Tuesday, November 1, 2022

अंक नव्हे, उत्सव... लोकमत दीपोत्सव

Nov. 23, 2022 अंक नव्हे, उत्सव... लोकमत दीपोत्सव
दिवाळी अंकांच्या परंपरेत मराठीचा सन्मान वाढवीत 3 लाख प्रतींचा टप्पा ओलांडणारी सदाबहार मैफल म्हणजे लोकमत दीपोत्सव. विषय व मांडणी यातील सर्वोत्कृष्टतेचा अनुभव देणारा वाचनानंद घ्यायचा तर हा अंक वाचायलाच हवा. अकोला येथे लेबेन लाईफ सायन्सचे संचालक हरेश शाह, एमेराल्ड ग्रुपचे संचालक संजय तुलशान, ललित ट्युटोरियल्सचे संचालक प्रा. ललित काळपांडे, श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा. नितीन बाठे यांच्या हस्ते दीपोत्सव व हिंदीतील दिपभवचे प्रकाशन झाले. यावेळी समवेत लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड आलोककुमार शर्मा, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा, वितरण व्यवस्थापक प्रकाश वानखडे, जाहिरात मार्केटिंगचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश पांडे आदी. उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनीही त्यांच्या कार्यालयात दीपोत्सवचे प्रकाशन केले.
बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य.अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, तर वाशिम येथे पद्मश्री ना. चं. कांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी लोकमत समूह संपादक विजय बाविस्कर, प्रॉडक्ट् हेड पुष्कर कुलकर्णी, रिसर्च एडिटर प्रेमदास राठोड, स्टार डेस्क प्रमुख गजानन दिवाण, हॅलो हेड नंदकिशोर नारे, निलेश जोशी आदी उपस्थित होते. दीपोत्सव व दिपभव खरेदीसाठी नजिकच्या लोकमत कार्यालयात किंवा स्थानिक वार्ताहर, वितरक यांच्याकडे संपर्क साधावा... #LokmatAkola #LokmatDeepotsav2022

No comments:

Post a Comment