At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, July 31, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on July 30, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230730_2_6&fbclid=IwAR2MBDs69XM2nAqDfyEiTbFf4GQNHnFbDQrbxK8bselm6K6cFz_DMQN5obE
https://www.lokmat.com/editorial/administration-is-also-sensitive-to-loss-a-a520-c310/?fbclid=IwAR3bnCjOqCh8yACWhl-rDB-hUPaLEEKY5Kw098vG0S2XfTvjxr5R2ZUGhe4
Anvayarth published in Lokmat on July 26, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230726_6_3&fbclid=IwAR0qPT57M0TS3MSxlozT5qizXS7V2OVNsNMGDS9nVJqG6JhaBG-NrgP7ScY
https://www.lokmat.com/editorial/how-often-do-you-clap-and-clap-for-those-who-run-in-trouble-a-a520-c941/?fbclid=IwAR3OqR2KClZGblsONr6IrOD9S5I_Sgwvor-YB0qHh3BkufyzJdOPBCtCsFE
Monday, July 24, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on July 23, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230723_2_2&fbclid=IwAR3xQZNlcai0sEQ-bT7S6I-KlxAy25vcTQ4uDz4u3qqphqBKh7CjGXQOTro
https://www.lokmat.com/editorial/start-of-cultivation-through-election-of-party-office-bearers-a-a520-c310/?fbclid=IwAR0g-lLCBt3RYWYev4nJzb6e8f06cR2M8cs0TCptQ6VRZBoEq5PnzZYn8yY
Saraunsh published in Akola Lokmat on July 16, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230716_2_2&fbclid=IwAR1zvrGrh-O-8iT5asLVxetP5VUiygdmCkub4xYzSR_BCF-J6aKzeeHboCA
https://www.lokmat.com/editorial/due-to-the-rain-the-faces-of-the-roads-were-exposed-a-a520-c310/?fbclid=IwAR3xQZNlcai0sEQ-bT7S6I-KlxAy25vcTQ4uDz4u3qqphqBKh7CjGXQOTro
Wednesday, July 12, 2023
दृष्टी बदलो, दृष्टीकोन बदल जाएगा ...
july 09, 2023
दृष्टी बदलो, दृष्टीकोन बदल जाएगा ...
जात, पंथ, संप्रदाय की संकीर्णता बढ रही है, पर सारा खेल हमारी दृष्टि का है। हम हर व्यक्ती की ओर आज शक से देखने लगे है। यदि हम दृष्टि बदल देंगे, तो दृष्टिकोण भी बदल जाएगा।
हमारे मन एवं विचारों की अशुद्धि के कारण ही भाषा, धर्म एवं संप्रदायों से जुड़ी संकीर्णता को बढ़ावा मिलता है। संत, महापुरुषों के विचारों को यदि सही मायने में अपनाया और जीवन में उतारा जाए, इन्सानियत से जिया जाए तो जीवन की सारी नकारात्मकता समाप्त हो जाएगी...
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई द्वारा अकोला में आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी मे प्रमुख वक्ता के नाते अपने विचार रखने का मौका मिला।
अकादमी के कार्याध्यक्ष डाॅ. शीतला प्रसादजी दुबे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स क़े अध्यक्ष निकेश गुप्ता, अकादमी के सदस्य आनंद सिंहजी, डॉ संजय सिंहजी (मुंबई), पत्रकार संघ के अध्यक्ष शौकत अली मीरसाहेब, बिजीई सोसायटी के उपाध्यक्ष अभिजित परांजपे जी आदी महानुभावो का सानिध्य मिला।
साहित्य अकादमी क़े अशासकीय सदस्य, संगोष्ठी के आयोजक श्यामजी शर्मा के आग्रह के कारण यह सौभाग्य प्राप्त हुवा, साधुवाद श्याम जी...
#HindiSahityaAkadmi #KiranAgrawal
रेकॉर्ड करणारी स्पर्धा...
July 10, 2023
रेकॉर्ड करणारी स्पर्धा...
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल जी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज एकाच दिवशी राज्यभर लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्ट बिट चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या स्पर्धेची नोंद झाली आहे. तसे प्रमाणपत्र लोकमतच्या संपादकीय व कार्यकारी संचालक श्री करणबाबूजी दर्डा व इव्हेंट व्हर्टिकल हेड रमेश डेडवाल जी यांनी औरंगाबादेत स्वीकारले.
अकोला शहरात 14 शाळांमध्ये ही स्पर्धा घेतली गेली तर अकोला आवृत्ती कार्यक्षेत्रात 25 हजारांहून अधिक विद्यार्थी त्यात सहभागी झालेत.
