Wednesday, July 12, 2023

रेकॉर्ड करणारी स्पर्धा...

July 10, 2023 रेकॉर्ड करणारी स्पर्धा...
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल जी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज एकाच दिवशी राज्यभर लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्ट बिट चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या स्पर्धेची नोंद झाली आहे. तसे प्रमाणपत्र लोकमतच्या संपादकीय व कार्यकारी संचालक श्री करणबाबूजी दर्डा व इव्हेंट व्हर्टिकल हेड रमेश डेडवाल जी यांनी औरंगाबादेत स्वीकारले. अकोला शहरात 14 शाळांमध्ये ही स्पर्धा घेतली गेली तर अकोला आवृत्ती कार्यक्षेत्रात 25 हजारांहून अधिक विद्यार्थी त्यात सहभागी झालेत. अकोल्यातील नोएल स्कूलमध्ये या स्पर्धेदरम्यान भेट दिली व सहभागी विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला. यानिमित्ताने 'नोएल'चे संचालक श्री अनोश मनोहर, प्राचार्य अर्पणा डोंगरे व सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा विजय मनोहर यांच्याशीही संवाद साधता आला. #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatCampusClub

No comments:

Post a Comment