Monday, November 7, 2022

पांझरेच्या काठी अकोल्याचा 'अंकुर'...

Oct. 30, 2022 पांझरेच्या काठी अकोल्याचा 'अंकुर'...
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे स्व. हिम्मतराव शेकोकार व मित्रांनी सुरू केलेली अंकुर साहित्य संघाची चळवळ नंतर अकोल्यात येऊन स्थिरावली व आता संपूर्ण महाराष्ट्रव्यापी झाली आहे. याच अंकुर साहित्य संघाचे 60वे, म्हणजे हिरक महोत्सवी संमेलन धुळ्यात पार पडले; जणू मोर्णेचा प्रवाह पांझराकाठी पोहोचला. डॉ पापलाल पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या संमेलनाच्या समारोपाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहताना या मंडळीचे मोठे कौतुक वाटले. 36 वर्षात 60 साहित्य संमेलने भरविणाऱ्या अंकुर संघाने जागोजागच्या साहित्यिकांना अभिव्यक्तीचे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. साहित्यिक विचार मंथनाखेरीज कथाकथन, कवी संमेलन, गझल मुशायरा, मुलाखत, व्यंगचित्र प्रदर्शन असे सारे प्रकार यात हाताळले गेले.
संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे, कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे, सुरेश लांडे, संजय कावरे, प्रा. मोहन काळे, मधुकर वडोदे, सदाशिव शेळके, शिवलिंग काटेकर, डॉ. प्रमोद काकडे, वासुदेवराव खोपडे, सुनील दिवनाले आदींचे परिश्रम, सक्रिय सहभाग व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे यांच्यासारख्यांच्या मार्गदर्शनातून 'अंकुर'ची चळवळ साहित्य प्रांतात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कार्यवाहक प्रा. राम जाधव, निमंत्रक दत्तात्रय कल्याणकर व त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नातून हे संमेलन पांझराकाठी अंकुरले... Congratulations to all... #Ankur #KiranAgrawal #PanjhraDhule

No comments:

Post a Comment