Thursday, March 30, 2023

वेदनेवर गुणकारी संवेदना...

March 26, 2023 वेदनेवर गुणकारी संवेदना...
वेदनेने कुणी विव्हळतो तेव्हा समोरच्याच्या संवेदना जाग्या होतातच. ही संवेदनाच आज महत्त्वाची आहे. त्या संवेदनेतून रुग्णावर केला जाणारा उपचार, दिली जाणारी दवा हीच दुवा मिळवून देते, ती अधिक मोलाची. अकोला येथील जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या शिखर सिंहावलोकन या स्नेहसंमेलनास विशेष अतिथी म्हणून जाण्याचा योग आला. अध्यक्षस्थानी प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. एस. एस. काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आयएमए अकोलाचे अध्यक्ष डॉ. अनुप कोठारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉ किशोर मालोकार, जीपीए अकोल्याचे संस्थापक सदस्य डॉ चंद्रकांत पनपालिया, सत्कार मूर्ती धनंजय भगत आदी मान्यवर व्यासपीठावर समवेत होते.
जीपीए चे अध्यक्ष डॉ. सुनील बिहाडे, सचिव डॉ. संदीप चव्हाण, प्रकल्प प्रमुख डॉ. योगेश पाटील व त्यांच्या टीमच्या कार्य कुशल संयोजनातून अतिशय उत्साहात हे शिखर सिंहावलोकन संमेलन पार पडले. साहित्यिक स्नेही डॉ. विनय दांदळे यांच्या आग्रहातून जाणे झाले. डॉ. अशोक ओळंबे, डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. राजेश देशमुख, डॉ. आनंद चतुर्वेदी, डॉ. अरुण पंड्या, लेबेन फार्मा.चे हरिषभाई शाह आदी अनेक मान्यवरांच्या यानिमित्ताने भेटी झाल्या. Thanks Dr. Dandale ji n GPA team.. #GPAAkola #KiranAgrawal

No comments:

Post a Comment