Thursday, September 9, 2021

निसर्गाच्या सानिध्यात...

Sept 08, 2021 निसर्गाच्या सानिध्यात...
खास वेळ काढून पर्यटन करणे हल्ली शक्य होत नाही. त्यामुळे काल वाशिम येथून परतताना बुलडाण्यात मुक्कामी थांबलो म्हणून आज भल्या पहाटे राजूर घाटात भटकंती केली. घाटातील श्री हनुमान मंदिराच्या व्ह्यू पॉईंट वरून दरीतील वृक्षावरील मर्कटलीला न्याहाळल्या तर संतोषी माता मंदिरालगतच्या टेकडीवर चढून निसर्ग डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. खूप दिवसांनी पहाटेची प्रसन्नता अनुभवली. निसर्गाचं भरभरून देणं लाभलेल्या या जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता येणारी आहेत.
आमचे बुलडाणा हॅलो हेड निलेश जोशी, संदीप वानखडे व ब्रह्मानंद जाधव यांच्याशी कार्यालयीन संवाद खेरीजचा मनमुक्त संवाद साधण्याची, परस्परांना अधिक जवळून ओळखण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. Thanks Nilesh, Sandeep n Bhramhanand.. #KiranAgrawal #LokmatAkola #RajuraghatBuldana

No comments:

Post a Comment