अकोल्यातील नोएल स्कूलमध्ये या स्पर्धेदरम्यान भेट दिली व सहभागी विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला. यानिमित्ताने 'नोएल'चे संचालक श्री अनोश मनोहर, प्राचार्य अर्पणा डोंगरे व सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा विजय मनोहर यांच्याशीही संवाद साधता आला.
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat
#LokmatCampusClub
Saraunsh published in Akola Lokmat on July 09, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230709_2_2&fbclid=IwAR0TDaqATJDxleSl1dtzLLe54K5aBVXmpmtJ6i8XD5rBlP35--66IxgfBeY
https://www.lokmat.com/editorial/the-split-in-the-ncp-is-also-ticking-in-cooperation-a-a520-c310/?fbclid=IwAR2cJ6kk-kmn8hNDOYykrlQFV8xHQfSvK3x7jc7SIc-EK79h1gCPQiwJBh8
लोकमत वूमेन्स अचिव्हर्स अवॉर्डस 2023...
Jully 08, 2023
लोकमत वूमेन्स अचिव्हर्स अवॉर्डस 2023...
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा उमटविणाऱ्या भगिनींना 'लोकमत वुमन अचिव्हर अवॉर्ड्स 2023'ने एका शानदार समारंभात गौरविण्यात आले.
चिखलीच्या आमदार सौ श्वेता महाले, अकोलाच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, मराठी चित्रपट अभिनेत्री धनश्री कडगावकर, विठ्ठल ऑइल्सचे सिद्धार्थ रुहाटीया, पूनम ज्वेलर्सचे वरुण आलिमचंदानी, लोकमत अकोलाचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला.
लोकमत सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी महिलांमधील क्षमतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सखी मंचची स्थापना केली. आज सौ. आशु भाभीजी दर्डा अतिशय कुशलतेने या मंचचे नेतृत्व करीत आहेत. आमच्या भगिनी विविध क्षेत्रात किती सहजतेने व आत्मविश्वासाने यशाची शिखरे गाठत आहेत तेच या समारंभातील सन्मानार्थिंच्या निमित्ताने समाजासमोर आले.
याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे...
#LokmatAkola #LokmatWomensAchieversAwards2023 #KiranAgrawalLokmat
Monday, July 3, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on July 02, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230702_4_2&fbclid=IwAR1CkeFGZ7m4NSrZKxtLV9NZzqFL1KVGJffxfVZjc8UU8bMvzbjc8bN6mwk
https://www.lokmat.com/editorial/when-will-we-recognize-our-responsibility-a-a520-c310/?fbclid=IwAR0LKiy8BsmvlZzXUN-OPC6CzWPnXJtmVA_vPmEKq5YBmrwKh3-sv0-Ck1Q
प्रेरणादायी आधारवड...
02 July 2023
प्रेरणादायी आधारवड...
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, आमच्या लोकमत परिवाराचे आधारवड जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता.
अकोला औद्योगिक वसाहतीमधील लोकमत भवन व शहर कार्यालयात सर्व सहकारींसमवेत आमचे प्रेरणापुंज बाबूजींना अभिवादन केले.
जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होताना गेल्यावर्षी आजच्याच दिवशी लोकमत भवनच्या प्रांगणात आम्ही अनंताचे (Gardenia Jasminoides) रोपटे लावले होते, त्यालाही पाणी घालून देखभाल केली.
श्रद्धेय बाबूजींचे विचार व संस्कार हेच आम्हाला कायम प्रेरणा व ऊर्जा देत आहेत... शत शत नमन।
#LokmatAkola #JawaharlalDardaBirthCentenary
#KiranAgrawalLokmat
माणुसकी धर्माची पूजा बांधलेले महापुरुष !
02 July 2023
माणुसकी धर्माची पूजा बांधलेले महापुरुष !
सामाजिकच नव्हे तर कौटुंबिक जबाबदारीच्याही जाणीवा आज क्षीण होत चालल्या असून, दुसऱ्याच्या मतांचा आदर तर दूर; परंतु ते ऐकूनच न घेण्याची प्रवृत्तीही बळावत चालली आहे. अशात 'वसुधैव कुटुम्बकम'चा मंत्र आचरून पीड पराई जाणणाऱ्या व लोक'मता'चा आदर करण्याचा आदर्श प्रस्थापित करून गेलेल्या ज्या थोर व्यक्तित्वांचे स्मरण होणे स्वाभाविक ठरून जाते त्यातील एक नाव म्हणजे आमचे श्रद्धेय बाबूजी स्व. जवाहरलालजी दर्डा. स्वातंत्र्य सेनानी, राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ अनेकविध खात्यांची जबाबदारी सांभाळलेले मंत्री व 'लोकमत'सारख्या क्रमांक एकच्या वृत्तपत्राचे संस्थापक एवढीच बाबूजींची ओळख नसून, अखिल विश्वासाठी अनुकरणीय ठरलेला गांधीवाद जगलेले व आजच्याही काळात गरजेच्या ठरलेल्या माणुसकी धर्माची पूजा बांधलेले महापुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहता येणारे आहे. बाबूजींचे मोठेपण सामावलेले आहे ते त्यांच्या याच गुणधर्मात.
