांची सहमती खरी मोलाची ठरली. डॉ अर्चना व मनीषा यांच्या पाठबळामुळेच निलम हे करू शकली... कोल्हापुरातील काका श्री मुरारी अग्रवाल यांनी या प्रागतिक विचाराला बळ देत खंबीरपणे निलमच्या पाठीशी उभे राहून हे सारे प्रत्यक्षात घडवून आणले.  मोठे काका श्री ओमप्रकाश अग्रवाल, बंधू किशोर, विशाल, कुणाल आदि साऱ्यांचाही होकार लाभला. हुबळीतील बहीण स्वाती प्रत्येक क्षणी सावलीसारखी सोबतीला होती...
समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांवर सारेच ताशेरे ओढतात.परंतु आचरण आणि कृतीने  समाजाच्या साक्षीने निलमताई यांनी एक क्रांतीकारक आरंभ नक्कीच केला जो समाजपुढील आदर्श ठरावा !               
निलमताई आणि अगरवाल कुटुंबियांना सलाम।
           
- मनोहर अहिरे, गीताई फौऊंडेशन,नाशिक.           
मोबा. 9850556499

Man Udas udas...

7 नोव्हेंबर, 2018  ·





मन उदास उदास ... 
दीपोत्सवाचे दीप चहू दिशांना उजळून काढत असतांना ही काय उदासी, असा प्रश्न साऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. पण खरेच काहीसे रिकामे रिकामे वाटतेय, एक हुरहूर मनी दाटलीय... कारण आमची थोरली श्रुती यंदा घराबाहेर, पुण्यात आहे.
मी नोकरीस लागलो होतो तेव्हा दिवाळीला रजा मिळाली नाही म्हणून घरी जाऊ शकलो नव्हतो. त्यावेळी गावाकडे आनंदाच्या वातावरणातही बापाच्या डोळ्यात तरारलेलं पाणी आणि पूजेत आईच मन लागत नसल्याचं मोठ्या भावाने जेव्हा दाटल्या कंठाने सांगितलं होतं तेव्हा मी गलबलून गेलो होतो; तसंच काहीसं आज एक बाप म्हणून आई बापाची तळमळ काय असते ती स्वतः अनुभवतो आहे
22 वर्षातली, म्हणजे श्रुतीच्या जन्मानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे, ज्यात श्रुती सोबत नाही. CA झाल्याझाल्या ती पुण्यात जॉब ला गेली, अन सुटी मिळाली नाही म्हणून दिवाळीला येऊ शकलेली नाही. सायंकाळी लवकर ऑफिस आटोपून मावशी डॉ अर्चनाकडे गेली ती. तिथे एका ऐवजी दोन छोट्या भगिनी आहेत तिच्यासोबत. त्यात एकीचे नावच खुशी. मावशीची लाडकी असल्याने तेथे ती खुश असतेही. त्यामुळे वेळ निभावून जातोय तिचा, पण आमचं मन मात्र रेंगाळतय तिकडे.
दर वर्षी ती आमच्या लहानीला घेऊन असा दंगा करायची की विचारू नका. सकाळचे दोनेक तास तर पार्किंगमध्ये व दारात रांगोळी काढण्यात जायचे तिचे. मग दिवसभर तीच करायची पूजेची तयारी, कारण मी ऑफिसला जातो. सायंकाळी रेडिमेड दुकानदाराने दाखवावे तसे ढीगभर ड्रेसेस माझ्यासमोर आणून आदळायची व कोणता नेसू म्हणून विचारायची. अर्थात तिची ही लोकशाही प्रक्रिया राजकीय पक्षांसारखीच असते. विचारते मला, अन मी जे सांगेन त्यात काही तरी कमी काढून अखेर नेस बाई तुला आवडेल ते असे माझ्याचकडून वदवून घेते. बरे, आम्ही नवरा बायकोने कोणते कपडे घालायचे याचा अधिकारही तिचाच राहत आलाय आजवर. सारं सारं आठवतंय. तिचं घरभर नाचणं. म्हणूनच आज रिकामं रिकामं वाटतंय. अखेर आणखी वर्ष, दोन वर्षात तिला सासरी पाठवावे लागेलच ना, म्हणून आतापासून तशी मनाची तयारी करून ठेऊ अशी मनाची समजूत काढतोय. पण, मन काही लागत नाहीये... 
मुली या आयुष्याच्या पुस्तकातील कवितेसारख्या असतात हेच खरे. त्या अवती भवती असतात तेव्हा त्यांचं असणं जाणवत नाही, त्या जवळ नसल्या की मनात कालवा कालव होते. गद्यमय जीवनातली पद्याची, काव्याची पानं सुटून गेल्यासारखं होतं. आनंदाचा झरा वाहतोय खरा, पण त्या पाण्याच्या प्रवाहिपणातला अवखळ, रुणूझुणू नाद ऐकू येत नाहीये जणू. म्हणूनच दिवाळी सारख्या आनंदाच्या सणातही पोरगी सोबत नसल्याने मनात हुरहूर लागून आहे,
गर्दीत असूनही जणू एकटाच आहे...
अर्थात, धाकटी कृती तिची उणीव भासू न देण्याचा प्रयत्न करतेय खरी, पण बापाचं काळीज स्वस्थ बसू देत नाहीये. म्हणून मोबाईलच्या नादात वेदनेला लपवून ठेवायचा केविलवाणा प्रयत्न करतोय कधीपासून...
हे जे काही अक्षर रुपात उतरलं तेही त्यातूनच...
#shruti

