Tuesday, March 21, 2023

श्री तुळशीराम जी गुट्टे महाराज भेट ...

March 08, 2023 श्री तुळशीराम जी गुट्टे लोकमत भेट
नाशिकच्या श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्री तुळशीराम जी गुट्टे महाराज यांनी आज अकोला लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. मनस्वी आनंद झाला. गुट्टे महाराज यांच्यासोबत माझा रावेर व नाशिकपासून स्नेहाचा ऋणानुबंध आहे. नाशिकला असताना त्यांनी माझ्या आग्रहावरून लोकमतसाठी गणेशोत्सवादरम्यान श्री गणेश स्तुती मालिका लिहिली होती, त्यानंतर लोकमत ऑनलाइनसाठीही मन या विषयावर मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखविणारी लेखमाला लिहिली, जिचे लवकरच संकलित स्वरूपातील पुस्तक येऊ घातले आहे. कसलीही बुवाबाजी न करता अध्यात्मिकतेला प्रागतिकतेशी जोडून संत चरित्र उलगडून सांगणारे, भजन भारुडांचे निरूपण करणारे युवा संत म्हणून डॉ. गुट्टे महाराज मला इतरांपेक्षा वेगळे वाटतात, म्हणूनच आमच्यातील स्नेह टिकून आहे. आज अमरावतीला निघाले असताना मी अकोल्यात असल्याची त्यांना आठवण झाली आणि ते खास भेटायला आले. आमचे युनिट हेड श्री आलोक कुमार शर्मा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला. त्यांना 'माझे विद्यापीठ' पुस्तकही भेट दिले. याप्रसंगी उप वृत्तसंपादक तथा हॅलो हेड श्री राजेश शेगोकार व अन्य सहकारी चर्चेत सहभागी झाले. #LokmatAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment