Friday, September 6, 2024

क्रांतिभूमी अमळनेरमधील वर्धापनदिन... 2024

24 August 2024 क्रांतिभूमी अमळनेरमधील वर्धापनदिन...
स्वातंत्र्यासोबतच शैक्षणिक, वैचारिक, कामगार क्षेत्रात क्रांती घडविणारा तालुका व परिसर म्हणजे अमळनेर. थोर स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी यांची कर्मभूमी तर दानशूर व शिक्षणप्रेमी प्रताप शेठ, उद्योग गंगेचे प्रवर्तक हशिम प्रेमजी, अजीम प्रेमजी यांचे हे गाव. ज्ञानगंगा असलेले प्रताप विद्यामंदिर व तत्वज्ञान केंद्र तसेच खान्देशचे पंढरपूर म्हणवले जाणारे प. पू. सखाराम महाराजांचे वाडी संस्थान येथे आहे. अशा अतिशय लौकिक प्राप्त भूमीत 'लोकमत'च्या विभागीय कार्यालयाने 17 वर्षे पूर्ण केलीत. ****
या वर्धापनदिन सोहळ्याला माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, वाडमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, सरपंच चंद्रकला पाटील, महिला नेत्या ज्योती पावरा, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, शिवसेनेच्या राज्य संघटक ॲड. ललिता पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, माजी नगराध्यक्ष सौ. जयश्री पाटील, पोलीस निरीक्षक विकास देवरे, समाजसेवी बजरंगलाल अग्रवाल, पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, जयवंत पाटील आदींची उपस्थिती लाभली. लोकमत या परिसरातील विकासाचा व अनेक घटना घडामोडी व स्थित्यंतराचा साक्षीदार राहिला असल्याची भावना व्यक्त करीत लोकमतवरील स्नेह सर्वांनी व्यक्त केला. याप्रसंगी लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांना अभिवादन व पुरवणी प्रकाशन प्रसंगीची काही आठवण चित्रे... #LokmatJalgaon #LokmatAmalner #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment