Monday, November 7, 2022

चिमुकल्यांसाठी मायेची ऊब...

Nov. 02, 2022 चिमुकल्यांसाठी मायेची ऊब...
निरागस व लहान बालकांच्या चेहऱ्यावरील आनंदातून लाभणाऱ्या समाधानाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही. त्यातही काही कारणवश आप्तांच्या आधारापासून दुरावलेली बालके असली तर त्यांचा आनंद संबंधितांचा सेवाभाव वृद्धिंगत करून गेल्याखेरीज राहत नाही. 'दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है...' या गीताची आठवण अशावेळी होऊन जाते. लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त अकोल्यातील सूर्योदय बालगृह, आनंद आश्रम व गायत्री बालिकाश्रम येथील बालकांना थंडीच्या पार्श्वभूमीवर ब्लॅंकेट, स्वेटर तसेच शैक्षणिक -क्रीडा साहित्य व दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले, त्यावेळी हीच बाब अनुभवयास आली.
यावेळी स्वराज सामाजिक संस्थेचे संचालक पुरुषोत्तम शिंदे, आशु ॲडव्हर्टायझर्सचे संचालक शाम सारभुकन, शांतनु मेडिकलचे संचालक शांतनु देवानंद ठाकरे, डॉ. एन. के. माहेश्वरी, डॉ. तारा माहेश्वरी, डॉ. विनिता माहेश्वरी, आर्टिस्ट दीपा शर्मा, सूर्योदय बालगृहाचे संचालक शिवराज पाटील, आनंद आश्रमच्या संचालिका तपोधीरा दीदी, गायत्री बालिकाश्रमाच्या उपाध्यक्षा श्रीमती अश्विनी सुजदेकर व संचालिका मीरा जोशी, लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोककुमार शर्मा आदी उपस्थित होते. या संस्थांमधील व अन्यही वंचितांना आपण सारे मिळून मायेची ऊब देऊया, त्यांना आधार देणाऱ्या संस्थाच्या पाठीशी जमेल त्या मदतीचे बळ उभे करूया मित्रांनो... #LokmatAkola #Suryoday #AanandAshram

No comments:

Post a Comment