7 नोव्हेंबर, 2018 ·
मन उदास उदास ...
दीपोत्सवाचे दीप चहू दिशांना उजळून काढत असतांना ही काय उदासी, असा प्रश्न साऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. पण खरेच काहीसे रिकामे रिकामे वाटतेय, एक हुरहूर मनी दाटलीय... कारण आमची थोरली श्रुती यंदा घराबाहेर, पुण्यात आहे.
मी नोकरीस लागलो होतो तेव्हा दिवाळीला रजा मिळाली नाही म्हणून घरी जाऊ शकलो नव्हतो. त्यावेळी गावाकडे आनंदाच्या वातावरणातही बापाच्या डोळ्यात तरारलेलं पाणी आणि पूजेत आईच मन लागत नसल्याचं मोठ्या भावाने जेव्हा दाटल्या कंठाने सांगितलं होतं तेव्हा मी गलबलून गेलो होतो; तसंच काहीसं आज एक बाप म्हणून आई बापाची तळमळ काय असते ती स्वतः अनुभवतो आहे
22 वर्षातली, म्हणजे श्रुतीच्या जन्मानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे, ज्यात श्रुती सोबत नाही. CA झाल्याझाल्या ती पुण्यात जॉब ला गेली, अन सुटी मिळाली नाही म्हणून दिवाळीला येऊ शकलेली नाही. सायंकाळी लवकर ऑफिस आटोपून मावशी डॉ अर्चनाकडे गेली ती. तिथे एका ऐवजी दोन छोट्या भगिनी आहेत तिच्यासोबत. त्यात एकीचे नावच खुशी. मावशीची लाडकी असल्याने तेथे ती खुश असतेही. त्यामुळे वेळ निभावून जातोय तिचा, पण आमचं मन मात्र रेंगाळतय तिकडे.
दर वर्षी ती आमच्या लहानीला घेऊन असा दंगा करायची की विचारू नका. सकाळचे दोनेक तास तर पार्किंगमध्ये व दारात रांगोळी काढण्यात जायचे तिचे. मग दिवसभर तीच करायची पूजेची तयारी, कारण मी ऑफिसला जातो. सायंकाळी रेडिमेड दुकानदाराने दाखवावे तसे ढीगभर ड्रेसेस माझ्यासमोर आणून आदळायची व कोणता नेसू म्हणून विचारायची. अर्थात तिची ही लोकशाही प्रक्रिया राजकीय पक्षांसारखीच असते. विचारते मला, अन मी जे सांगेन त्यात काही तरी कमी काढून अखेर नेस बाई तुला आवडेल ते असे माझ्याचकडून वदवून घेते. बरे, आम्ही नवरा बायकोने कोणते कपडे घालायचे याचा अधिकारही तिचाच राहत आलाय आजवर. सारं सारं आठवतंय. तिचं घरभर नाचणं. म्हणूनच आज रिकामं रिकामं वाटतंय. अखेर आणखी वर्ष, दोन वर्षात तिला सासरी पाठवावे लागेलच ना, म्हणून आतापासून तशी मनाची तयारी करून ठेऊ अशी मनाची समजूत काढतोय. पण, मन काही लागत नाहीये...
मुली या आयुष्याच्या पुस्तकातील कवितेसारख्या असतात हेच खरे. त्या अवती भवती असतात तेव्हा त्यांचं असणं जाणवत नाही, त्या जवळ नसल्या की मनात कालवा कालव होते. गद्यमय जीवनातली पद्याची, काव्याची पानं सुटून गेल्यासारखं होतं. आनंदाचा झरा वाहतोय खरा, पण त्या पाण्याच्या प्रवाहिपणातला अवखळ, रुणूझुणू नाद ऐकू येत नाहीये जणू. म्हणूनच दिवाळी सारख्या आनंदाच्या सणातही पोरगी सोबत नसल्याने मनात हुरहूर लागून आहे,
गर्दीत असूनही जणू एकटाच आहे...
अर्थात, धाकटी कृती तिची उणीव भासू न देण्याचा प्रयत्न करतेय खरी, पण बापाचं काळीज स्वस्थ बसू देत नाहीये. म्हणून मोबाईलच्या नादात वेदनेला लपवून ठेवायचा केविलवाणा प्रयत्न करतोय कधीपासून...
हे जे काही अक्षर रुपात उतरलं तेही त्यातूनच...
#shruti

No comments:
Post a Comment