Monday, November 25, 2024

LIVE : Maharashtra Election Result : खान्देशात 'मविआ'च्या दिग्गजांचं पानिपत... महायुतीचा दणदणीत विजय


 

LIVE : Maharashtra Results | खान्देशात कोणता फॅक्टर चालणार... जनमताचा कौल कुणाला? Jalgaon


 

LIVE : Jalgaon Regional Dairy | राजकीय वारसदार विधानसभेच्या परीक्षेत पास होतील का?


 

LIVE :Jalgaon Assembly Polls |वाढीव मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर? Maharashtra Election Result


 

खान्देशात महायुतीचं पारडं जड का? Khandesh Vidhan Sabha | Mahayuti vs Maha Vikas Aghadi | PR2


 

एकनाथ खडसे-गिरीश महाजनांची परीक्षा का | Jalgaon Regional Diary | Eknath Khadse | Girish Mahajan |PR2


 

Sunday, October 27, 2024

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 27 Oct. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20241027_6_1&fbclid=IwY2xjawGLNF9leHRuA2FlbQIxMAABHQtHg5ok4TIFcjJMCFAxEwS35ldHsvKGE4VzUGHGbAHLdiKI59r0Gfn0ug_aem_VyIFer64S5Lb2X8ToIl6-g

लोकमत दीपोत्सव दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन..

Oct 22, 2024 लोकमत दीपोत्सव दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन..
प्रतीक्षा संपली, दिवाळी आली; 'लोकमत दीपोत्सव'ही आला. तीन लाख प्रतींचा खप ओलांडणारा अंक नव्हे, उत्सव... #दीपोत्सव! #खुर्ची .. सत्तेपासून सेक्सपर्यन्त एका बेधुंद खेळाचा भन्नाट शोध... @lokmat #लोकमतदीपोत्सव **** जळगावमध्ये या अंकाचे प्रकाशन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य डॉ.विजय दर्डा, माजी मंत्री सुरेशदादा जैन तसेच प्रदीप आहुजा, मेजर नाना वाणी, माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी, सिद्धार्थ बाफना, माजी महापौर रमेशदादा जैन, राजा मयूर, प्रमोद चांदसरकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. बाजारात, लोकमत वार्ताहर/ विक्रेत्यांकडे, बुक स्टॉल्सवर दीपोत्सव उपलब्ध झाला आहे. ऑनलाइन खरेदीचीही सोय आहेच... यंदाच्या दिवाळीत आपल्या मित्र मैत्रिणींना हमखास द्या ही वैचारिक मेजवानी... Kiran Agrawal #Khurchi #LokmatDeepotsav

लोकमत सखींचा रौप्य महोत्सव...

Oct. 18, 2024 लोकमत सखींचा रौप्य महोत्सव...
लोकमत सखी मंच बघता बघता रौप्य महोत्सवी वर्षाच्या टप्प्यावर पोहोचला. लोकमतच्या वाचक परिवारातील महिला भगिनींना त्यांची कार्यकुशलता व क्षमता सिद्ध करण्यासाठी स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देत श्रीमती ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी 'लोकमत सखी मंच'ची स्थापना केली. 'या मनातलं बोलूया..' अशी साद घालत आकारास आलेला हा मंच म्हणजे ज्योत्स्ना भाभीजींच्या सहृदय व संवेदनशील भावनेचा उत्कट असा प्रत्ययच आहे. जळगावमधील प्रख्यात समाजसेवी स्व. भिकमचंदजी जैन कुटुंबातील संस्काराचा वसा व वारसा लाभलेल्या ज्योत्स्ना भाभीजींनी वात्सल्य व करुणेचा हुंकार भरीत या मंचच्या माध्यमातून लाखो सखींच्या कलागुणांना वाव मिळवून दिला. आकाश कवेत घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ भरले.
आज 25व्या वर्षाच्या प्रारंभाच्या टप्प्यावर पोहोचताना संपूर्ण राज्यात तब्बल पाच लाखांहून अधिक सखी यात सहभागी झाल्या आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ करताना 'लोकमत सखी'च्या नवीन लोगोचे अनावरण जळगाव येथे एका शानदार समारंभात करण्यात आले. जळगाव हे ज्योत्स्ना भाभीजींचे माहेर. त्यामुळे या कार्यक्रमाला होती एक भावनिक किनार. भाभीजींच्या सहवास व सहृदयतेच्या आठवणी जागवत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. एरव्हीही 'लोकमत सखी'चा कार्यक्रम म्हटला की आनंद व उत्साहाचा खळखळता अविष्कारच अनुभवयास मिळतो. यातही तसेच झाले. बिग बॉसमधील स्पर्धक व विविध मालिकांमधील अभिनेत्री मीना जगन्नाथ हिची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळची काही सहभाग चित्रे... Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatSakhi #LokmatSakhiJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 20 Oct. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20241020_2_1&fbclid=IwY2xjawGLMfxleHRuA2FlbQIxMAABHa6ntmOv0KRqFRj5aj6idXiWPRjre4aT52_-LN3ZgwA8TgvyZtrIh7CT3w_aem_ukAHO4K__uF_w9sfF1qiYQ

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 13 Oct. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20241013_2_1&fbclid=IwY2xjawGLMZpleHRuA2FlbQIxMAABHQtHg5ok4TIFcjJMCFAxEwS35ldHsvKGE4VzUGHGbAHLdiKI59r0Gfn0ug_aem_VyIFer64S5Lb2X8ToIl6-g

स्तब्ध करून जाणारा नाट्यमय प्रवास !

Oct. 05, 2024 स्तब्ध करून जाणारा नाट्यमय प्रवास !
काही शब्द आणि रचना अशा असतात, की ज्या अस्वस्थ करून जातात. त्यातूनच अंतर्मुख व्हायला भाग पडते. असाच एक अनुभव आला तो आमच्या जळगावच्या अतिशय ताकदीच्या व संवेदनशील नाट्यकर्मी शंभूदादा पाटील यांच्या एका प्रयोगातून. **** इतिहास काळातील अपाला, मदर मेरी, हिपेशीया, रबिया, लैला, मैमून अशी स्त्री पात्रे, त्यांचे दु:ख, वेदना सांगत अश्रूंना वाट मोकळी करून देत पुढे सरकत जाणारा नाट्यमय प्रवास... अनेकांना स्तब्ध करून गेला. निमित्त होते, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (केसीई) संचलित कान्ह ललित कला केंद्र आयोजित आणि परिवर्तन निर्मित 'भिजकी वही' या कवी अरुण कोल्हटकर यांच्या कवितांवर आधारीत नाट्यमय सादरीकरणाचे आणि तेही नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या स्त्री सन्मानाच्या जागराच्या पार्श्वभूमीवर. **** खूप परिणामकारक असा हा प्रयोग आहे. त्यात सुदीप्ता सरकार, मंजुषा भिडे, सोनाली पाटील, जयश्री पाटील, मोना तडवी, अंजली पाटील, नेहा पवार व विकास वाघ यांनी खूप ताकदीने विविध पात्रे साकारली आहेत. कार्यक्रमाची संकल्पना हर्षदा कोल्हटकर यांची होती. दिग्दर्शक नारायण बाविस्कर, नेपथ्य मंगेश कुलकर्णी, प्रकाश योजना राहुल निंबाळकर, रंगमंचव्यवस्था गणेश सोनार, पवन भोई यांची होती. अर्थातच, सूत्रधार शंभू पाटील. ****
यानिमित्ताने 'केसीइ' सोसायटीच्या कॅम्पसमध्ये प्रथमच जाणे झाले. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे दादांनी स्वागत केले. शिक्षण क्षेत्र व अध्यात्मावर यावेळी त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील आदी यावेळी समवेत होते. Thanks Shambhudada... आपल्या आग्रहामुळेच हा योग घडून आला. #KiranAgrawal #BhijkiVahi #KCESocietyJalgaon

लोकमत Political Icons of Khandesh 2024

Oct. 03, 2024 लोकमत Political Icons of Khandesh 2024
राजकारण हे आता 24 तास अखंडित सेवेचे क्षेत्र बनले आहे. नेतेपण सोपे राहिले नाही, कारण जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अशाही स्थितीत राजकीय वारसा लाभलेल्यांपासून ते नवोदितांपर्यंत अनेक जण विकासासाठी व समाजसेवेसाठी राजकारण म्हणून या क्षेत्रात करिअर घडवू पाहात आहेत. लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र सेनानी श्रद्धेय बाबूजी तथा जवाहरलालजी दर्डा यांच्या शिकवणुकीनुसार 'पत्रकारिता परमो धर्म' जपत पत्रकारिता करतानाच समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची भूमिका लोकमत व्यवस्थापनाने नेहमी घेतली आहे. याच भूमिकेतून खान्देशातील राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची पताका फडकविणाऱ्या मान्यवरांना जळगाव येथे विशेष समारंभात #लोकमतPoliticalIconsofKhandesh2024 ने गौरविण्यात आले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खा. स्मिता वाघ, आ. अमरीशभाई पटेल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खा. उल्हास पाटील, उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी समवेत होते. पॉलिटिकल आयकॉन्सच्या व्यक्ती चित्रणाचे कॉफीटेबल बुकही यावेळी प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगीची काही आनंद चित्रे... Kiran Agrawal
#KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 06 Oct. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20241006_4_1&fbclid=IwY2xjawGLKIdleHRuA2FlbQIxMAABHd6-YMO8DCmNRQOpQlw9enEoN_XXfjg3uwnHFHTnrH-RziZAvo8NewTYVw_aem_NPPh30G5rhTXCx1VuQmzZg

लोकमत प्रिन्सिपॉल्स मिट 2024

Oct. 02, 2024 लोकमत प्रिन्सिपॉल्स मिट 2024
लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांशी संवादाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या शिक्षण पद्धतीमुळे परीक्षार्थी घडतो आहे, पण शिक्षकांनी प्रयत्न केले तर आदर्श नागरिक घडू शकतील. नीतिमूल्य, संस्कारांची शिकवण त्यासाठी गरजेची आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वाचन चळवळ टिकवून ठेवण्याचे काम शाळा शाळांमधूनच घडून येऊ शकेल. वाचाल तर वाचाल ही भूमिका घेऊन त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत... इति मुद्यांवर छान चर्चा झाली. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatCampusClub #LokmatPrincipalsMeet2024

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 29 Sept. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20240929_2_1&fbclid=IwY2xjawGLJmFleHRuA2FlbQIxMAABHQtHg5ok4TIFcjJMCFAxEwS35ldHsvKGE4VzUGHGbAHLdiKI59r0Gfn0ug_aem_VyIFer64S5Lb2X8ToIl6-g

लोकमत लोकप्रज्ञा अवार्ड्स...

Sept 29, 2024 लोकमत लोकप्रज्ञा अवार्ड्स...
लोकमत परिवारातील विविध विभागात काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना देण्यात येणाऱ्या लोकमत लोकप्रज्ञा अवार्ड्सचे मोठ्या उत्साहात वितरण केले गेले. लोकमततर्फे सरपंच ते संसद सदस्यांपर्यंत विविध अवॉर्ड्स दिले जातात. त्याचप्रमाणे लोकमत परिवारातील सहकारींच्या प्रतिभावान मुलांसाठी कार्यकारी व संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांनी लोकमत लोकप्रज्ञा अवॉर्ड्सची सुरुवात केली आहे. जळगाव येथील 'लोकमत भवन'मध्ये दर्जी क्लासेसचे संचालक गोपाल दर्जी व डंबेलकर्स क्लासेसचे अमित डंबेलकर यांच्या उपस्थितीत या अवॉर्ड्सचे वितरण करण्यात आले. Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatLokpradnyaAwards2024

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 22 Sept. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20240922_2_2&fbclid=IwY2xjawGLJTdleHRuA2FlbQIxMAABHW3vuiyHo95ihsh6Kq_ImL8oIA7-JUIOMngX5FjzNcpJ4mTB726l8ZGuiQ_aem_RlMhoU2A5AgujteffroxRA#google_vignette

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 15 Sept. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20240915_2_2&fbclid=IwY2xjawGLJFxleHRuA2FlbQIxMAABHbMq4SM9FXagOynmoUl2wivyQjmLAZXhiGiLG701Qtqb_7eubiBkhdsg0A_aem_2hctvbO_-MSFZsGFmWWeNQ

गणपती बाप्पा मोरया...

Sept 14, 2024 गणपती बाप्पा मोरया...
लोकमततर्फे जळगाव येथील स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या अंगणात स्थापित 'ती'चा गणपती बाप्पांचे विसर्जन महिला भगिनींच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सजविलेल्या बैलगाडीतून बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगिनींनी ढोल ताशाच्या गजरावर ताल धरला. गणेशोत्सव सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.
या मंगल प्रसंगी सहकारींसमवेतची काही चित्रे... ।। ..गणपती बाप्पा मोरया.. ।। #LokmatJalgaon #LokmatTichaGanpati #LokmatSakhiManch #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

राज्यपाल महोदयांसोबतची भेट...

Sept 11, 2024 राज्यपाल महोदयांसोबतची भेट...
क्षेत्र कोणतेही असो, चाकोरीच्या पलीकडे जाऊन काम करणारी व्यक्तीच लक्षवेधी ठरून जात असते. यातच राज्यपाल महोदयांसारखी राज्याच्या प्रमुख पदावरील महनीय व्यक्ती असेल तर ती बाब खास ठरल्याशिवाय राहात नाही. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे दौरे करून प्रोटोकॉलच्या मर्यादा आड न येऊ देता विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला व त्यांच्या भावना, समस्या, अपेक्षा जाणून घेऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राज्याच्या घटनादत्त अधिकार पदावरील सर्वोच्च व्यक्ती आपल्या गावी येऊन आपल्याशी संवाद साधते, आपले म्हणणे ऐकून व समजून घेते ही बाब राजकारणेतर लोकांसाठी खूप समाधानाची तसेच आशादायी ठरते. मा. राज्यपालांच्या या दौऱ्यातूनही तेच घडले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जळगाव येथे आले असता काही संपादक व पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. विभागीय आयुक्त प्रवीण कुमार गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी समवेत होते. याप्रसंगीची ही आनंद चित्रे... #GovernorInJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

ती'चा गणपती...

