Saturday, March 4, 2023

सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या अनेक...

Feb. 13, 2023 सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या अनेक...
जनतेच्या समस्यांचे निवारण करणाऱ्या शासकीय आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या कमी नाहीत. एकतर कमी मनुष्यबळात अतिरिक्त जबाबदारीने कामे निपटायची व दुसरीकडे अडीअडचणी, समस्या मांडायला गेले की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खपा मर्जीचा धोका. अशा स्थितीत हा घटक काम करीत असतो. लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त आयोजित संवाद सत्रात विविध सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेपासून ते रिक्त पदांवरील नेमणुकांचा अनुशेष भरून काढण्यापर्यंत अनेकविध प्रश्न पोट तिडकीने मांडलेत. यात मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नेरकर, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ कोरकने, जिल्हा सचिव संतोष कुटे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस सुनील जानोरकर, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष गिरीष मोगरे, जिल्हा सचिव राजू मालगे, कृषी सहायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश करस्कार, कृषी विभाग सहायक अधीक्षक संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य धीरज वाकोडे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश महामंत्री पी. बी. भातकुले, महानगरपालिकेतील म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष विठ्ठल देवकते, म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे पदाधिकारी विजय पारतवार, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवी काटे सहभागी झाले होते. #LokmatAkola #LokmatSamvad #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment