At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Wednesday, November 30, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 27, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221127_2_2&fbclid=IwAR3E-8k9wDVWEOBjbwnXJw6OwapLKWeySECV2gTN09tJo5oa_ysYmSRIdIA
https://www.lokmat.com/editorial/the-confusion-of-akola-municipal-corporation-elections-is-increasing-a520-c310/?fbclid=IwAR00rss0V0sViWxCeRpBfltFFSQqL8Q4cBKbR4hdpYT3MzKs4M-SRzJO7xY
Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 20, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221120_2_2&fbclid=IwAR1oB8rtwcWGciexHhFlIR8NDkZT8kmHQf1ymDfghXs5OW5lUsIztkGXREM
https://www.lokmat.com/editorial/bharat-jodo-yatra-the-challenge-is-to-maintain-consciousness-a520-c310/?fbclid=IwAR126nEhky1QPC-5oKEGz9ZeGOCy1BMCftWzP_fylpAJZw7DWISjOaTQwf0
Thursday, November 17, 2022
Sunday, November 13, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Oct. 13, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221113_2_1
https://www.lokmat.com/editorial/distrust-of-train-travel-is-increasing-a520-c310/
Monday, November 7, 2022
युवकांना व्यासपीठ लाभलेले संमेलन...
Nov. 06, 2022
युवकांना व्यासपीठ लाभलेले संमेलन...
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अकोला शाखेतर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनानिमित्त लोकमत मधील जुन्या सहकारी व सोशल मीडियाच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य तसेच साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार प्राप्त नाशिकचे प्रख्यात कवी ऐश्वर्य पाटेकर या माहेरच्या माणसांची भेट झाली. ऐश्वर्यने संमेलनाचे उदघाटन केले, तर मुक्ता ने 'हो, आहे माझा बॉयफ्रेंड' हा विषय अतिशय छान मांडला.
अकोला लोकमतच्या संपादकीय विभागाची धुरा यापूर्वी सांभाळलेले ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, विदर्भ संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, लातूरचे युवराज पाटील तसेच अनेक स्थानिक साहित्यिकांच्याही भेटी व गप्पा झाल्या. जागर फौंडेशनची टीमही भेटली.
संमेलनाचे अध्यक्ष, प्रख्यात युवा साहित्यिक व चित्रपट दिग्दर्शक अरविंद जगताप, साहित्यिक डॉ. गजानन मालोकार यांच्यासह तुळशीदास खिरोडकार यांच्या 'चित्रमय बालस्नेही' या कोरकू - मराठी भाषा ओळख पुस्तकाचे प्रकाशन केले.
प्रभात किड्सचे संचालक प्रा गजानन नारे तसेच संग्राम गावंडे व त्यांच्या टीमच्या परिश्रमातून हे संमेलन उभे राहिले. विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनातून युवा साहित्यिकांना व्यासपीठ लाभलेले दिसून आले.
#KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Nov.06, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221106_2_2&fbclid=IwAR3MRhxvYntGrhzvmDPQoUHtM7xoNy3k4aKvwKPgUHbhRvGXhqol1NDBT4c
https://www.lokmat.com/editorial/a-series-of-murders-that-frighten-the-society-a520-c310/?fbclid=IwAR2zyA4ZFbfsRKPLkll3oaJSp1D7hyPaic3RT2hioeqYO57zwY7tvmN9wY4
चिमुकल्यांसाठी मायेची ऊब...
Nov. 02, 2022
चिमुकल्यांसाठी मायेची ऊब...
निरागस व लहान बालकांच्या चेहऱ्यावरील आनंदातून लाभणाऱ्या समाधानाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही. त्यातही काही कारणवश आप्तांच्या आधारापासून दुरावलेली बालके असली तर त्यांचा आनंद संबंधितांचा सेवाभाव वृद्धिंगत करून गेल्याखेरीज राहत नाही. 'दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है...' या गीताची आठवण अशावेळी होऊन जाते.
लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त अकोल्यातील सूर्योदय बालगृह, आनंद आश्रम व गायत्री बालिकाश्रम येथील बालकांना थंडीच्या पार्श्वभूमीवर ब्लॅंकेट, स्वेटर तसेच शैक्षणिक -क्रीडा साहित्य व दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले, त्यावेळी हीच बाब अनुभवयास आली.
यावेळी स्वराज सामाजिक संस्थेचे संचालक पुरुषोत्तम शिंदे, आशु ॲडव्हर्टायझर्सचे संचालक शाम सारभुकन, शांतनु मेडिकलचे संचालक शांतनु देवानंद ठाकरे, डॉ. एन. के. माहेश्वरी, डॉ. तारा माहेश्वरी, डॉ. विनिता माहेश्वरी, आर्टिस्ट दीपा शर्मा, सूर्योदय बालगृहाचे संचालक शिवराज पाटील, आनंद आश्रमच्या संचालिका तपोधीरा दीदी, गायत्री बालिकाश्रमाच्या उपाध्यक्षा श्रीमती अश्विनी सुजदेकर व संचालिका मीरा जोशी, लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोककुमार शर्मा आदी उपस्थित होते.
या संस्थांमधील व अन्यही वंचितांना आपण सारे मिळून मायेची ऊब देऊया, त्यांना आधार देणाऱ्या संस्थाच्या पाठीशी जमेल त्या मदतीचे बळ उभे करूया मित्रांनो...
#LokmatAkola #Suryoday #AanandAshram
पांझरेच्या काठी अकोल्याचा 'अंकुर'...
Oct. 30, 2022
पांझरेच्या काठी अकोल्याचा 'अंकुर'...
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे स्व. हिम्मतराव शेकोकार व मित्रांनी सुरू केलेली अंकुर साहित्य संघाची चळवळ नंतर अकोल्यात येऊन स्थिरावली व आता संपूर्ण महाराष्ट्रव्यापी झाली आहे.
याच अंकुर साहित्य संघाचे 60वे, म्हणजे हिरक महोत्सवी संमेलन धुळ्यात पार पडले; जणू मोर्णेचा प्रवाह पांझराकाठी पोहोचला.
डॉ पापलाल पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या संमेलनाच्या समारोपाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहताना या मंडळीचे मोठे कौतुक वाटले.
36 वर्षात 60 साहित्य संमेलने भरविणाऱ्या अंकुर संघाने जागोजागच्या साहित्यिकांना अभिव्यक्तीचे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. साहित्यिक विचार मंथनाखेरीज कथाकथन, कवी संमेलन, गझल मुशायरा, मुलाखत, व्यंगचित्र प्रदर्शन असे सारे प्रकार यात हाताळले गेले.
संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे, कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे, सुरेश लांडे, संजय कावरे, प्रा. मोहन काळे, मधुकर वडोदे, सदाशिव शेळके, शिवलिंग काटेकर, डॉ. प्रमोद काकडे, वासुदेवराव खोपडे, सुनील दिवनाले आदींचे परिश्रम, सक्रिय सहभाग व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे यांच्यासारख्यांच्या मार्गदर्शनातून 'अंकुर'ची चळवळ साहित्य प्रांतात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
कार्यवाहक प्रा. राम जाधव, निमंत्रक दत्तात्रय कल्याणकर व त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नातून हे संमेलन पांझराकाठी अंकुरले...
Congratulations to all...
#Ankur #KiranAgrawal #PanjhraDhule
Tuesday, November 1, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Oct. 30, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221030_2_2&fbclid=IwAR0bzQzJDErKazl-Rw3CJ1mgK3xQsbQdNx8vzFZF0ikCvwXg3CMVJvIpBdw
https://www.lokmat.com/editorial/how-does-water-fall-on-the-pot-a520-c310/?fbclid=IwAR2sA13CbFVtkw7LtJSASzYt-laTUqBRCEszvKZg6N1BtsZVWZ1YwVmo0Ys
किल्ल्यांनी जागविला इतिहास...
Nov. 25, 2022
किल्ल्यांनी जागविला इतिहास...
लोकमत कॅम्पस क्लब व श्री समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. यात प्रतापगड, रायगड, जंजिरा आदि किल्ल्यांच्या प्रतिकृती मुलांनी साकारल्या.
मातीत खेळू नका असे मुलांना घरी सांगितले जाते, पण या स्पर्धेच्या निमित्ताने बच्चे कंपनी छान मातीत खेळली, रंगली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, समर्थ पब्लिक स्कूलचे संचालक नितीन व जयश्री बाठे, मूर्तिकार शरद कोकाटे आदींच्या उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगीची ही आनंद चित्रे...
#LokmatAkola #FortMeking #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Oct. 23, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221023_6_2&fbclid=IwAR0UJl8PO4Z_zz3SQUf4JgsmBGuZBpQX8ldaffWY7a3LdABUTvC2W1rtou4
https://www.lokmat.com/editorial/lets-light-the-lamp-of-humanity-with-senses-a520-c310/?fbclid=IwAR09oRMNCezF40y29ZMkoVr9GlgtTXZDHXHz4lNKZHMD9lbTiqNsfQhMnjg
अंक नव्हे, उत्सव... लोकमत दीपोत्सव
Nov. 23, 2022
अंक नव्हे, उत्सव... लोकमत दीपोत्सव
दिवाळी अंकांच्या परंपरेत मराठीचा सन्मान वाढवीत 3 लाख प्रतींचा टप्पा ओलांडणारी सदाबहार मैफल म्हणजे लोकमत दीपोत्सव.
विषय व मांडणी यातील सर्वोत्कृष्टतेचा अनुभव देणारा वाचनानंद घ्यायचा तर हा अंक वाचायलाच हवा.
अकोला येथे लेबेन लाईफ सायन्सचे संचालक हरेश शाह, एमेराल्ड ग्रुपचे संचालक संजय तुलशान, ललित ट्युटोरियल्सचे संचालक प्रा. ललित काळपांडे, श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा. नितीन बाठे यांच्या हस्ते दीपोत्सव व हिंदीतील दिपभवचे प्रकाशन झाले. यावेळी समवेत लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड आलोककुमार शर्मा, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा, वितरण व्यवस्थापक प्रकाश वानखडे, जाहिरात मार्केटिंगचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश पांडे आदी. उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनीही त्यांच्या कार्यालयात दीपोत्सवचे प्रकाशन केले.
बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य.अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, तर वाशिम येथे पद्मश्री ना. चं. कांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी लोकमत समूह संपादक विजय बाविस्कर, प्रॉडक्ट् हेड पुष्कर कुलकर्णी, रिसर्च एडिटर प्रेमदास राठोड, स्टार डेस्क प्रमुख गजानन दिवाण, हॅलो हेड नंदकिशोर नारे, निलेश जोशी आदी उपस्थित होते.
दीपोत्सव व दिपभव खरेदीसाठी नजिकच्या लोकमत कार्यालयात किंवा स्थानिक वार्ताहर, वितरक यांच्याकडे संपर्क साधावा...
#LokmatAkola #LokmatDeepotsav2022
महागावचा माधव...
Nov 21, 2022
महागावचा माधव...
मेहकरवरून रिसोडमार्गे वाशिमला जाताना महागावच्या पुढे शेताच्या कडेला कच्च्या विटांच्या चौथर्यावर मोसंबी व सफरचंद घेऊन बसलेला एक ज्यूस विक्रेता तरुण भेटला, माधव दशरथराव हुंबाड त्याचे नाव.
त्याच्याशी चर्चा केली असता त्याची कहाणी मोठी प्रेरणादायी वाटली...
बीकॉम झालेला हा तरुण नोकरीच्या शोधात शहरात गेला, पण अखेर मुंबईत ऍपल व पुण्यात एलजी सारख्या मोठ्या कंपन्यातील नोकरी सोडून, गड्या आपला गावच बरा म्हणत घरी परतला. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याने रस्त्यावर असलेल्या शेताच्या कडेवर मोसंबी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
रिसोडच्या एलआयसीत असलेले कुणी देशमुख त्याला एके दिवशी भेटले. मोसंबी विक्रीपेक्षा मोसंबी ज्यूस विक्री केली तर दोन पैसे जास्त मिळतील असा सल्ला त्यांनी दिला, आणि माधवने ज्यूस विक्री सुरू केली.
आज प्रतिदिनी तीन ते पाच हजारापर्यंत त्याचा व्यवसाय होतो...
शहरात मजा नाही, गाव ते गावच असते असे तो मोठ्या अभिमानाने सांगतो.
माधव मुंबई, पुण्याची हवा खाऊन आल्याने बुजरेपण सोडून बोलका बनला.
40 वर्षांच्या आयुष्यात मोठ्या शहरात जाऊनही जे शिकायला मिळाले नाही, ते येथे ज्यूस विक्री करताना भेटलेल्या माणसांकडून शिकायला मिळाले म्हणाला.
काही दिवसांपूर्वी कोणी एक दिल्लीचे अनिल भारद्वाज नावाचे गृहस्थ सायकलने चालले होते. दुपारच्या टळटळीत उन्हात घामाने लदबदलेल्या त्या गृहस्थाला पाहून माधवचे मन कळवळले.
माधवने त्यांना आवाज देऊन बोलावले, खाटेवर बसवून जवळची भाजी भाकरी खाऊ घातली.
थोडा वेळ आराम करून ते गृहस्थ माधवचा नंबर व पत्ता घेऊन पुढच्या मार्गाला लागले.
दोनच दिवसांपूर्वी त्याचा फोन आला, की दिल्लीत गेल्यावर त्या गृहस्थाने माधवसाठी मोसंबीचा ज्यूस काढणारे ज्यूसर मशीन घेऊन पार्सलने रवाना केले आहे म्हणून...
आपण कुणाचे चांगले केले तर आपलेही चांगलेच होते, यावर माधवची श्रद्धा बसली.
त्रास देणारे जवळचेच असतात, बाहेरच्यांना जीव लावला तर तेही आपल्याला जीव लावतात, हे माधवला अनुभवाने शिकवले.
त्यामुळे व्यवसाय करताना रस्त्याने जाणारे रंजले गांजलेले जीव तो हेरतो व त्यांना पैसे न घेता ज्यूस पाजुन जमेल ती मदत करतो.
****
आमच्या गप्पा सुरू असतानाच माधवचे वडील दशरथराव म्हशीला चारायला शेतात घेऊन आले.
1970 च्या दशकात बीकॉम झालेले व वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या दशरथरावांना आम्ही लोकमतचे लोकं आहोत हे माधवने सांगताच, 'अहो तुमच्या लोकमतच्या कार्यक्रमात नानाने शिंदे साहेबाला काय भारी प्रश्न ईचारला...' असे ते उस्फूर्तपणे बोलून गेले.
लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेताना, तुम्ही राजकारणी इकडून तिकडे जाताना मतदाराच्या मताला काही किंमत आहे की नाही असा प्रश्न विचारला होता. तो संदर्भ दशरथरावांच्या बोलण्यात होता.
'लोकमत'चे तळागाळातही किती गांभीर्याने वाचन होते याचीच ही पावती होती.
त्यानंतर हल्लीचे राजकारण व समाजकारण यावर छान गप्पा झाल्या.
भगवान श्रीकृष्णाने घडविलेली लढाई ही कौरव व पांडवांमधली नव्हती, ती धर्म व अधर्मातील लढाई होती; तशीच लढाई आज देशात सुरू असल्याचे ते बोलून गेले.
आम्ही थक्कच झालो, त्यांची ही टिपण्णी ऐकून.
ग्रामीण भागातील जनतेच्या जाणीवाही किती प्रगल्भ आहेत, याचेच हे प्रत्यंतर होते.
#TourDiary #KiranAgrawalTourNotes
Subscribe to:
Posts (Atom)