Sept, 09, 2024 ती'चा गणपती...
पूजेचे ताट 'ती'च सजवते आणि पुरुषांच्या हाती देते, ही झाली नेहमीची परिपाठी. पण या 'ती'लाच 'श्रीं'च्या स्थापनेचा, पूजेचा व विसर्जनाचाही मान देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला तो लोकमत सखी मंचने; कारण 'ती' आहे शक्ती स्वरूपा. महिलांना त्यांचे स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी सौ. ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी स्थापन केलेला लोकमत सखी मंच म्हणजे महिलांच्या स्वयंसिद्धतेची एक चळवळच बनली आहे. या चळवळीला पुढे नेण्यासाठीच लोकमततर्फे खास 'ती'चा गणपती उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
जळगाव येथील स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या अंगणात यासाठी प्रतिदिनी माता भगिनींचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सोमवारी रांगोळीसह मोदक स्पर्धा पार पडल्या. नेहमीपेक्षा कितीतरी वेगवेगळे मोदक यावेळी बघावयास व चाखावयास मिळालेत. खासदार स्मिताताई वाघ व आमदार राजूमामा भोळे आदींच्या हस्ते सायंकाळची आरती करण्यात आली. ।। ..गणपती बाप्पा मोरया.. ।। #LokmatJalgaon #LokmatTichaGanpati #LokmatSakhiManch #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 08 Sept, 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20240908_2_2&fbclid=IwY2xjawGLIJRleHRuA2FlbQIxMAABHc2xZw7sFRRGzDzDErG1BRrQ2J2SmncowDBppYNrLDorZk3QDbSx5hGxLA_aem_6sUXPcvooEOeZRLit0qlow
https://www.lokmat.com/editorial/ganeshotsav-editorial-article-a-a520-c941/?fbclid=IwY2xjawGLINVleHRuA2FlbQIxMAABHbMq4SM9FXagOynmoUl2wivyQjmLAZXhiGiLG701Qtqb_7eubiBkhdsg0A_aem_2hctvbO_-MSFZsGFmWWeNQ

वाजत गाजत आले श्री गणराया...

Sept 07, 2024 वाजत गाजत आले श्री गणराया...
जळगाव लोकमत कार्यालयात बाप्पांची स्थापना ... हे गजानना गणराया सर्वांच्याच सर्व दुःखांचे हरण कर हीच प्रार्थना! #LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

Friday, September 6, 2024

पांझराकाठी धुळे लोकमतचा वर्धापन दिन ... 2024

26 August 2024 पांझराकाठी धुळे लोकमतचा वर्धापन दिन ...
पांझरा नदीच्या काठी वसलेल्या, आई एकविरा देवीचे स्थान महात्म्य लाभलेल्या व प्रख्यात अभियंता सर विश्वेश्वरय्या यांनी वसविलेल्या धुळे येथे 'लोकमत'चे विभागीय कार्यालय सुरू होऊन तब्बल चार दशकांचा काळ लोटला. चाळीस वर्षांच्या या वाटचालीत लोकमत अनेक स्थित्यंतरांचा साक्षीदार ठरला. या 40व्या वर्धापन दिनानिमित्त लोकमत वाचकांसाठी आयोजिलेल्या वर्धापनदिन सोहळ्यास धुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हा कार्यक्रम होता त्या दिवशी पांझरेला पूर आलेला असल्याने गावाशी जोडणाऱ्या रहदारीच्या तीनही पुलांवरून पाणी वाहत होते, वाहतूक बंद होती; पण राज्य महामार्गावरून वळसा घालून येत लोकमतवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी कार्यक्रमस्थळ गाठले व लोकमतवरील स्नेह प्रदर्शित केला. ****
ज्येष्ठ नेते, शिक्षण क्षेत्रात 'शिरपूर पॅटर्न' निर्माण करणारे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ धरती देवरे, धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, केशरानंद समूहाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरवणीचे प्रकाशन व कार्य कर्तृत्ववानांचा गौरव करण्यात आला. 'लोकमत'ला लाभलेले वाचकप्रियतेचे पाठबळ व स्नेहाबद्दल धन्यवाद धुळेकर. #LokmatJalgaon #LokmatDhule #HelloDhule #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon