Wednesday, July 12, 2023

लोकमत वूमेन्स अचिव्हर्स अवॉर्डस 2023...

Jully 08, 2023 लोकमत वूमेन्स अचिव्हर्स अवॉर्डस 2023...
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा उमटविणाऱ्या भगिनींना 'लोकमत वुमन अचिव्हर अवॉर्ड्स 2023'ने एका शानदार समारंभात गौरविण्यात आले. चिखलीच्या आमदार सौ श्वेता महाले, अकोलाच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, मराठी चित्रपट अभिनेत्री धनश्री कडगावकर, विठ्ठल ऑइल्सचे सिद्धार्थ रुहाटीया, पूनम ज्वेलर्सचे वरुण आलिमचंदानी, लोकमत अकोलाचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला.
लोकमत सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी महिलांमधील क्षमतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सखी मंचची स्थापना केली. आज सौ. आशु भाभीजी दर्डा अतिशय कुशलतेने या मंचचे नेतृत्व करीत आहेत. आमच्या भगिनी विविध क्षेत्रात किती सहजतेने व आत्मविश्वासाने यशाची शिखरे गाठत आहेत तेच या समारंभातील सन्मानार्थिंच्या निमित्ताने समाजासमोर आले. याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे...
#LokmatAkola #LokmatWomensAchieversAwards2023 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment