Thursday, September 30, 2021

Dr. Gajanan Nare sir visit...

Sept 29, 2021
काही भेटी अशा असतात की, ज्यातुन विचारांची संपन्नता वाढण्यास मदत होते व सामाजिक संवेदनशिलतेची ओळखही घडून येते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अकोल्यातील प्रभात किड्सचे संचालक, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय सदस्य डाॅ. गजानन नारे. मी अकाेल्यात रुजू हाेण्यापूर्वीपासून डाॅ. नारे यांच्या कार्याबाबत जाणून हाेताे. येथे आल्यावर त्यांच्याशी फोनवर बोलणेही झाले व मध्यंतरी लोकमतच्याच एका कार्यक्रमात त्यांची भेटही झाली. आज ते वेळ काढून लोकमत कार्यालयात आल्याने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधता आला. ‘लाेकमत’चे पत्रकार राहिलेले व प्रबोधनात्मक चळवळीतील कार्यकर्ते संताेष अरसाेड यांचे ‘प्रबाेधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा’ हे पुस्तक त्यांनी भेट दिले व त्या संदर्भातील एका कार्यक्रमाचे निमंत्रणही. यानिमित्ताने शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवर छान चर्चा झाली.... #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #DrGajananNare

No comments:

Post a Comment