At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, February 28, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Feb 27, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220227_2_2&fbclid=IwAR3Hlo4bNV8-FRob12i6lxtVMjG2FoD6589yEcrk_COABpMJu9VUNIPKN0o
https://www.lokmat.com/editorial/issue-of-maintenance-before-the-plan-is-completed-a310/?fbclid=IwAR3RBo_ytx4lTonEgAqkGuA0tHulW_POvkB0p6b2McGeFP0r1oAlecnrTt8
Thursday, February 24, 2022
EditorsView Published in Online Lokmat on Feb 24, 2022
वाढत्या अपेक्षांमुळे आनंदाला ठेच!
किरण अग्रवाल /
आनंद अगर समाधान हे मानण्यावर असते असे लाख म्हटले जात असले तरी तसे ते अभावानेच मानले जाते. आहे त्यापेक्षा किंवा गरजेपेक्षा अधिक मिळवण्याच्या नादात मनुष्य आनंदाला पारखा होतो. अपेक्षाच कमी ठेवल्या तर समस्या निर्माण होत नाहीत. अर्थात व्यक्तिपरत्वे समस्या व आनंदाचे गणित बदलणारे असते. सधन, संपन्न कुटुंबातील व्यक्तींपेक्षा निर्धन वा गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद हा अधिक चटकन नजरेत भरतो, कारण त्याचा आनंद हा खूपच लहान सहान बाबीत सामावलेला असतो. अमर्याद अपेक्षांच्या जंजाळात स्वतःला अडकवून ठेवणाऱ्यास समाधान लाभणे अशक्यच असते. म्हटले तर अतिशय साधे सोपे हे तत्त्वज्ञान किंवा अध्यात्म आहे, पण भल्याभल्यांना ते उमगत नाही, परिणामी दुःखी - कष्टी जीवांची संख्या वाढू लागली आहे.
देशातील गरीब व श्रीमंतांची दरी वाढत चालली आहे. देशात करोडपतींची संख्या वाढली, मात्र आनंद कमी झाल्याची बाब हुरून या प्रख्यात संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचा उद्योग बुडाला, अनेक जण देशोधडीला लागले; त्यांची नोकरी गेल्याने व हाताची मजुरीही गेल्याने खायचे वांधे झाले, परंतु दुसरीकडे 7 कोटींहून अधिक संपत्ती झालेल्यांची संख्या 11 टक्क्यांनी वाढून 4.58 लाखांवर गेल्याचे हा अहवाल सांगतो. अर्थात मर्यादित लोकांचेच भले झाले, बहुसंख्याकांचे काय असा प्रश्न यातून उपस्थित होणारा आहे. करोडपतींची संख्या वाढली असली तरी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वतःला आनंदी मानणाऱ्या लोकांची संख्या मात्र घटली आहे. सन 2021 मध्ये ती 66 टक्क्यांवर आली असून, यापूर्वीच्या वर्षात 72 टक्के होती, असेही हा अहवाल सांगतो. म्हणजे आनंदी लोक सहा टक्क्यांनी घटले आहेत आणि ते स्वाभाविकही आहे. कोरोनाचा फटका आर्थिक व मानसिकदृष्ट्याही इतका बसला आहे की या स्थितीत सामान्य माणूस आनंदी राहूच शकत नाही.
-------------------
कोरोनातून सावरून अर्थव्यवस्था आता पुन्हा उभारी घेत आहे. उद्योग धंदे पूर्ववत सुरू झाले असून, रोजगारही वाढू लागला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (इपीएफओ) गेल्या डिसेंबर 2021 मध्ये 14.60 लाख नवे सदस्य मिळालेत. डिसेंबर 2020च्या तुलनेत ही संख्या 16.40 टक्क्यांनी अधिक असल्याचे पाहता रोजगार वाढत असल्याचे स्पष्ट व्हावे. असे असले तरी मनुष्याच्या चेहऱ्यावरील आनंद वाढत नाहीये. एक वर्ग असा आहे जो वर्ष दोन वर्षात आपल्या गाड्या बदलतो, तर दुसरा वर्ग असा आहे ज्याला दोन वेळच्या पोट भरण्याची भ्रांत असते. आर्थिक पातळीवरील वाढती असमानता ऑक्सफॅमच्या अहवालातही स्पष्ट झाली आहे. ही असमानता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे हा खरा चिंतेचा विषय ठरावा, पण याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या राजकारण्यांना परस्परांची उणीदुणी काढण्यात अधिक रस असल्याचे दिसून येते. साऱ्या समस्या सोडवून झाल्याच्या अविर्भावात ते फक्त परस्परांवरील चिखलफेकीचे राजकारण करण्यात मशगुल दिसतात हे दुर्दैवी आहे.
-------------------
कोरोनामुळे अनेकांची घडी विस्कटली हे खरेच. त्यातून आलेल्या भीतीमुळे अनेकांचा आनंद हिरावला गेला, परंतु ज्या प्रमाणात जीवितहानीही झाली ते पाहता, यातून तावून सुलाखून सुखरूप बाहेर पडलेल्यांनी त्याबद्दलच्या समाधानाचा सुस्कारा टाकायला हरकत नसावी. सारे काही पूर्ववत व्हायला कदाचित काही वेळ लागेलही, परंतु आज जे आहे त्यात समाधान मानले तर जगणे आनंदी होऊ शकेल. 'घायल तो यहा हर एक परिंदा है, मगर जो उड सका वही जिंदा है..।' हे जे कुणी म्हणून ठेवले आहे ते यासंदर्भात अगदी तंतोतंत खरे ठरते. समस्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्याखेरीज समाधान शक्य नाही. ते मिळवायचे तर अपेक्षाच मर्यादित ठेवायला हव्या. ओसरी पाहून पाय पसरणे, ज्याला म्हणतात ते व्हायला हवे. तेच होत नाही. झटपट यशाच्या मागे धावताना मनुष्य नको इतक्या अपेक्षा वाढवून बसतो. त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी धावाधाव करताना जे आहे त्यातील आनंद तो गमावून बसतो. अपेक्षा किंवा स्वप्ने मोठी पाहायलाच हवीत, परंतु त्यांना व्यवहार्यता वा वास्तविकतेची जोडही हवी. पण तसे होत नाही. अध्यात्मिक गुरु नेहमी सांगतात, 'मनुष्य आपल्या समस्यांमुळे इतका दुःखी नाही, जितका तो शेजारच्याच्या सुखामुळे दुःखी असतो.' तेव्हा दुःखी कष्टी राहण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून आनंदी राहायला काय हरकत आहे?
Saraunsh published in Akola Lokmat on Feb 20, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220220_2_2&fbclid=IwAR0Oo1qsDRVWyOOMH0knZLCAj2i0T0qMhaArba4oG576ra291ATYdhXJ_CA
https://www.lokmat.com/manthan/elections-are-coming-the-sauce-of-projects-is-huge-a310/?fbclid=IwAR07gQqm7T1n1EepsmNRU4s9Gre4kwKaZxhVOnudHrUeSVOKSQv0C9XZC6M
आजोळच्या मातीचा गंध न्यारा...
20 Feb, 2022
आजोळच्या मातीचा गंध न्यारा...
काही आठवणी या तहहयातच्या असतात, आईचं माहेर म्हणजे आजोळच्या आठवणी या त्यातीलच.
ममत्वाच्या हळुवार व अलवार भावनांचा पदर लगडलेला असतो या आठवणींशी. आजोबा, आज्जी, मामा, मामी व गल्लीतले सारे ओळखी पाळखीचे असंख्य व्यक्ती या भावबंधाशी जोडलेल्या असतात.
