Monday, July 3, 2023

योगाने प्रसन्न झाली पहाट...

21 june 2023 योगाने प्रसन्न झाली पहाट...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज लोकमत व शिवतेज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने नेहरू पार्क येथे आयोजित योग शिबिरात सहभागी होऊन पहाटेची प्रसन्नता अनुभवता आली. योगगुरू मनोहरनाथ इंगळे यांनी यावेळी अतिशय सहज व सुलभपणे योगासने करवून घेत योगाचे आरोग्य व मनशांतीसाठीचे महत्व विषद केले. प्रख्यात सामाजिक नेते, श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रामप्रसाद मिश्रा यांच्याहस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. योग हा केवळ एक दिवस करण्याचा भाग नसून, तो जगण्याच्या दैनंदिनीतील अविभाज्य विषय ठरायला हवा याची जाणीव यानिमित्ताने पुन्हा झाली.
#LokmatAkola #InternationalYogaDay #KiranAgrawalLokmat #LokmatYoga

No comments:

Post a Comment