Kruti .. 10th Passing

8 जून, 2019  ·



आज माझा गैरसमज दूर झाला ... 
खरे तर जे अनपेक्षितपणे मिळते त्याचा आनंद काही औरच असतो. आमच्या कृतीच्याही बाबतीत आज तेच घडून आले आहे. मी नेहमी अनुभवतो, की आमची थोरली श्रुती ही अभ्यासू तर छोटी कृती ही जरा अवखळ आहे. कृती अभ्यासाकडे लक्ष देताना फारशी दिसत नाही.  त्यामुळे तिचे टार्गेट हे फक्त 34 टक्‍क्‍यांपर्यंतच असते असे मी नेहमी म्हणे. हे 34 टक्के का तर ती कशीबशी 34 पर्यंत पोहोचली तर परीक्षक हाच विचार करून एक टक्‍क्‍यांसाठी कशाला नापास करावे म्हणून 35% करून तिला काठावरून ढकलून देईल असा माझा समज. परंतु तो कृतीने सपशेल चुकीचा ठरवला. दहावी मध्ये तिने चक्क 92.80 टक्के मार्क मिळवले त्यामुळे मी आज खूप खूश आहे.
शेवटी बापाची धारणा चुकीची ठरवणारी मुले लाभणे हेदेखील आनंदाचे व अभिमानाचेच नव्हे काय?

CA To Salon...

7 एप्रिल  2020· नाशिक  ·



CA टू Salon... वर्क ऍट होम ।
मुली या बापाच्या कशा सख्या, मैत्रिणी, जिवलग आणि काळजीवाहू सरकार असतात याचा प्रत्यय आज पुन्हा आला.
कोरोनामुळे सध्या सलून्स बंद असल्याने गेल्या काही दिवसांपासून माझी दाढी होऊ शकलेली नाही, बरे मला स्वतःला करता येण्यासारखी माझी दाढी नाही. त्यामुळे जरा अवतारच झालाय माझा. परिणामी सकाळी झोपेतून उठून आल्यावर कसा भुतासारखा दिसतोय म्हणून धाकल्या पोरीने माझी टर उडविली, स्वाभाविकच सौ.नी तीला दुजोरा दिला.
... हे बघून आमची थोरली श्रुती उठली.
सध्या कोरोनामुळे ती घरी आहे, वर्क फ्रॉम होम सुरू आहे तिचे.
तिने लगेच आजोबांची सलून किट शोधून काढली. शेजारच्या संजू काकांकडे जाऊन नवीन ब्लेड आणले, आणि गॅलरीत बसवून केली माझी दाढी..
आजवर सौ. कडून अधून मधून होणाऱ्या बिन पाण्याच्या दाढीचा अनुभव होता, पण आज चक्क सिए झालेल्या पोरीने दाढी सेट करून देत वेगळा आनंदानुभव दिला।
अकरावीत असताना पासूनची माझी दाढी, पण पहिल्यांदाच घरी व तीदेखील लेकीने केली.
आयुष्याच्या अर्धशतकोत्तर वाटचालीतील अनोखी दाढी. 
म्हटली तर तशी किरकोळ बाब, पण आयुष्यभर मनात रेंगाळणारा आनंद देणारी; म्हणून तिचे अप्रूप ...
या आनंदाची शिदोरी अव्याहत पुरेल
यामुळेच तर असतात पोरी बापाच्या लाडक्या ..!
Proud of u beta.. love you..!!
माझ्या मुली, माझा अभिमान।।।

#CoronaDiary  #ShrutikaAgrawal #LekLadki #lokmatfamilybesthain

Swami Kirananand..

9 एप्रिल 2020




जर बेरोजगारी ओढवलीच तर,
वाचक सेवेकडून भक्त सेवेत दाखल होणार...
भय् इंसान को निष्क्रिय बना देता है वत्स।
भय से मुक्त होकर अपना कर्तव्य करो,  जिओ जी भरके ।।
सत्य, अचूक व विश्वासार्ह माहितीसाठी लोकमत वाचत राहा
आपल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना घरी पेपर टाकण्यास सांगा ..
लॉकडाऊनच्या काळात वाचकांना वाचनानंद व गरजूंना 'किराणा'नंद द्या
- अग्र विभूती 8001 स्वामी किरणानंद
#lokmatfamilybesthain

Lokmatcha Kutumbkabila...

12 May, 2020




लोकमतचा कुटुंबकबिला ... 

कामाच्या ठिकाणी काम व कुटुंबाच्या बाबतीत अपार स्नेह, ही आमची कार्य संस्कृती आहे. श्रद्धेय बाबूजी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या पासून ते विद्यमान व्यवस्थापन, नेतृत्वकर्ते दर्डा कुटुंबीय यांनी दिलेला तो संस्कार आहे. त्याच स्नेहाने आमचे कुटुंबप्रमुख  लोकमतचे चेअरमन आदरणीय श्री विजय बाबूजी दर्डा तसेच एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी स्वतः सध्याच्या या कोरोनाच्या काळात आम्हा सर्वांचीच वेळोवेळी चौकशी करून काळजी घेत आहेत. लोकमत मधील परिवाराची भावना ही प्रत्येकाच्याच मनात अतिशय घट्टपणे रुजली आहे. अशात गेल्या दीडेक महिन्यापासून कुणी वर्क फ्रॉम होम करीत आहे तर काहींच्या भेटी होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आज मुद्दाम झूमच्या माध्यमातून नाशिकमधील सर्व संपादकीय सहकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसोबतही संवाद साधला. तांत्रिक अडचणींमुळे काही सहकारी जॉईन होऊ शकले नाहीत, मात्र त्यांची सहभागीता मनात होतीच। खरेच भरल्या कुटुंबाला असे ऑन स्क्रीन बघून मन भरून आले.
विशेषतः आम्ही सहकारी तर कामानिमित्त भेटतो अथवा बोलत असतो, परंतु सर्व सहकाऱ्यांच्या सहचरिणी व मुलांसोबत आज गप्पा झाल्या. एक वेगळा आनंद अनुभवयास मिळाला. या आनंद, समाधानातूनच तर लाभते आम्हास  ऊर्जा व तेच आमचे बळ.
हीच आमची फॅमिली ... लोकमत फॅमिली।
#LokmatNashik

Aaswe sampli.. Sanjuseth...

17 मे 2020 on Facebook




आसवे संपली, डोळेही रिते झाले ...

निर्व्याज्य स्नेहाच्या धाग्याने घट्ट विणलेली जी नाती असतात, ती रक्ताच्या नात्यापेक्षाही अतूट व अभिन्न अशी असतात. राजी- नाराजी, नफा- नुकसान आदी कसली जळमटे त्यात नसतात. असाच एक नातेवाईक मला लाभला होता, ज्याचे नाव संजय बैजनाथ अग्रवाल.
रविवार कारंजावर साधा नारळ विक्रीचा त्याचा व्यवसाय, पण संजू माझी सावली बनून गेला होता. म्हणूनच तर आम्ही दोघांनी मिळून ट्वीन होम बनवले, त्यानंतर आमचे संबंध अधिक गहिरे झाले. शर्मा क्वार्टरच्या कॉट बेसिस पासून ते आजपर्यंतच्या गेल्या 35 वर्षाहून अधिक काळाचा तो माझ्या सुख दुःखाचा केवळ साक्षीदारच नव्हे, तर साथीदारही राहिला.
तो एकाचवेळी अनेक भूमिकेत असायचा. कधी मित्र म्हणून मनातल्या गुजगोष्टी करायचा, कधी भाऊ म्हणून सल्लागाराची भूमिका निभवायचा. वडील गेल्यानंतर हक्काने मला दटावणारा कुणी राहिला नव्हता म्हटल्यावर तो वडीलकीच्या भूमिकेतून माझ्यावर रागवायचाही तर आईच्या मायेने कधी गोंजारायचाही. मला ऑफिसवरुन यायला उशीर होतो तर रात्रीच्या जेवणाचा डबा का नेत नाही म्हणून माझ्या बायको व आई, बापापेक्षा तो अधिकदा माझ्यावर संतापायचा. कधी कधी वाटे हा इतका काय हक्क गाजवतो माझ्यावर, पण त्याची सवय होऊन गेली होती आताशा. त्यामुळे एखादं दिवशी तो भेटला बोलला नाही तर चूक चुकल्यासारखे वाटे. त्याचे हास्य असे गडगडाटी होते की, तो हसल्यावर महाभारतातली पात्रे डोळ्यासमोर येई.
ऑफिसला निघताना 'शेट येतो' असा आवाज मी द्यायचा व त्याने दाराशी येऊन 'जास्त उशीर करू नका... ' म्हणून मला तंबी द्यायची, हा गेल्या कित्येक वर्षाचा परिपाठ होऊन गेलेला होता. अनेकदा अनेक मुद्द्यांवर आमचे पटत नसे, पण त्याने माझी सावली कधी सोडली नाही. आमचे मित्रत्व जाणारे अनेकजण म्हणत, एकवेळ दुनिया माझी साथ सोडेन, पण कितीही मतभिन्नता असली तरी संजू माझी पाठ सोडणार नाही.
म्हणूनच तो सर्वकाही होता माझ्यासाठी...
माझा पत्रकारितेचा पेशा व त्यातील व्यस्ततेमुळे माझे नेहमीच घराकडे दुर्लक्ष होत आले, पण किराणा भरण्यापासून भाजीपाला आणून देण्यापर्यंतही तोच लक्ष द्यायचा. माझ्या पोरींचे माझ्याहीपेक्षा अधिक लाड त्यानेच पुरविले. सख्खे म्हणवणारे व रक्ताच्या नात्याचेही हल्ली इतके कुणी करत नाही. अशात संजूसारख्याचे लाभणे खरेच भाग्याचे होते.
सध्याच्या लॉकडाऊनमूळे आज रविवारी त्याची कटिंग करून द्यायचे आमचे ठरले होते, पण तो काल शनिवारी अचानक धक्का देऊन निघून गेला अनंताच्या प्रवासाला...
मी उन्मळून पडल्यागत झालोय...
आसवांचे कुंभ रिते झालेय, पण त्या प्रत्येक अश्रूंच्या थेंबात तरळणारी संजूची प्रतिमा नजरेसमोरून हटत नाहीये...
जायचं तर प्रत्येकालाच आहे, पण इतक्याही लवकर जायचं नव्हतं हो शेठ...

#Sanjuseth #SanjayAgrawalNashik 

#EditorsView published in Online Lokmat on 18 June, 2020

CoronaVirus News: कोरोनामुळे शिक्षणाच्या आयचा घो..

किरण अग्रवाल

कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडत जनजीवन सुरळीत होऊ पाहत असले तरी कोरोनासोबतच जगताना काही बाबतीतले व्यवहार वर्तन कसे बदलावे लागेल याचा नेमका अंदाज बांधता येणो अजूनही मुश्कीलच असल्याचे दिसून येत आहे. अशा बाबतीत शिक्षणाचा विचार प्राधान्यक्रमाने करावा लागेल, कारण यासंदर्भात पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षणासारखे अनेक मुद्दे चर्चिले जात असले तरी शासन, शिक्षण संस्थाचालक व विद्यार्थी-पालक यांच्या दृष्टीने त्यातील व्यवहार्यता महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच अपूर्ण राहिलेल्या काही परीक्षा तसेच शाळा, महाविद्यालयांची पुढील वाटचाल यासंबंधाची संभ्रमाची स्थिती अद्याप टिकून आहे.



गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेली लॉकडाऊनची स्थिती आता संपुष्टात आली आहे. काही अटी शर्तीवर अनलॉक झाल्याने बाजारपेठा सुरू झाल्या आहेत, मोजक्या कर्मचा-यांच्या बळावर सरकारी-निमसरकारी कार्यालये सुरू झाली आहेत तसेच उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर उद्योग व्यवसायही सुरू करण्याचे प्र यत्न  दिसून येत आहेत. लग्नकार्य होऊ लागली आहेत, खरेदीसाठी तर झुंबड उडालेली पहावयास मिळत आहे. हळूहळू सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्ववत होताना दिसत आहे. कोरोनामुळे भयाचे सावट असले तरी, यापुढील काळात कोरोनासोबतच जगायचे आहे हे निश्चित असल्याने आता एकूणच चलनवलनाचा पुनश्च हरिओम होताना दिसत आहे; पण यात बाकी सारे सुरू झालेले दिसत असले तरी शिक्षण क्षेत्राच्या  बाबतीत विचार करता शाळा-महाविद्यालयांबाबतची स्थिती अजूनही संभ्रमाचीच असल्याचे दिसते. नेहमीप्रमाणे  15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे सांगितले गेले असले तरी या शाळा फक्त शिक्षकांसाठी व कर्मचा-यांसाठी सुरू झाल्या आहेत, विद्यार्थ्यां साठी अजूनही शाळेची घंटा वाजलेली नाही. ती केव्हा वाजेल याबाबतही आज स्पष्ट सांगता येत नाही. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावीच्या परीक्षांचे खोळंबलेले निकाल जुलैपर्यंत  लावण्याचा प्रयत्न  असल्याचे सांगून, पुढील अॅडमिशन ऑगस्टर्पयत सुरू केले जाण्याचे म्हटले आहे खरे; परंतु तेदेखील त्याच वेळेत होईल याची शाश्वती देता येणारी नाही.