जळगाव जामोद हे माझं आजोळ. माझा जन्मही तिथलाच, त्यामुळे लोकमत अकोला आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा मी आजोळात आलो अशी भावना बोलून दाखविली होती.
येथे आलो तेव्हापासून मनात उत्कंठा लागून होती जन्मगावी जायची. तेथील आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी प्रा. नानासाहेब कांडलकर यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याकडे सांत्वनपर भेटीच्या निमित्ताने युनिट हेड आलोक कुमार जी शर्मा व मार्केटींग अधिकारी संदीप दिवेकर यांच्या सोबतीने हा योग जुळून आला.
****
नीटसे आठवत नाही, परंतु सुमारे 35 ते 40 वर्षानंतर तेथे गेलो. सेठ नारायणदास लक्ष्मणदास अग्रवाल हे माझे आजोबा. त्याकाळातील मोठे नावाजलेले सराफा व्यावसायिक होते ते. तालेवार आसामी होती. माझ्या जन्माआधीच त्यांचे निधन झालेले असल्याने मी त्यांना बघण्याचा प्रश्नच नव्हता, पण माझ्या आजीने व मामा, मामींनी माझे खूप लाड पुरवले.
शिवप्रसाद व कन्हैयालाल (हरिसेठ) हे माझे दोन मामा जळगावी रहात, तर तिसरे मामा जगदीश हे बऱ्हाणपूर येथे राहतात.
माझे शालेय शिक्षण सुरू असतानाचा तो काळ होता. तेव्हा पर्यटनाची ठिकाणे तितकी विकसीत नव्हती त्यामुळे शाळांना सुट्ट्या लागल्या रे लागल्या की आईसोबत लोखंडी पेटी उचलून मामाच्या गावाला येणे हाच एक पर्याय असे.
जळगावी आलो की आई व मामांसोबतच गल्लीतले भिकारीलालसेठ, गोकुलसेठ, फकिरचंदसेठ, बिहारीसेठ, दामू सेठ, रतनमामा, बेबीताई अशा अनेकांकडे जाणे होई. तेव्हाच्या त्यांच्या मोठमोठ्या मोकळ्या वाड्यांमध्ये खेळण्यापासून ते खाण्या पिण्यापर्यंत चंगळ असे.
बऱ्याचदा सकाळी-सकाळी आजीच्या देवपूजेसाठी भिकारीलाल सेठच्या घरामागील शेतात जाऊन पारिजातकाची परडीभर फुले वेचून आणावी लागत, तो गंध अजूनही मनात दरवळतो आहे.
मोठे झाल्यावर शिक्षणासाठी गाव सुटले व मामाच्या गावी जाणेही सुटले. खूप पूर्वी नगराध्यक्ष राहिलेल्या भिकारीलाल अग्रवाल यांनी निर्मित गीता भवनच्या उद्घाटनानिमित्त हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांच्या समवेत जळगावला आलो होतो, त्यानंतर मात्र येणे झाले नव्हते.
****
कालौघात आज गाव खूपच बदलले आहे.
आमच्या मामांचा तीन मजली मोठा कौलारू वाडा होता. आता त्या जागेवर डॉ. संदीप व स्वाती वाकेकर यांचे अद्ययावत हॉस्पिटल उभे झाले आहे. त्याच जागी माझा जन्म झाला आहे हे कळल्यावर त्यांनीही मोठ्या आपुलकीने आदरातिथ्य केले.
सन्मित्र व आमच्या लोकमत परिवारातीलच डॉ. किशोर केला यांनी वरवट बकाल येथेच गाठून स्वागत केले व बुलडाणा अर्बन संचलित सहकार विद्या मंदिराची भेट घडविली.
जळगावमध्ये श्री अग्रसेन नागरी पतसंस्थेत बालपणीचे स्नेही व तेथील केंद्रीय संचालक श्री नंदकिशोर अग्रवाल यांनी घेतलेली गळाभेट डोळ्यांच्या कडा ओलावून गेली.
