12 May, 2020
लोकमतचा कुटुंबकबिला ...
कामाच्या ठिकाणी काम व कुटुंबाच्या बाबतीत अपार स्नेह, ही आमची कार्य संस्कृती आहे. श्रद्धेय बाबूजी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या पासून ते विद्यमान व्यवस्थापन, नेतृत्वकर्ते दर्डा कुटुंबीय यांनी दिलेला तो संस्कार आहे. त्याच स्नेहाने आमचे कुटुंबप्रमुख लोकमतचे चेअरमन आदरणीय श्री विजय बाबूजी दर्डा तसेच एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी स्वतः सध्याच्या या कोरोनाच्या काळात आम्हा सर्वांचीच वेळोवेळी चौकशी करून काळजी घेत आहेत. लोकमत मधील परिवाराची भावना ही प्रत्येकाच्याच मनात अतिशय घट्टपणे रुजली आहे. अशात गेल्या दीडेक महिन्यापासून कुणी वर्क फ्रॉम होम करीत आहे तर काहींच्या भेटी होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आज मुद्दाम झूमच्या माध्यमातून नाशिकमधील सर्व संपादकीय सहकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसोबतही संवाद साधला. तांत्रिक अडचणींमुळे काही सहकारी जॉईन होऊ शकले नाहीत, मात्र त्यांची सहभागीता मनात होतीच। खरेच भरल्या कुटुंबाला असे ऑन स्क्रीन बघून मन भरून आले.
विशेषतः आम्ही सहकारी तर कामानिमित्त भेटतो अथवा बोलत असतो, परंतु सर्व सहकाऱ्यांच्या सहचरिणी व मुलांसोबत आज गप्पा झाल्या. एक वेगळा आनंद अनुभवयास मिळाला. या आनंद, समाधानातूनच तर लाभते आम्हास ऊर्जा व तेच आमचे बळ.
हीच आमची फॅमिली ... लोकमत फॅमिली।
#LokmatNashik

No comments:
Post a Comment