Sunday, September 26, 2021

एकांतातील निवांतता ...

Sept 24, 2021 एकांतातील निवांतता ... स्वतःचा शोध घेता येणे, ही तशी अवघड प्रक्रिया. हा शोध घ्यायचा तर अगोदर हरवणे गरजेचे. शहरी कोलाहलात मात्र मनाचे हरवणेच होत नाही. सतत कसल्या ना कसल्या व्यापात माणूस गुंतून असतो, विचारांचे चक्र अव्याहत सुरू असते; अशात एकाग्र व्हायला एकांत लाभणे कठीणच असते. गर्दीत माणूस हरवतो, पण मन हरवत नाही. ****
श्री गणरायाच्या विसर्जनानिमित्त गावाकडे रावेरला गेल्यावर मुद्दाम भल्या पहाटे उठून निसर्गाच्या सानिध्यात एकांत शोधला व निवांतता अनुभवली. मनाच्या हरवण्याची प्रक्रिया येथे आपोआप साधली. यादरम्यान 'स्व'चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पहाट सरून सूर्याच्या सोनेरी कणांनी चराचरात चैतन्य भरेस्तोवर हा शोध सुरूच होता. या शोधातून, म्हणजे आत्मावलोकन वा आत्मपरिक्षणातुनच उद्याच्या ऊर्जेची वाट सापडून गेली ... #KiranAgrawal #KirananandNashik

No comments:

Post a Comment