Monday, November 7, 2022

युवकांना व्यासपीठ लाभलेले संमेलन...

Nov. 06, 2022 युवकांना व्यासपीठ लाभलेले संमेलन...
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अकोला शाखेतर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनानिमित्त लोकमत मधील जुन्या सहकारी व सोशल मीडियाच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य तसेच साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार प्राप्त नाशिकचे प्रख्यात कवी ऐश्वर्य पाटेकर या माहेरच्या माणसांची भेट झाली. ऐश्वर्यने संमेलनाचे उदघाटन केले, तर मुक्ता ने 'हो, आहे माझा बॉयफ्रेंड' हा विषय अतिशय छान मांडला.
अकोला लोकमतच्या संपादकीय विभागाची धुरा यापूर्वी सांभाळलेले ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, विदर्भ संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, लातूरचे युवराज पाटील तसेच अनेक स्थानिक साहित्यिकांच्याही भेटी व गप्पा झाल्या. जागर फौंडेशनची टीमही भेटली. संमेलनाचे अध्यक्ष, प्रख्यात युवा साहित्यिक व चित्रपट दिग्दर्शक अरविंद जगताप, साहित्यिक डॉ. गजानन मालोकार यांच्यासह तुळशीदास खिरोडकार यांच्या 'चित्रमय बालस्नेही' या कोरकू - मराठी भाषा ओळख पुस्तकाचे प्रकाशन केले. प्रभात किड्सचे संचालक प्रा गजानन नारे तसेच संग्राम गावंडे व त्यांच्या टीमच्या परिश्रमातून हे संमेलन उभे राहिले. विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनातून युवा साहित्यिकांना व्यासपीठ लाभलेले दिसून आले.
#KiranAgrawal

No comments:

Post a Comment