Saturday, June 27, 2020

Chief Minister Devendra Fadnavis यांच्या Maha Jandesh Yatra चे Nashik जोरदार स्वागत |


नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी  (दि. १८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. यावेळी भरपावसातही रोड शो आणि बाइक रॅलीच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान, मनसे व राष्टवादी तसेच छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर काळे फुगे सोडत तसेच फलक दाखवून विरोध नोंदविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा सायंकाळी नाशिकमध्ये पोहोचली. तेव्हा पाथर्डी फाटा येथे फडणवीस यांचे ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. पाच हजार दुचाकीस्वार भाजपचे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. पालकमंत्री गिरीश महाजन, महाराष्ट प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत मुख्यमंत्र्यांसमवेत रथावर आरूढ झाले होते.


No comments:

Post a Comment