Friday, September 6, 2024

पांझराकाठी धुळे लोकमतचा वर्धापन दिन ... 2024

26 August 2024 पांझराकाठी धुळे लोकमतचा वर्धापन दिन ...
पांझरा नदीच्या काठी वसलेल्या, आई एकविरा देवीचे स्थान महात्म्य लाभलेल्या व प्रख्यात अभियंता सर विश्वेश्वरय्या यांनी वसविलेल्या धुळे येथे 'लोकमत'चे विभागीय कार्यालय सुरू होऊन तब्बल चार दशकांचा काळ लोटला. चाळीस वर्षांच्या या वाटचालीत लोकमत अनेक स्थित्यंतरांचा साक्षीदार ठरला. या 40व्या वर्धापन दिनानिमित्त लोकमत वाचकांसाठी आयोजिलेल्या वर्धापनदिन सोहळ्यास धुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हा कार्यक्रम होता त्या दिवशी पांझरेला पूर आलेला असल्याने गावाशी जोडणाऱ्या रहदारीच्या तीनही पुलांवरून पाणी वाहत होते, वाहतूक बंद होती; पण राज्य महामार्गावरून वळसा घालून येत लोकमतवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी कार्यक्रमस्थळ गाठले व लोकमतवरील स्नेह प्रदर्शित केला. ****
ज्येष्ठ नेते, शिक्षण क्षेत्रात 'शिरपूर पॅटर्न' निर्माण करणारे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ धरती देवरे, धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, केशरानंद समूहाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरवणीचे प्रकाशन व कार्य कर्तृत्ववानांचा गौरव करण्यात आला. 'लोकमत'ला लाभलेले वाचकप्रियतेचे पाठबळ व स्नेहाबद्दल धन्यवाद धुळेकर. #LokmatJalgaon #LokmatDhule #HelloDhule #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment