Thursday, June 18, 2020

CA To Salon...

7 एप्रिल  2020· नाशिक  ·



CA टू Salon... वर्क ऍट होम ।
मुली या बापाच्या कशा सख्या, मैत्रिणी, जिवलग आणि काळजीवाहू सरकार असतात याचा प्रत्यय आज पुन्हा आला.
कोरोनामुळे सध्या सलून्स बंद असल्याने गेल्या काही दिवसांपासून माझी दाढी होऊ शकलेली नाही, बरे मला स्वतःला करता येण्यासारखी माझी दाढी नाही. त्यामुळे जरा अवतारच झालाय माझा. परिणामी सकाळी झोपेतून उठून आल्यावर कसा भुतासारखा दिसतोय म्हणून धाकल्या पोरीने माझी टर उडविली, स्वाभाविकच सौ.नी तीला दुजोरा दिला.
... हे बघून आमची थोरली श्रुती उठली.
सध्या कोरोनामुळे ती घरी आहे, वर्क फ्रॉम होम सुरू आहे तिचे.
तिने लगेच आजोबांची सलून किट शोधून काढली. शेजारच्या संजू काकांकडे जाऊन नवीन ब्लेड आणले, आणि गॅलरीत बसवून केली माझी दाढी..
आजवर सौ. कडून अधून मधून होणाऱ्या बिन पाण्याच्या दाढीचा अनुभव होता, पण आज चक्क सिए झालेल्या पोरीने दाढी सेट करून देत वेगळा आनंदानुभव दिला।
अकरावीत असताना पासूनची माझी दाढी, पण पहिल्यांदाच घरी व तीदेखील लेकीने केली.
आयुष्याच्या अर्धशतकोत्तर वाटचालीतील अनोखी दाढी. 
म्हटली तर तशी किरकोळ बाब, पण आयुष्यभर मनात रेंगाळणारा आनंद देणारी; म्हणून तिचे अप्रूप ...
या आनंदाची शिदोरी अव्याहत पुरेल
यामुळेच तर असतात पोरी बापाच्या लाडक्या ..!
Proud of u beta.. love you..!!
माझ्या मुली, माझा अभिमान।।।

#CoronaDiary  #ShrutikaAgrawal #LekLadki #lokmatfamilybesthain

No comments:

Post a Comment