आजोळच्या गल्ली समोरच साकारलेल्या बुलडाणा अर्बनच्या शाखेत श्रद्धेय किसनलालजी केला व डॉ. सौ. स्वाती केला यांनी स्वागत केले. तेथे गल्लीतील आठवणींना उजाळा मिळाला.
प्रा. कांडलकर सरांकडे समाचाराला गेलो होतो, परंतु आजोळच्या नात्याने सौ. वंदनाताई व त्यांच्या स्नुषेच्याही आदरातिथ्याचा परिचय घडून आला. लोकमत सखी मंचच्या विभागीय प्रतिनिधींचे बक्षीस वितरण त्यांच्या उपस्थितीत केले.
आमचे आणखी एक सहकारी जयदेव वानखडे यांचे चि. प्रतीक याचा MBBS ला नंबर लागला, त्याचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
एकूणच, भरगच्च भेटीगाठी झाल्या.
यानिमित्ताने बालपणीच्या जुन्या आठवणींच्या झुल्यावर झुलायला मिळाले.
अनेकांच्या भेटी राहून गेल्या. पाय निघता निघत नव्हता, पण नाईलाज होता. अखेर पुढच्यावेळी मुक्कामी येण्याचा निश्चय करून जळगाव सोडले...
#KiranAgrawal #JalgaonJamod
कोई केनी भजो पूजो मत...
15 fEB, 2022
कोई केनी भजो पूजो मत...
देव मंदिरात नाही, माणसात आहे असे सांगत माणुसकी धर्मासाठी आयुष्य वेचलेले, बंजारा समाजाला मूळ प्रवाहात आणून त्याच्या उत्थानासाठी झटलेले श्री संत सेवालाल महाराज यांची आज जयंती.
तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज समाधीचे दर्शन घेतांना...
#Pohradevi #SantSewalal #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Feb 13, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220213_6_4&fbclid=IwAR0P5gS5D-1DL6-WfZj-jTnfbc570tzVhHxJdx9ZNucKE4vP0N71s0zNdeo
https://www.lokmat.com/manthan/project-persist-but-only-after-checking-the-utility-a310/?fbclid=IwAR0x5bkFuzyHk4KtTxRB66zzTyhmExLhSkpgK0zd4-YJDyipQVBcsLdYgiY
Thursday, February 10, 2022
EditorsView published in Online Lokmat on Feb 10, 2022
पोटातल्या आगीतून घडणारे गुन्हे..
किरण अग्रवाल /
भावनांशी संवेदना निगडित असतात, त्यांना हळवेपणाचा किंवा अलवारतेचा पदर लाभलेला असतो त्यामुळे त्यात तडजोडीचा विचार करता येऊ नये हे खरेच; परंतु जेव्हा परिस्थिती बिकट बनून जाते तेव्हा संवेदनांचा बाजार मांडला जातोच, शिवाय भावना काखोटीस मारून व्यवहाराचे सौदे केले जातात. असे प्रकार कारुण्य, कणव जागवणारे असतात तसेच शोचनीय व दुर्दैवी म्हणवणारेही असतात, परंतु ते रोखणे अवघड असते कारण त्यास कायद्याच्या चौकटीत मोडणाऱ्या गुन्हेगारीकरणाखेरीज दारिद्र्यातुन आकारास आलेल्या मजबुरीसारखे इतर अनेक पदर लाभलेले असतात. रुपया - पैशांसाठी पोटच्या मुलांची विक्री करण्याचे जे प्रकार अलीकडच्या काळात वाढलेले दिसत आहेत त्याकडेही याच दृष्टीकोनातून पाहता येणारे आहे. या प्रकारांचे समर्थन कुणीही करणार नाही, परंतु समाजाच्या आर्थिक व मानसिक अवनतीच्या संदर्भाने त्याचा विचार होणे गरजेचे ठरावे.
एकीकडे अपत्यप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या दाम्पत्यांची वैद्यकीय प्रगत तंत्र असणाऱ्यांच्या दारी गर्दी वाढत असताना, दुसरीकडे आहेत ती अपत्ये चक्क पैश्याच्या मोबदल्यात विकून टाकण्याचे प्रकारही वाढीस लागलेले दिसत आहेत. अलीकडेच पुण्यातील कोथरूडच्या एका मुलाला एक लाख रुपयात पनवेलच्या दांपत्यास विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईच्या नेरुळमध्ये ही असाच प्रकार उघडकीस आला होता, तेथे तर एकाच दाम्पत्याने आपली तीन अपत्ये विक्री केल्याचे समोर आले होते. सातारा, नांदेड, डोंबिवली, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा आदी ठिकाणीही असे प्रकार घडले असून गुन्हे दाखल आहेत. मानवी तस्करीचे हे प्रकार भावना गोठवणारेच असून, पोटच्या मुलांची विक्री करणाऱ्या मात्या पित्यास त्याचे काही एक वाटत नसावे काय असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित करणारेही ठरावेत. भाव भावना किंवा संवेदनांचा संबंध या प्रकरणांतुन पणास लागून जातो तो म्हणूनच.
---------------
अपत्याला पैशाच्या मोबदल्यात विकल्याबद्दल 'माता न तू वैरीणी...' म्हणून संबंधित मातांकडे पाहिले जाते, मात्र दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेली कुटुंबे यात जेव्हा आढळून येतात तेव्हा, गुन्हेगारीच्या चौकटी पलिकडील सामाजिक, आर्थिक विपन्नावस्थेच्या विदारकतेची वास्तविकता समोर येऊन जाते, जी संवेदनशील मनांना अस्वस्थ करून गेल्याखेरीज राहत नाही. अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या वर्गाची अगतिकता यात असते तशी किमान दुसऱ्या घरात गेल्यावर पोटच्या पिलाला दोन वेळचे जेवण मिळून त्याचे आयुष्य सुधारण्याची संबंधितांची आसही असते. या दोन्ही घटकांची परस्परपूरक गरज हेरून मध्यस्थ लाभ उठवतात. वंशाला दिवा असावा म्हणून मुलगा असण्याची एक मानसिकता आपल्याकडे अजूनही आहे, त्यातूनही काही प्रकार घडून येतात. नाते संबंधातील अगर अनाथ मुले दत्तक घेण्याचा अधिकृत मार्ग आहे, परंतु शॉर्टकटच्या नादात बुद्धी गहाण पडते.
---------------
महत्वाचे म्हणजे, पोटच्या मुलांची विक्री करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचलेल्या दाम्पत्यांची मानसिकता किंवा त्यामागील गरज अभ्यासणे गरजेचे आहे. यातील अनेकांची अवस्था उपासमारीशी निगडित आढळते. आपल्याकडे म्हणजे भारतात ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनामुळे तर त्यात भरच पडली आहे. यासंदर्भात जागतिक भूक निर्देशांक बघता भारताचा नंबर 116 देशांच्या यादीत 101व्या क्रमांकावर घसरला आहे. 2020 या वर्षात तो 94व्या स्थानी होता. 'भुखे पेट भजन ना होय' असे नेहमी म्हटले जाते. पोटातली आग स्वस्थ बसू देत नाही. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पोषण मिशन- 2 ची घोषणा केली, पण त्यासाठी तरतूद कमी आहे. तेव्हा दोन वेळच्या अन्नासाठी वंचित राहणारा जो घटक आहे त्याची आर्थिक व मानसिक मजबुरी टाळण्यासाठी काही करता येईल का याचाही विचार व्हायला हवा. पोटच्या गोळ्याला विकण्यासारखी निर्दयता, भावनाहीनता आकारास येण्यामागील समाजशास्त्रीय कारणांचा कायद्याच्या पलिकडे जाऊन शोध वा अभ्यास होणे यानिमित्ताने गरजेचे ठरते.
https://www.lokmat.com/editorial/crimes-caused-by-stomach-fire-a310/?fbclid=IwAR2Q4gJpze0lX_YXrvZxnLP5e3cdMX4Ei5o8lZ9Egq2YCjbWZT81KHPy-Vw
Monday, February 7, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Feb 06, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220206_2_8&fbclid=IwAR3ZcjoX-MgsXephtfFpMTL6M2w6e-9TPYtZs17BcS4Ahwbmo2p-f3sI-ds
https://www.lokmat.com/manthan/village-leader-stuck-in-the-alley-a310/?fbclid=IwAR3jJYRYFgbDhX2pO-8tgxo6zfuOiR3Mehf52mYsCKlBoKPGl3VNp3uauZM
Thursday, February 3, 2022
EditorsView published in Online Lokmat on Feb 03, 2022
सोशल मीडिया ला आचारसहिता हवीच!
किरण अग्रवाल /
सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून विशेषतः तरुण पिढी त्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या माध्यमाचा केवळ वापरच वाढला असे नाही, तर तो अनिर्बंधही होत चालल्याचे व त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ लागल्याचेही दिसून येते. त्यामुळेच त्याच्या हाताळणीबाबत आचारसंहिता लागू होणे गरजेचे बनले आहे. ती स्वयंस्फूर्तीने पाळली जात नसल्याने, शासकीय यंत्रणांकडूनच त्याबाबतची पाऊले उचलली जावयास हवी. कोण कुठला एक हिंदुस्तानी भाऊ उठतो आणि त्याच्या चिथावणीतून राज्यात जागोजागी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहता यासंबंधीची गरज प्रकर्षाने अधोरेखित होऊन गेली आहे.
मोबाईल क्रांतीत संपर्कापेक्षा संदेशांचे आदान-प्रदान मोठ्या प्रमाणात होत असून, सोशल मीडियाचा वापर अनिर्बंधपणे होऊ लागला आहे. अर्थात इंटरनेट कनेक्टिव्हिटीशी संबंधित हे तंत्र असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांसाठी व्यावसायिकदृष्ट्या हा वाढता वापर लाभदायीच आहे हा भाग वेगळा, परंतु हे होताना समाजस्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ज्या बाबी या माध्यमांवर किंवा त्या माध्यमातून घडून येतात, त्यामुळे चिंता व्यक्त होणे स्वाभाविक ठरून गेले आहे. या माध्यमांमुळे कनेक्टिव्हिटी वाढून जग जवळ आले, हे चांगलेच झाले म्हणायचे; पण नफ्यासोबत नुकसान वा फायद्यासोबत तोटा असतो तसे सोशल मीडियाबाबत झाले आहे. यातही गंभीर बाब अशी की, सुटलेला बाण परत घेणे अवघड होऊन बसते तसे या मीडियाचे असते. त्यामुळे यातून होणारे नुकसान केवळ व्यक्तिगत अगर आर्थिकच नसते, तर ते एकूणच समाजाला व देशालाही हानी पोहोचवणारे ठरू शकते. म्हणूनच याबाबत स्वयंस्फूर्त आचारसंहिता किंवा मर्यादा पाळल्या जाणार नसतील तर सरकारी पातळीवरून त्यासाठी काही सीमारेषा आखण्याची अपेक्षा गैर ठरू नये.
