Tuesday, March 21, 2023

रौप्यपूर्तीचा स्नेह सोहळा...

March 16, 2023 रौप्यपूर्तीचा स्नेह सोहळा...
'लोकमत'च्या अकोला आवृत्तीने वाचकांच्या पसंतीच्या बळावर पंचवीस वर्षांची रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण केली. या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त एमआयडीसीतील 'लोकमत भवन'च्या हिरवळीवर आयोजित स्नेह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून लोकमतवर शुभेच्छांचा वर्षाव केला, ज्यात आम्ही चिंब झालो. या स्नेहापुढे धन्यवाद शब्द खूपच तोकडा आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक, माजी खासदार ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची यावेळची उपस्थिती सर्वांनाच भारावून टाकणारी राहिली. माजी आमदार श्री लक्ष्मणराव तायडे, अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, कामगार आयुक्त डॉ. राजू गुल्हाने, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, महाबीजचे एमडी सचिन कलंत्री, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे आदी मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला.
सर्वश्री माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील, माजी महापौर विजय अग्रवाल, मदन भरगड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, पोस्ट खात्याचे प्रवर अधीक्षक संजय आखाडे, राजकीय नेते अशोक अमानकर, संग्राम भैय्या गावंडे, ज्ञानेश्वर भाऊ सुलताने, राजेश मिश्रा, प्रशांत वानखडे, साजिद खान पठाण, डॉ. संतोष हुसे, डॉ धैर्यवर्धन फुंडकर, कपिल रावदेव, डॉ.अभय पाटील, डॉ. सुधीर ढोणे, अतुल पवनीकर, मिलिंद इंगळे, सुनील फाटकर, साहित्यिक पुष्पराज दादा गावंडे, डॉ. रावसाहेब काळे, किशोर बळी, तुळशीदास खिरोडकर, शिक्षण क्षेत्रातील ललित काळपांडे, नितीन बाठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व संस्था संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रेम, लोकमतशी असलेला ऋणानुबंध व विश्वास हेच तर आमचे बळ व तीच आमची शक्ती! त्याच बळावर आजवरची ही रौप्य महोत्सवी वाटचाल यशोदायी झाली.
लोकमतचे संस्थापक संपादक तथा स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी वाचक हाच मालक समजून कार्य करण्याचा व 'पत्रकारिता परमो धर्म' जपण्याचा जो संस्कार रुजवला त्यानुसार आमची वाटचाल सुरू असून, यापुढेही ती याच भूमिकेतून सुरू राहील याची ग्वाही आम्ही या निमित्ताने देतो. लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन आदरणीय श्री विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ आदरणीय श्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटेवर तरुण नेतृत्व श्री देवेंद्रबाबूजी, श्री ऋषीबाबूजी व संपादकीय संचालक श्री करणबाबुजी दर्डा यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या वाटचालीस यापुढेही वाचकांचा असाच स्नेह लाभेल याचा विश्वास आहे. धन्यवाद वाचक व स्नेही जनहो, आपले हे प्रेम असेच कायम राहु द्या🙏 या स्नेह सोहळ्याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे...
#LokmatAkola #LokmatAkolaAnniversary2023 #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment