At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Friday, September 6, 2024
पांझराकाठी धुळे लोकमतचा वर्धापन दिन ... 2024
26 August 2024
पांझराकाठी धुळे लोकमतचा वर्धापन दिन ...
पांझरा नदीच्या काठी वसलेल्या, आई एकविरा देवीचे स्थान महात्म्य लाभलेल्या व प्रख्यात अभियंता सर विश्वेश्वरय्या यांनी वसविलेल्या धुळे येथे 'लोकमत'चे विभागीय कार्यालय सुरू होऊन तब्बल चार दशकांचा काळ लोटला.
चाळीस वर्षांच्या या वाटचालीत लोकमत अनेक स्थित्यंतरांचा साक्षीदार ठरला.
या 40व्या वर्धापन दिनानिमित्त लोकमत वाचकांसाठी आयोजिलेल्या वर्धापनदिन सोहळ्यास धुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत शुभेच्छांचा वर्षाव केला.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी हा कार्यक्रम होता त्या दिवशी पांझरेला पूर आलेला असल्याने गावाशी जोडणाऱ्या रहदारीच्या तीनही पुलांवरून पाणी वाहत होते, वाहतूक बंद होती; पण राज्य महामार्गावरून वळसा घालून येत लोकमतवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी कार्यक्रमस्थळ गाठले व लोकमतवरील स्नेह प्रदर्शित केला.
****
ज्येष्ठ नेते, शिक्षण क्षेत्रात 'शिरपूर पॅटर्न' निर्माण करणारे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ धरती देवरे, धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, केशरानंद समूहाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरवणीचे प्रकाशन व कार्य कर्तृत्ववानांचा गौरव करण्यात आला.
'लोकमत'ला लाभलेले वाचकप्रियतेचे पाठबळ व स्नेहाबद्दल धन्यवाद धुळेकर.
#LokmatJalgaon #LokmatDhule #HelloDhule #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Jalgaon Lokmat on 01 Sept. 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20240901_2_2&fbclid=IwY2xjawFH1B5leHRuA2FlbQIxMAABHQCncaE248nB-w3CjoJTpQ852YEof33NtlqKO0eZ0Khul6LShDaBoqktnw_aem_NAwA1ep57h2U5MSpMnWWAw
क्रांतिभूमी अमळनेरमधील वर्धापनदिन... 2024
24 August 2024
क्रांतिभूमी अमळनेरमधील वर्धापनदिन...
स्वातंत्र्यासोबतच शैक्षणिक, वैचारिक, कामगार क्षेत्रात क्रांती घडविणारा तालुका व परिसर म्हणजे अमळनेर.
थोर स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी यांची कर्मभूमी तर दानशूर व शिक्षणप्रेमी प्रताप शेठ, उद्योग गंगेचे प्रवर्तक हशिम प्रेमजी, अजीम प्रेमजी यांचे हे गाव.
ज्ञानगंगा असलेले प्रताप विद्यामंदिर व तत्वज्ञान केंद्र तसेच खान्देशचे पंढरपूर म्हणवले जाणारे प. पू. सखाराम महाराजांचे वाडी संस्थान येथे आहे.
अशा अतिशय लौकिक प्राप्त भूमीत 'लोकमत'च्या विभागीय कार्यालयाने 17 वर्षे पूर्ण केलीत.
****
या वर्धापनदिन सोहळ्याला माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, वाडमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, सरपंच चंद्रकला पाटील, महिला नेत्या ज्योती पावरा, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, शिवसेनेच्या राज्य संघटक ॲड. ललिता पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, माजी नगराध्यक्ष सौ. जयश्री पाटील, पोलीस निरीक्षक विकास देवरे, समाजसेवी बजरंगलाल अग्रवाल, पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, जयवंत पाटील आदींची उपस्थिती लाभली.
लोकमत या परिसरातील विकासाचा व अनेक घटना घडामोडी व स्थित्यंतराचा साक्षीदार राहिला असल्याची भावना व्यक्त करीत लोकमतवरील स्नेह सर्वांनी व्यक्त केला.
