Tuesday, March 21, 2023

वाचकसेवेची रौप्यपूर्ती ...

March 16, 2023 वाचकसेवेची रौप्यपूर्ती ...
अकोला लोकमतचा आज 25वा वर्धापन दिन. वाचकसेवेची रौप्यपूर्ती. विशेष म्हणजे लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल जी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात असतानाच हा रौप्य महोत्सवाचा योग आला.
पत्रकारिता परमो धर्माची शिकवण देणाऱ्या श्रद्धेय बाबूजींना वंदन करून अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वराच्या चरणी रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित 'पंचविशी' ही पुरवणी व अंक अर्पण केला. युनिट हेड श्री आलोक कुमारजी शर्मा, हॅलो हेड राजेश शेगोकारजी, वितरण व्यवस्थापक प्रकाशजी वानखेडे, इव्हेंट हेड योगेश चौधरीजी, ऍड मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक संदीप दिवेकरजी, जाहिरात प्राप्ती विभागाचे प्रमुख गंगाधरजी राऊत, लेखा विभागाचे प्रमुख विनायकजी जोशी, संगणक विभाग प्रमुख येंडे जी, परीचालनचे संजय पिल्लेवारजी व अन्य सहकारी यांच्यासमवेतची काही आनंद चित्रे... #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatAkolaSilverJubilee2023

No comments:

Post a Comment