Saturday, March 4, 2023

अभिमान आहे आम्हास आमच्या या सहकारींचा...

feb. 16, 2023 अभिमान आहे आम्हास आमच्या या सहकारींचा...
लोकमतच्या संपादकीय विभागात काम करणाऱ्या सहकारींसाठी आमचे तरुण व कल्पक नेतृत्व, संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांनी 'स्टार परफॉर्मन्स सिस्टीम' अमलात आणली आहे, जी मानवी हस्तक्षेपाखेरीज सिस्टीमाईज पद्धतीने कामकाजाचे मूल्यमापन करून संबंधितांना स्टार मानांकने प्रदान करते. या सिस्टीमच्या माध्यमातून संपूर्ण लोकमत समूहात विदर्भातील हॅलो अकोला व हॅलो अमरावती या दोन पुरवण्यांना 'स्टार हॅलो'चे मानांकन लाभले. सर्वाधिक आनंदाची बाब म्हणजे, समूहात ज्या संपादकीय सहकारींना उत्कृष्ट कार्य कुशलतेचे 'स्टार अवॉर्ड 2022' घोषित झालेत, त्यात लोकमत अकोला आवृत्तीच्या सर्वाधिक पाच सहकाऱ्यांचा समावेश आहे. लोकमत व्यवस्थापनाच्या वतीने अमरावती येथे समूह संपादक मा. श्री. विजय बाविस्कर सर यांच्या हस्ते व अमरावतीचे वृत्त संपादक श्री गजानन चोपडे जी, युनिट हेड श्री सुशांत दांडगे जी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अकोल्याचे हॅलो हेड श्री राजेश शेगोकार, उपसंपादक नितीन गव्हाळे, अतुल जयस्वाल, बुलढाण्याचे भगवान वानखेडे, वाशिमचे संतोष वानखडे, खामगावचे योगेश देऊळकर यांच्यासह अमरावतीचे हॅलो हेड गणेश वासनिक, प्रदीप भाकरे, यवतमाळचे रुपेश उत्तरवार, सुरेंद्र राऊत, वर्धेचे चैतन्य जोशी, महेश सायखेडे यांचा स्टार अवॉर्ड सन्मानार्थीमध्ये समावेश आहे. अभिमान आहे आम्हास या सहकारींचा... Congratulations Dear all... #LokmatAkola #LokmatStarAwards2022 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment