Tuesday, March 21, 2023

लोकमतचा कुटुंब कबिला...

लोकमतचा कुटुंब कबिला...
अकोला येथून 16 मार्च 1998 रोजी लोकमतची आवृत्ती सुरू झाली. त्यावेळी स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीसाठी काही सहकारी नागपूर व लगतच्या अमरावती येथून आले आणि येथेच रमले. दिवसांमागून दिवस गेले अनेक सहकारी आलेत आणि कारवा बनत गेला. कोणत्याही संस्थेसाठी निष्ठेने व समर्पण भावनेने काम करणारे असे सहकारी हीच खरी त्या संस्थेची शक्ती असते. लोकमत व्यवस्थापनाने तर या सर्वच सहकारींकडे कुटुंबाच्या भावनेने पाहिले व लक्ष दिले. रौप्य महोत्सव साजरा करतानाही हे सर्व सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दिलेल्या साथीची आवर्जून आठवण करीत कार्यकारी तथा संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्या संकल्पनेतून या कुटुंबकबिल्याचा स्नेह मेळावा आयोजिला गेला. रोजच्या कार्यालयीन व्यापातून बाजूला होत सर्वांनीच खूप धमाल केली. यावेळी लोकमतच्या आजवरच्या प्रवासातील काही ज्येष्ठ साथीदारांचा व विविध विभागांचा सन्मानही झाला.
#LokmatAkola #kiranAgrawalLokmat #LokmatAkolaSilverJubilee2023

No comments:

Post a Comment