व्यक्तीचे व्यक्तित्व हे त्याच्या विचारासोबतच आचाराशी निगडित असते. बऱ्याचदा काही जणांबाबत विचाराप्रमाणे आचरण घडत नसल्याचे दिसून येते. उक्ती व कृतीत, म्हणजे 'कथनी व करनी'त फरक असला की अशी व्यक्ती लोकादरास पात्र ठरू शकत नाही. बाबूजी मात्र 'बोले तैसा चाले' या पंथातले होते. राजकारणाच्या मर्यादा त्यांना कधीच आड आल्या नाहीत. साधेपणा व असामान्यातही सामान्यपणा, हा त्यांचा दागिना होता. मंत्रिपदी असतानाही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत व तेदेखील सायकलीवर पाठवण्याची भूमिका ही त्यांच्या याच सामान्यपणातून आलेली दिसते. यासंदर्भातले त्यांचे हे एवढे एकच उदाहरण नाही, तर मी स्वतः अनुभवलेल्या एका प्रसंगाचाही दाखला देता येणारा आहे. नाशकात लोकमतच्या स्वतंत्र आवृत्तीचा प्रारंभ झाला त्यावेळी बाबूजी जवाहरलालजी दर्डा आलेले होते. गावातील विविध मान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारून झाल्यावर रात्री सर्व सहकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. यावेळी आम्ही वाढून आणून देऊ पाहिलेले ताट विनम्रपणे नाकारून ते स्वतः सर्व कर्मचाऱ्यांबरोबर रांगेत उभे राहिले व आपला नंबर आल्यावर त्यांनी जेवण घेतले. साधेपणासोबतच विनम्रतेचा संस्कार त्यांनी अशापद्धतीने आमच्या तरुण मनांवर आपल्या कृतीतून रुजवला.
---------------
लोकोत्तर महापुरुषांचे मोठेपण त्यांच्या विचारांत व निखळ - निकोप आपलेपणात कसे सामावलेले असते तेही या निमित्ताने आम्हास अनुभवयास मिळाले. नाशकात लोकमतने पाऊल ठेवले त्यावेळी तेथे 'गावकरी'चा बोलबाला होता. पण व्यावसायिक स्पर्धेचा तिळमात्रही विचार न करता त्यांची व दै. गावकरीचे संस्थापक, संपादक पत्रमहर्षी दादासाहेब पोतनीस या दोघा मान्यवरांमध्ये उशिरापर्यंत दिलखुलास गप्पांची मैफल रंगलेली आम्ही बघितली. विचारांची, भूमिकांची स्पष्टता असली की स्पर्धेची भीती बाळगण्याची गरज नसते हेच यातून दिसून आले. महत्वाचे म्हणजे, 'वाचक हाच आपला मालक आहे ही जाण मनात ठेवून वाचककेंद्री पत्रकारिता करा. लोकांच्या अडीअडचणी, दुःख, दैन्यावर विशेष भर द्या..', असे मोलाचे मार्गदर्शन बाबूजींनी यावेळी आम्हास केले. राजकारणात राहूनही आपल्या राजकारणासाठी वृत्तपत्राचा वापर न करता सामान्यांबद्दलच्या तळमळीतून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचा बाबूजींचा सल्ला म्हणजे 'पत्रकारिता परमो धर्मा'ची आमची जाण जागवणाराच होता.
----------------
'लोकमत'च्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवतानाही त्यांनी नेहमी लोक- मताचा आदरच केला. मंत्री म्हणून आपली जबाबदारी निभावताना वृत्तपत्रातील संपादक, सहकाऱ्यांच्या मतांना अव्हेरण्याची भूमिका त्यांनी कधी घेतली नाही. यासंदर्भात बुलडाण्यातील एक प्रसंग उद्धृत करता येणारा आहे. बाबूजी बुलडाण्याचे पालकमंत्री असताना शासनाच्या एका परिपत्रकानुसार जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत पत्रकारांना बसू न देण्याचा निर्णय घेतला गेला होता. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पत्रकारांनी समितीची बैठक आटोपल्यावर पालकमंत्री म्हणून बाबूजींना घेराव घातला, यात लोकमतचे पत्रकार सुभाष गादिया आघाडीवर होते, पण घेरावमधून बाहेर पडून परतीला निघताना बाबूजींनी गादिया यांना जवळ बोलावून घेतले व पत्रकार म्हणून बजावलेल्या कर्तव्याबद्दल 'गुड जॉब' म्हणत जणू प्रशस्तीपत्र दिले. सहकाऱ्यांना आपल्या मत प्रदर्शनासाठी अशी व इतकी मोकळीक देण्याच्या बाबुजींच्या या दिलदारपणातुन पर- मताचा आदर करण्याची शिकवण मिळून गेली. लोकमतमध्ये प्रकाशित अनेक बातम्यांबद्दल विधिमंडळात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना मंत्री म्हणून त्यांना उत्तरे देण्याची वेळ आली, पण राजकारण व पत्रकारिता यात त्यांनी कधी गल्लत केली नाही. लोकमत मधील आपल्या संपादकांचे व सहकाऱ्यांचे स्वातंत्र्य त्यांनी नेहमीच जपले.
मंत्रिपदाचा बडेजाव न मिरवता आपल्या साध्या राहणीतुन व कार्यातून जीवनाच्या अंतापर्यंत बाबूजींनी गांधीवाद जपला. आमच्यासारख्या अनेक मुलांमध्ये पत्रकारितेला केवळ चरितार्थाचे व नोकरीचे साधन न समजता समाज ऋण फेडण्याचे माध्यम असल्याचा संस्कार रुजवला. त्यांनीच घालून दिलेल्या आदर्शाच्या वाटेवरुन आज लोकमतची व आमच्यासारख्या असंख्य पत्रकारांची वाटचाल सुरू आहे.
----------------
आज त्यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता होते आहे.
बाबूजींना विनम्र अभिवादन...
- किरण अग्रवाल
कार्यकारी संपादक, लोकमत अकोला
Saraunsh published in Akola Lokmat on June 25, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230625_6_13&fbclid=IwAR0fmaacfSAMWl_Bmw_u8JICFBv3_CotJR6TEJsYtD4z7aA6R2vBNqIoIj4
https://www.lokmat.com/editorial/dont-break-the-rules-start-tankers-a-a520-c310/?fbclid=IwAR0M59AKug7mOcRCpDtGQwta87vZdE8s1uUWSYFdvXMVBrtBD2-eKs4ldZg
करिअरच्या वाटा अनेक...
23 June 2023
करिअरच्या वाटा अनेक...
ज्यांची मुले बारावी उत्तीर्ण झाली आहेत त्यांच्यासाठी सध्या बारावीनंतर पुढे काय, असा भला मोठा प्रश्न आहे.
मेडिकल, इंजीनियरिंग, सीए याखेरीजही करिअरचे मोठे अवकाश आहे, पण ते अनेकांना माहीतच नाही. कौशल्य विकास हा आपल्याकडे कायमच दुर्लक्षित राहिलेला विषय आहे.
बारावीनंतरचा करिअरचा मंत्र सांगण्यासाठीच लोकमत व पुण्यातील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या वतीने मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. विजय नवले, प्रा. डॉ. संदीप पाटील, प्रा संजय मापारी, प्रा. गणेश तरटे, प्रा. सचिन शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
#lokmatAkola #KiranAgrawalLokmat
#PCU #PCET
योगाने प्रसन्न झाली पहाट...
21 june 2023
योगाने प्रसन्न झाली पहाट...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज लोकमत व शिवतेज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने नेहरू पार्क येथे आयोजित योग शिबिरात सहभागी होऊन पहाटेची प्रसन्नता अनुभवता आली.
योगगुरू मनोहरनाथ इंगळे यांनी यावेळी अतिशय सहज व सुलभपणे योगासने करवून घेत योगाचे आरोग्य व मनशांतीसाठीचे महत्व विषद केले. प्रख्यात सामाजिक नेते, श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रामप्रसाद मिश्रा यांच्याहस्ते या शिबिराचे उदघाटन झाले.
योग हा केवळ एक दिवस करण्याचा भाग नसून, तो जगण्याच्या दैनंदिनीतील अविभाज्य विषय ठरायला हवा याची जाणीव यानिमित्ताने पुन्हा झाली.
#LokmatAkola #InternationalYogaDay #KiranAgrawalLokmat #LokmatYoga
Subscribe to:
Posts (Atom)