-----------------
सोशल मीडियावरून केल्या जाणाऱ्या प्रचाराला निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडून अलीकडे आचारसंहितेची मर्यादा घालून दिली जाऊ लागली आहे, पण एरव्ही या माध्यमांच्या हाताळणीबाबत कसलीही रोकटोक नाही. कुणीही उठतो आणि कशाही प्रकारे व्यक्त होतो. त्यामुळे एखाद्याच्या अविचारी, अविवेकी चिथावणीतून समाजस्वास्थ्य बिघडण्याचा प्रसंग ओढवण्याची शक्यता निर्माण होते. कोरोनामुळे सुमारे दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण दिले गेले असताना परीक्षा ऑफलाईन का, असा प्रश्न कूण्या हिंदुस्तानी भाऊ ने उपस्थित केल्यावर राज्यातील विविध शहरांमधील रस्त्यांवर शेकडो विद्यार्थ्यांनी उतरून प्रचलीत पद्धतीच्या परीक्षांना विरोध दर्शविल्याचे अलीकडीलच उदाहरण यासंदर्भात पुरेसे बोलके असून ते कायदा सुव्यवस्थेला धक्का देणारेही ठरले. या भाऊच्या संबंधित विधानामागे व अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांच्या जमावामागे आणखी कुणाचा हात आहे की काय हा संशोधनाचा विषय आहे, पण सोशल मीडियावरील एखाद्याच्या भडकाऊपणातुन तरुण पिढीचे कसे भरकटलेपण प्रत्ययास येऊ शकते व अशांतता निर्माण होऊ शकते हे यातून पुढे येऊन गेले.
-----------------
बरे, सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचे हे एवढे एकच उदाहरण नाही. इन्स्टाग्राम वरून 'थेरगाव क्वीन' नावाच्या एका अकाऊंटद्वारे अश्लील भाषेत धमकीचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या दोन तरुणींसह तिघांविरुद्ध पुण्यातील वाकड पोलीस स्टेशनमध्ये अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुला मुलींची नीति भ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. इतकेच कशाला, सोशल मीडियावरील अनिर्बंध व्हायरलगिरीतुन बदनामीकारक बाबीही खातरजमा न करता इकडून तिकडे फॉरवर्ड केल्या जातात, तसेच दुःखद प्रसंगी भावना दुखावणारे किंवा संवेदनांचा बाजार मांडणारे प्रकारही काही महाभागांकडून घडून येतात. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला सचिन तेंडुलकरने खांदा दिल्याची व्हायरल पोस्ट अशातलीच. मिसेस मुख्यमंत्री आरटीओच्या रांगेत उभ्या असल्याची एक पोस्टही अशीच चुकीची होती. इतरही अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. मतलब इतकाच की, सोशल मीडियावरील या संदर्भातील अनिर्बंधतेला लगाम घालणे गरजेचे होऊन बसले आहे.
https://www.lokmat.com/editorial/social-media-needs-ethics-a310/?fbclid=IwAR39xY91PD-tqyzZLrBFriJMVQbakiS-WWy_m0yy_O3Fr57tzOrvsYi2w90
पंचविशीच्या उंबरठ्यावर...
Feb 03, 2022
पंचविशीच्या उंबरठ्यावर...
अकोला लोकमतला बघता-बघता 24 वर्षे पूर्ण होत आलीत. आता पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आवृत्ती 25व्या वर्षात पाऊल ठेवणार.
या वर्षात काय काय करायचे याबाबत संपूर्ण टीम उत्साहित आहे. वर्धापन दिनाच्या तयारीलाही प्रारंभ झाला आहे.
नागरिकांच्या प्रबळ ईम्युनिटी व सावधगिरीपुढे गुडघे टेकून कोरोना पराभूत होऊन परतीला लागला आहे. त्यामुळे अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील सहकारींच्या बैठका घेतल्या. कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्याआधीच वाशिम व खामगावमधील सहकारी मित्रांच्याही बैठका घेऊन झाल्या होत्या.
नव्या उमेदीने सारे सज्ज व सिद्ध आहेत रौप्य पर्वाच्या आरंभासाठी...
यातही वाचक, जाहिरातदारांचे पाठबळ व प्रेम नेहमीप्रमाणे लाभेल याची खात्री आहे...
#LokmatAkola #KiranAgrawal
Subscribe to:
Posts (Atom)