याप्रसंगी लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांना अभिवादन व पुरवणी प्रकाशन प्रसंगीची काही आठवण चित्रे...
#LokmatJalgaon #LokmatAmalner #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon
चाळीसगावच्या गोतावळ्याची स्नेहभेट...
22 August 2024
चाळीसगावच्या गोतावळ्याची स्नेहभेट...
गिरणामाईच्या प्रवाहाचे वरदान व सातमाळची अभेद्य तटबंदी लाभलेला आणि आदिशक्ती पाटणादेवी तसेच रामायणकार महर्षी वाल्मीकींच्या वास्तव्याची पुण्याई असलेला परिसर चाळीसगाव ...
अशा पुण्यभूमीत लोकमतच्या विभागीय कार्यालयाचा 21वा वर्धापनदिन साजरा झाला.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. येथेच मी घडलो. त्यामुळे जळगाव खान्देश आवृत्तीच्या कार्य. संपादकपदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रथमच चाळीसगावमध्ये येणे झाले व 35/ 40 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्यात.
जुन्या मित्रांच्या गळाभेटी झाल्यात. मने भरून आलीत, कंठ दाटून आला. निमंत्रण पत्रिकेवरील कार्यक्रमाची वेळ संपून गेली तरी भेटणाऱ्यांचा गोतावळा सरला नव्हता. बाहेर जोराचा पाऊस कोसळत होता आणि आत कार्यक्रमस्थळी शुभेच्छांची बरसात सुरू होती. स्नेहाचे ते बंध अजूनही गहिरे असल्याची प्रचिती यातून आली.
या प्रेम व स्नेहापेक्षा आणखी काय हवे?
****
यावेळी वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित 'प्रगतीच्या वाटा' या पुरवणीचे प्रकाशन व विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री एम. के. अण्णा पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण, निवृत्त न्यायमूर्ती संगीतराव पाटील, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, पोलीस अधिकारी संदीप पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, लोकमतमधील सहकारी उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी त्यासाठी समवेत होते.
चाळीसगावमधील ज्येष्ठ सहकारी संजय सोनार, जिजाबराव वाघ, रविंद्र वरखेडे, पिलखोडचे निंबा सोनार, पाचोर्याचे श्यामकांत सराफ, भडगावचे अशोक परदेशी, कजगावचे प्रमोद ललवाणी आदींच्या परिश्रमातून हा योग घडून आला.
Thanks Dear All...
#LokmatJalgaon #LokmatChalisgaon #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Jalgaon Lokmat on 25 August 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20240825_2_2&fbclid=IwY2xjawFHzvxleHRuA2FlbQIxMAABHS-A3oIZES7pTEs0DHoIg1T7kf-oI-YIYY7xBl7W9HBs2Q5ML9wseWVFRQ_aem_jgVqm3fwz_NAMko3rm0DoQ
Saraunsh published in Jalgaon Lokmat on 18 August 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20240818_2_2&fbclid=IwY2xjawFHzqtleHRuA2FlbQIxMAABHd2S1Wexqcq_nvGTS9Pc_sxDsB8uZEwYpVzTl_NwuaYiG8jo4bbqTylinw_aem__VP9ltypcy76Z5-HRfsw3Q
जळगावमधील 'हिमालये'...
13 August 2024
जळगावमधील 'हिमालये'...
पूर्वी टीव्हीवर 'ताज'ची एक जाहिरात यायची, पंडित झाकीर हुसेन असलेली. 'वाह ताज.. बस नाम ही काफी है...'
काही व्यक्तित्व अशीच असतात, की ज्यांचं नावच पुरेसं असतं. हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असलेल्या जळगावातील अशा दिग्गजांशी एकाचवेळी भेटीचा योग जुळून आला तो लोकमत व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने आयोजित सूर्यदत्त एक्सलेंस अवॉर्ड्स 2024च्या निमित्ताने...
लोकमत जळगावच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच, म्हणजे अगदी अल्पावधीतच हा योग जुळून आला हे अतिशय आनंददायी ठरले.
शिक्षणाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पुण्याच्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया यांनी ठिकठिकाणच्या अशा हिमालयीन उंचीच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा लोकमतच्या साथीने व माध्यमातून गौरव करून त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्याची भूमिका घेतली आणि हा कार्यक्रम घडून आला.
सुशील अत्रे, डॉ हेमकांत बाविस्कर, शंभू पाटील, यजुर्वेन्द्र महाजन, डॉ प्रदीप जोशी, डॉ के. बी. पाटील, अनिल कांकरिया, डॉ सई नेमाडे, भरत अमळकर, अनिल भोकरे, अपर्णा भट, देवेश भैय्या, प्रणीलसिंह चौधरी, सुबोध चौधरी, दीपक चांदोरकर, अद्वैत दंडवते, अशोक गाडे, डॉ सागर जावळे, सुधा काबरा, डॉ आकाशा कुलकर्णी, धीरज महाजन, अभिलाष नागला, समाधान पाटील, राहुल सोनवणे, विजयकुमार वाणी, निशा जैन... या व्यक्तिमत्त्वांचा खरेच परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, अशा उत्तुंग कर्तृत्वाची गाथा आहे ही मंडळी. त्यांचा यावेळी गौरव केला गेला.
जळगावच्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये शानदार सोहळ्यात माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हासदादा पवार तसेच सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ अधिकारी प्रा. प्रशांत पितालिया, प्रा. मंदार दिवाने, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
याप्रसंगीची ही गौरव चित्रे...
#SuryadattaExcellenceAwards2024 #LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon #SuryadattaAwardsJalgaon
धुळ्यात सूर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड्सचे वितरण ..
13 August 2024
धुळ्यात सूर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड्सचे वितरण ..
नाविन्य आणि संशोधनाच्या बळावर विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाची अमिट छाप उमटविणाऱ्या मान्यवरांचा धुळे येथील गणपती पॅलेस मध्ये एका शानदार समारंभात लोकमत व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने सूर्यदत्त एक्सलेंस अवॉर्ड्स 2024 ने गौरव करण्यात आला.
सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ अधिकारी प्रा. प्रशांत पितालिया, प्रा. मंदार दिवाने, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, लोकमत धुळ्याचे हॅलो हेड राजेंद्र शर्मा याप्रसंगी समवेत होते.
कॅन्सरवर मात करून जागतिक सौंदर्य स्पर्धेत विजेती ठरलेली धुळ्याची भूमिकन्या नमिता कोहोक, प्राचार्य हितेंद्र पाटील, प्राचार्य डॉ नितीन हसवानी, दीपक अहिरे, डॉ. प्रशांत बागुल, डॉ नरेंद्र भदाणे, चैत्राम पवार, डॉ सुशील महाजन आदी दिग्गजांचा गौरवार्थित समावेश आहे.
#SuryadattaExcellenceAwards2024 #LokmatDhule #KiranAgrawalLokmatJalgaon #SuryadattaAwardsDhule
भुसावळ लोकमत कार्यालय वर्धापनदिन... 2024
12 August 2024
भुसावळ लोकमत कार्यालय वर्धापनदिन...
सूर्यकन्या तापीमाईच्या प्रवाहाचे वरदान आणि आदिशक्ती आईसाहेब संत मुक्ताईंच्या पुनीत वास्तव्याची पुण्याई लाभलेला भुसावल परिसर...
रेल्वेचे माहेरघर व केळीचे आगर अशी या परिसराची सर्वदूर ख्याती आहे, पण त्याखेरीजही येथे खूप काही आहे व हा भाग वेगाने विकसित होतो आहे.
या पुण्यभूमीतील लोकमतच्या विभागीय कार्यालयाचा 24वा वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला.
जळगाव खानदेश आवृत्ती सुवर्ण महोत्सवी उंबरठ्यावर आहे, आणि भुसावल मधील लोकमत विभागीय कार्यलयाने रौप्य महोत्सवी 25व्या वर्षात पदार्पण केले आहे.
खान्देश आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे स्वीकारताच मला या सोहळ्यास उपस्थितीची अनोखी संधी लाभली. यावेळी गौरव कर्तृत्वाचा अशी एक पुरवणीही प्रकाशित करण्यात आली. आपल्या परिश्रमाने व समाजसेवेद्वारे स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटविणाऱ्या मान्यवरांचा गौरव या निमित्ताने 'लोकमत'तर्फे केला गेला.
यावेळी आमदार शिरिषदादा चौधरी, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील, रेल्वेच्या डीआरएम इति पांडेय, सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, उद्योजक विश्वनाथ अग्रवाल, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, रेल्वेचे वाणिज्य अधिकारी अजय कुमार, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी मान्यवरांसमवेतची काही आनंदचित्रे...
#LokmatJalgaon #HelloBhusawal #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Jalgaon Lokmat on 11 August 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20240811_2_2&fbclid=IwY2xjawFHyOZleHRuA2FlbQIxMAABHfrQ3UdzG5oHvj_b9mrh8J1NJOiVGv1o4ZikrEX8heCJb4nNiy371Uzd1A_aem_X82X6EjFtLFkH6b785OFBA
लोकमत सखी श्रावण सोहळा @ अकोला 2024
लोकमत सखी श्रावण सोहळा @ अकोला
महिलांच्या मनातील श्रावणाचा आनंद लुटायला लावणारा
लोकमत सखी मंचचा श्रावण सोहळा @ अकोला
उदघाटनप्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांना अभिवादन करताना मान्यवर...
#LokmatShrawanSohla2024 #LokmatAkola
Saraunsh published in Akola Lokmat on August 04, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240804_2_3&fbclid=IwY2xjawFHxXFleHRuA2FlbQIxMAABHf-wSbgn8ule55CmrtBBJXNU9oZaY5W7m0aXhtgxYDLIJpE-JpGpqvpTAw_aem_nEtsB7vH6TX_sX8xFmt2Eg
https://www.lokmat.com/editorial/what-is-the-use-of-extreme-political-aggression-a-a520-c310/?fbclid=IwY2xjawFHxclleHRuA2FlbQIxMAABHQCncaE248nB-w3CjoJTpQ852YEof33NtlqKO0eZ0Khul6LShDaBoqktnw_aem_NAwA1ep57h2U5MSpMnWWAw
'लोकमत समाचार'चा रजतोत्सव...
Jully 27, 2024
'लोकमत समाचार'चा रजतोत्सव...
लोकमतचे भावंड, हिंदी दैनिक लोकमत समाचार अकोला आवृत्तीनेही आपल्या वाटचालीचा रजत महोत्सवी टप्पा ओलांडला.
वऱ्हाडच्या मातीत लोकमत आले आणि त्या पाठोपाठ दोन वर्षांनी लोकमत समाचारची आवृत्तीही सुरू झाली. तिला बघता बघता पंचवीस वर्षे पूर्ण झालीत.
25 वर्ष का लंबा सफर तय कर के समाचार ने न केवल पत्रकारिता परमो धर्म को निभाया है, बल्की राष्ट्रभाषा हिंदी को मजबूत और प्रखर करने का कार्य भी किया है।
इस रजतयात्रा के सफलता का श्रेय 'समाचार' पर अपना स्नेह लुटाने वाले सुधी पाठको को ही जाता है। आप सभी पाठको का दिल की गहराई से धन्यवाद...
रजत जयंती महोत्सव के अवसर पर लोकमत समाचार के सीनियर एडिटर विकासजी मिश्र, असोसिएट एडिटर देवेशजी ठाकूर, अकोला के प्रभारी अरुणकुमारजी सिन्हा, युनिट हेड आलोककुमारजी शर्मा एवम गणमान्य महानुभावो के साथ बिताये रजत पल की कुछ स्मृतिया...
#LokmatAkola #LokmatSamacharAkola #LSAkolaRajatMahotsav
Sunday, September 1, 2024
Subscribe to:
Posts (Atom)