विशेषत: शासनाकडून शाळा सुरू करण्याबाबतचा अट्टाहास केला जात असताना विद्यार्थ्यां च्या आरोग्याची जबाबदारीदेखील शाळांवर सोपविली गेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यां ना ज्ञानदान करायचे, की त्यांच्या आरोग्याची काळजी वाहायची असा प्रश्न शिक्षण संस्थाचालकांपुढे उपस्थित झाला आहे. कोरोनाच्या धास्तीतून फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत मुलांना एकमेकांपासून विलगीकरण अवस्थेत शाळेत बसवायचे तर तीच मोठी समस्या शिक्षकांसमोर राहणार आहे. बरे, शाळेत शिक्षक विद्यार्थ्यां वर कडक नजर ठेवतीलही, परंतु शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर हे विद्यार्थी त्यांच्या मित्रंसोबत एकत्र येतात व एकत्रपणे  घरी जातात त्या स्थितीत त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणी घ्यायची हा प्रश्न कायम राहील; शिवाय या विद्यार्थ्यां च्या आरोग्यासाठी सॅनिटायझरपासून त्यांची तापमोजणी करायची तर त्यासाठी जो खर्च येणार आहे तोदेखील शाळांनाच करावयाचा आहे. शासन तो खर्च देणार नाही व विद्यार्थ्यां कडूनदेखील फीमध्ये तो घ्यायचा नाही, मग कुणीही संस्थाचालक हा खर्च खिशातून किती दिवस करतील हा प्रश्नच आहे.



ऑनलाइन पर्यायाचा बोलबाला मोठय़ा प्रमाणात होत आहे. अलीकडचे काही शिक्षणतज्ज्ञ म्हणवणारे ऑनलाइनवर भर देताना दिसत आहेत; परंतु त्यात सामान्य कुटुंबातून येणा-या विद्यार्थ्यांना  ऑनलाइनचा पर्याय परवडणार आहे का याचा विचारच होताना दिसत नाही.  अशा विद्यार्थ्यां च्या साधन उपलब्धतेचे काय? एकीकडे लॉकडाऊनमुळे नोक-या गमावलेले व उत्पन्नास मुकलेले अनेक नागरिक आपल्या मोबाइलचे रिचार्ज करू शकत नसताना ते पालक आपल्या मुलांसाठी नवीन मोबाइल घेणे  कसे शक्य आहे?  इंटरनेट डाटाची उपलब्धता व त्याचा स्पीड यासारख्या बाबी आणखीनच वेगळ्या, तेव्हा या व्यावहारिक बाबींकडे लक्ष न देताच शाळा भरविण्याचे प्रयत्न  सुरू असल्याने शिक्षण संस्थाचालक व पालक या दोघांच्याही पातळीवर संभ्रमाची स्थिती वाढली आहे.

एकूणच कोरोनामुळे शिक्षणाच्या आयचा घो झाल्यासारखी स्थिती असली तरी ती बदलण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. प्राथमिक शिक्षण ते पदव्युत्तर म्हणजे केजी टू पीजी अशा वेगवेगळ्या अवस्थेतील विद्यार्थ्यां चे व शाळा-महाविद्यालयांचे आपले वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. यातून सुवर्णमध्य काढत पुढील दिशा ठरवावी लागणार आहे; पण ती ठरवताना जशा बाजारपेठा सुरू करून दिल्या तशा हातघाईने विचार करून चालणार नाही. त्यासाठी र्सवकष भूमिका घ्यावी लागेल. शिक्षण संस्थाचालकांपुढील अडचणी समजून घेतानाच विद्याथ्र्याच्या भविष्याचाही विचार प्राधान्याने करावा लागेल. उद्याच्या आव्हानांशी तोंड देणारे नागरिक घडवायचे तर त्या पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल, नसता कोरोनातील ग्रॅज्युएट असा शिक्का घेऊन फिरणा-यांकडे वेगळ्यादृष्टीने पाहिले गेले तर त्यातून वेगळेच प्रश्न निर्माण होऊ शकतील, तेव्हा हा विषय गांभीर्याने हाताळला जावयास हवा इतकेच या निमित्ताने. 

https://www.lokmat.com/editorial/coronavirus-education-system-badly-affected-due-covid-19-a584/

Thursday, June 11, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 11 June, 2020

संस्कारांच्या शिंपणाची संधी!

