Friday, September 6, 2024

धुळ्यात सूर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड्सचे वितरण ..

13 August 2024 धुळ्यात सूर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड्सचे वितरण ..
नाविन्य आणि संशोधनाच्या बळावर विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाची अमिट छाप उमटविणाऱ्या मान्यवरांचा धुळे येथील गणपती पॅलेस मध्ये एका शानदार समारंभात लोकमत व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने सूर्यदत्त एक्सलेंस अवॉर्ड्स 2024 ने गौरव करण्यात आला. सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ अधिकारी प्रा. प्रशांत पितालिया, प्रा. मंदार दिवाने, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, लोकमत धुळ्याचे हॅलो हेड राजेंद्र शर्मा याप्रसंगी समवेत होते. कॅन्सरवर मात करून जागतिक सौंदर्य स्पर्धेत विजेती ठरलेली धुळ्याची भूमिकन्या नमिता कोहोक, प्राचार्य हितेंद्र पाटील, प्राचार्य डॉ नितीन हसवानी, दीपक अहिरे, डॉ. प्रशांत बागुल, डॉ नरेंद्र भदाणे, चैत्राम पवार, डॉ सुशील महाजन आदी दिग्गजांचा गौरवार्थित समावेश आहे. #SuryadattaExcellenceAwards2024 #LokmatDhule #KiranAgrawalLokmatJalgaon #SuryadattaAwardsDhule

No comments:

Post a Comment