Thursday, September 30, 2021

अकोल्याच्या कन्येचा अभिमानास्पद गौरव...

Sept 30, 2021 अकोल्याच्या कन्येचा अभिमानास्पद गौरव...
वाडेगाव या छोट्याशा गावातील सपना बाबर ही कन्या. वडील रेल्वेच्या पोलीस सेवेत. घरची परिस्थिती अतिशय बेताची. अकोल्याच्या एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात शिकणारी ही कन्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून धडपड करतेय. तंबाखूमुक्ती साठी ती झटतेय. तिच्या याच कार्याची दखल घेत भारत सरकार तर्फे तिला राष्ट्रीय सेवा योजनेतील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून दोनच विद्यार्थ्यांची या सन्मानासाठी निवड झाली, त्यात कु. सपनाच्या रूपाने अकोल्याला प्रथमच हा सन्मान लाभला. अकोल्याचे नाव देशपातळीवर उंचावणाऱ्या या कन्येचा अकोलेकरांना अभिमान आहे. म्हणूनच 'लोकमत'तर्फे प्रभात किड्स चे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या हस्ते तिचा लोकमत कार्यालयात सन्मान करण्यात आला. #LokmatAkola #SapnaBabar #DrGajananNare

No comments:

Post a Comment