किरण अग्रवाल

सुहृदयता अथवा संवेदनशीलता या तशा व्यक्तिसापेक्ष बाबी आहेत. प्रत्येकातच त्या आढळतील असे नाही. जाणिवांशी तुमचे नाते किती व कसे आहे, यावर ते अवलंबून असते. स्वत:च्याच कोशात रममाण राहणाऱ्या स्वमग्न व्यक्तीचे व इतरांचा विचार करणाऱ्यांचे वर्तन यात भिन्नता आढळते ती त्यामुळे. पीड पराई जाणणारा जो असतो, तो सकल मनुष्य-प्राण्यांप्रति सारख्या ममत्वाने वागताना दिसून येतो, तर ज्याला दुसऱ्याच्या पिडेशी घेणे-देणे अगर सुख-दु:ख नसते असा मनुष्य प्रसंगी पशुत्वाची पातळी गाठतानाही बघावयास मिळतो. लॉकडाऊनमुळे दुसरीकडे अडकून पडलेल्या आपल्या पाळीव श्वानांसाठी खास विमानाचे तिकीट काढणारे एकीकडे असताना, अननसात स्फोटक भरून हत्तिणीचा जीव घेणारे दुसरीकडे आढळतात ते म्हणूनच. माणुसकीची व माणसातील हीनत्वाची चर्चा अशा प्रकरणांमुळे घडून येणे स्वाभाविक ठरते.



‘नरेचि केला हीन किती नर’ याची प्रचिती आणून देणाऱ्या घटना आपल्या अवतीभोवती नेहमीच घडत असतात. सध्याच्या ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन केल्या गेलेल्या काळातही अशा घटना कमी झालेल्या नाहीत. जिथे कौटुंबिक हिंसाचार वाढीस लागल्याची उदाहरणे आहेत तिथे प्राण्यांच्या छळाची काय कथा? केरळात गर्भवती हत्तिणीच्या मुखात स्फोटकाने भरलेला अननस कोंबून तिचा बळी घेतल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर व देशभरात याबद्दल संताप व्यक्त होत असताना तशाच निदर्यतेची आणखी काही प्रकरणे समोर आली. हिमाचलच्या विलासपूरमध्ये एका गायीलाही तशीच स्फोटके खायला दिली गेली तर दिल्ली येथे दुचाकीला बांधून एका श्वानाला रस्त्यावर फरफटत नेले गेल्याची घटना समोर आली. हे कमी म्हणून की काय, गुवाहाटी येथे एका मृत बिबट्या सोबत डान्स करणाऱ्या लोकांचा व्हिडीओ व्हायरल झालेला बघावयास मिळाला. या प्रकरणात बिबट्याची हत्या करताना त्याचे दात व नखेही काढली गेल्याचे आढळून आले आहे. बिबट्याचे हे प्रकरण शिकारीशी संबंधित असावे, अन्य जंगली प्राण्यांची शिकार करतानाही असेच ‘फंडे’ वापरले जातात. या शिकारींचे व त्यातले अर्थकारण हा एक वेगळा विषय आहे; परंतु संवेदनेच्या दृष्टीने विचार करता या सर्व घटनांमधील निर्दयता हृदय पिळवटून काढणारी आहे.

महत्त्वाचे म्हणजे, प्राण्यांच्या क्रूरतेने छळाची उदाहरणे एकीकडे समोर येत असतानाच दुसरीकडे त्यांच्याबद्दल जिव्हाळा प्रदर्शित होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये दिल्लीत अडकून पडलेले पाळीव श्वान व पक्षी मुंबईत आणून सोडण्याकरिता एक सहा आसनी प्रायव्हेट जेट बुक करण्यात आले आहे व संबंधितांनी लाखो रुपये खर्चून त्यात बुकिंगही केले आहे, तर बिहारमधील पटना जवळच्या दानापूर येथील अख्तर इमाम नामक एका व्यक्तीने आपली सगळी संपत्ती दोन हत्तींच्या नावावर केली आहे. या हत्तींनीच त्यांचा प्राण एकदा वाचवला होता म्हणे. घरोघरी श्वान व मांजरी पाळणाऱ्यांचा या प्राण्यांवर असलेला जीव एरव्हीही आपल्याला बघायला मिळतो. ग्रामीण भागातील शेती कामात महत्त्वाची भूमिका बजावणारा बैल मृत पावला तर त्या कुटुंबात व्यक्त होणारी हळहळ अनेकांनी अनुभवली आहे. पतंगाच्या मांजाने जायबंदी होणाऱ्या पक्ष्यांची सुश्रूषा करणारे पक्षिप्रेमी अनेक आहेत. प्राणिमित्रही कमी नाहीत. मुक्या प्राण्यांबद्दलची सुहृदयता तर त्यांच्याठायी आढळतेच, शिवाय त्यातून माणुसकी धर्माची जपणूकही घडून येते.

