Tuesday, November 1, 2022

किल्ल्यांनी जागविला इतिहास...

Nov. 25, 2022 किल्ल्यांनी जागविला इतिहास...
लोकमत कॅम्पस क्लब व श्री समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. यात प्रतापगड, रायगड, जंजिरा आदि किल्ल्यांच्या प्रतिकृती मुलांनी साकारल्या. मातीत खेळू नका असे मुलांना घरी सांगितले जाते, पण या स्पर्धेच्या निमित्ताने बच्चे कंपनी छान मातीत खेळली, रंगली. स्पर्धेचे बक्षीस वितरण निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, समर्थ पब्लिक स्कूलचे संचालक नितीन व जयश्री बाठे, मूर्तिकार शरद कोकाटे आदींच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगीची ही आनंद चित्रे...
#LokmatAkola #FortMeking #KiranAgrawal

No comments:

Post a Comment