तात्पर्य, नाण्याला दोन बाजू असतात तसे हे आहे. प्राणी-पक्ष्यांचा छळ मांडून अघोरी आनंद घेऊ पाहणारे जसे आहेत, तसे त्यांच्यासाठी कळवळणारेही आहेत. व्यक्तिगणिक बदलणाऱ्या त्या त्या व्यक्तीच्या वृत्ती-प्रवृत्तीशी निगडित अशी ही कृती आहे. या वृत्तीचा संबंध संस्कारांशी असतो. रोजीरोटीसाठीच्या झगड्यात व जगण्याच्या रहाटगाडग्यात हे संस्काराचे वाण या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपविले जाणे म्हणूनच अत्यंतिक महत्त्वाचे आहे. पण हल्ली ते होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे. ‘कोरोना’ला रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ‘लॉकडॉऊन’च्या काळात सक्तीने घरी बसावे लागल्यानंतर किती कुटुंबात आजी-आजोबांनी किंवा आई-बाबांनी आपल्या पाल्यांवर असे संस्काराचे शिंपण केले, नीती अगर बोधकथा मुला-बाळांना ऐकवल्या; त्यासाठी साने गुरुजींच्या गोड गोष्टींची पुस्तके घरी विकत आणली, असे प्रश्न केले गेले तर समाधानकारक उत्तरे मिळून न येण्याचीच खात्री आहे. अशी पुस्तके घेण्याऐवजी या काळात मोबाइल खरेदी वाढल्याचेच आकडे समोर आले आहेत. यातून मोबाइल गेमिंगमध्येच ही भावी पिढी गुरफटल्याचे स्पष्ट व्हावे. कोरोनानेच पुढे आणलेल्या ‘व्हर्चुअल’ सिस्टीम्समधून आकारास येऊ पाहणारे हे आभासीपण मनुष्याला कुठे घेऊन जाणार कुणास ठाऊक ! 

https://www.lokmat.com/nashik/opportunity-sprinkle-sacraments-a607/

Friday, June 5, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 04 June, 2020

आपत्तीतून आलेले आपलेपण !

किरण अग्रवाल

आपत्ती ही केवळ नुकसानदायीच असते असे नाही, तर ती बरेच काही शिकवून जाणारीही असते. कोणताही मनुष्य त्याच्या धाडस व बेडरपणाच्या कितीही गप्पा मारीत असला तरी आपत्ती काळातच त्यातील या गुणवैशिष्ट्यांची परीक्षा होते, कारण एरव्ही इतरांना हितोपदेश करणे वेगळे आणि स्वत:ला बिकट प्रसंगातून जावे लागते तेव्हा त्यातून येणारा अनुभव अगर जागणारे आत्मभान वेगळे असते. हे भान बऱ्याचदा तात्कालिकतेच्या सीमेवरच अडखळते. आपत्तीचे स्वरूप कसे व किती आहे, यावर ते अवलंबून असते. परंतु छोट्याशा प्रसंगातूनही मोठा धडा घेण्याचा सुज्ञपणा ज्यांच्या ठायी असतो, ते आपत्तीतून लवकर सावरतात, शिवाय अशांना आलेले भान प्रासंगिक न राहाता सर्वकालीन जाणिवेची प्रगल्भता गाठते तेव्हा अंतरीचे झरे आपसूकच झरझर प्रवाहीत होतात. स्नेहाचे, प्रेमाचे, आपलेपणाचे पदर त्यातूनच ओलावतात. माणुसकी धर्म वेगळा काय असतो? कोरोनाच्या संकटकाळात व त्यानंतरच्या निसर्ग चक्रीवादळामुळे हा धर्म जागवणारे भान प्रत्ययास येत आहे हेच समाधानाचे म्हणता यावे.



संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच आता ‘निसर्ग’नामक चक्रीवादळाचे संकट राज्याच्या किनारपट्टीवर येऊन आदळले आहे. सुमारे दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाशी लढाई सुरू आहे. थेट जिवाशी गाठ घालणारा हा विषाणू असल्याने शासन-प्रशासन तर काळजी घेत आहेच; परंतु व्यक्तिगत पातळीवरही सुज्ञ असलेले सारेच जण स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेताना दिसत आहेत. सध्या कोरोनामुळे बहुतेकांना सक्तीचे रिकामपण लाभले आहे. रिकामपणात माणूस अधिक सोशल किंवा सामाजिक व सार्वजनिकही होतो असे म्हटले जाते. त्यानुसार हाती असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून सारेच जण एकमेकांच्या ख्याली-खुशालीची विचारपूस करीत खबरदारी घेण्याचे सल्ले देत आहेत. भलेही रिकामपणातला उद्योग याला म्हणता यावे; पण यानिमित्ताने का होईना इतरांबद्दलची आपुलकी जागल्याचा प्रत्यय येतो आहे, ते का कमी आहे? अगदी दिवाळी-दसºयाला शुभेच्छांची देवाण-घेवाण होत नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात ‘कोरोना’पासून बचावण्यासाठी संदेशाचे आदान-प्रदान होत आहे. दुस-याचे सुख हे द्वेषाचे-ईर्षेचे कारण भलेही ठरू शकते; परंतु दु:ख, संकटकालीन वेदना मात्र मनुष्याला जवळ आणतात, पाझर फोडतात; हेच खरे असल्याचे या निमित्ताने दृग्गोचर व्हावे.

कोरोनाच्या सोबत आलेल्या चक्रीवादळाच्या भीतीनेही अनेकांच्या संवेदना जागविल्या. कोकणच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकणार व तेथे नुकसान घडून येणार म्हटल्यावर त्या परिसरातील आप्तेष्ट, इष्ट-मित्रांचे मोबाइल नंबर्स शोधून शोधून व संपर्क करून त्यांना धीर दिला गेला. विस्मृतीत गेलेले अनेकांचे स्नेह-संबंध या आपत्तीच्या निमित्ताने पुन्हा नियमित व्हायला जणू संधी मिळून गेली. तेव्हा आपत्तीने घडून गेलेल्या किंवा येत असलेल्या नुकसानीचीच चर्चा करण्याऐवजी, हे जे काही परस्परांबद्दलचे ममत्त्व जागताना दिसत आहे; त्यातून नाते वा मित्रत्वाच्या संबंधाची वीण घट्ट होताना दिसत आहे ते अधिक महत्त्वाचे ठरावे. यानिमित्ताने या हृदयीचा त्या हृदयाशी होणारा संपर्क-सत्संग हा केवळ आपत्तीशी लढण्याचे बळ देणाराच नव्हे तर माणुसकी धर्माची पताका उंचावणाराही आहे. याच माणुसकी धर्माच्या जागरणासाठी आपले आयुष्य वेचून गेलेल्या सर्वच संत-महात्म्यांनी अश्रूंचेच मोल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्तीमुळे धीर खचत असला तरी, सहवेदना व सहयोगाच्या बळावर कोणतीही लढाई सहज जिंकता येते असे साधे सूत्र यामागे आहे. आज कोरोना असो की चक्रीवादळ, या आपत्तीच्या निमित्तानेही हेच सूत्र प्रत्येकाला उभारी देणारे व यशस्वीतेचा आशावाद जागवणारे ठरले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ही संकटे मनुष्याला आत्मवलोकनाची संधी देऊन जात आहेत. जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदाभेद न ठेवता संकटांनी सर्वांनाच ग्रासले आहे. सामान्य नागरिकांपासून बलाढ्य देशांच्या वरिष्ठाधिकाऱ्यांपर्यंत सा-यांना भीतीच्या छायेत आणून ठेवले आहे. जिवाची भीती ही केवळ स्वत:च्याच काळजीला नव्हे तर इतरांबद्दलच्या आपुलकीलाही प्रवृत्त करीत असते. शेवटी जाताना काय सोबत येणार, असाच विचार या भीतीतून डोकावल्याखेरीज राहात नाही. असे जेव्हा होते तेव्हा रागा-लोभाच्या भिंती ढासळून पडतात. शिक्षणातही न आलेले शहाणपण अशावेळी अध्यात्माच्या मार्गाने येते. दगडात देव दिसू लागतातच, परक्यातही आपलेपणा दिसू लागतो. निर्वैरत्व व निर्माेहीत्व जे काही असते, ते या स्थितीत प्रसवते. काम, क्रोध, मद, मोह-मत्सर या षड्रिपूंपासून सुटकेचीच ही अवस्था असते. एरव्हीच्या सामान्यपणे जगण्यात हे टाळता येणारे नसते. मात्र संकट जेव्हा घोंगावते तेव्हा सारे गळून पडते. प्रश्न इतकाच की, संकटात वा दु:खातच हे शहाणपण का सुचते? अर्थात संत कबिरांनीही तेच तर म्हटलेय, ‘दु:ख में सुमरिन सब करे, सुख में करे न कोय। जो सुख में सुमरिन करे, दु:ख काहे को होय!!

https://www.lokmat.com/editorial/yours-disaster-a642/