Friday, September 6, 2024

चाळीसगावच्या गोतावळ्याची स्नेहभेट...

22 August 2024 चाळीसगावच्या गोतावळ्याची स्नेहभेट...
गिरणामाईच्या प्रवाहाचे वरदान व सातमाळची अभेद्य तटबंदी लाभलेला आणि आदिशक्ती पाटणादेवी तसेच रामायणकार महर्षी वाल्मीकींच्या वास्तव्याची पुण्याई असलेला परिसर चाळीसगाव ... अशा पुण्यभूमीत लोकमतच्या विभागीय कार्यालयाचा 21वा वर्धापनदिन साजरा झाला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. येथेच मी घडलो. त्यामुळे जळगाव खान्देश आवृत्तीच्या कार्य. संपादकपदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रथमच चाळीसगावमध्ये येणे झाले व 35/ 40 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्यात. जुन्या मित्रांच्या गळाभेटी झाल्यात. मने भरून आलीत, कंठ दाटून आला. निमंत्रण पत्रिकेवरील कार्यक्रमाची वेळ संपून गेली तरी भेटणाऱ्यांचा गोतावळा सरला नव्हता. बाहेर जोराचा पाऊस कोसळत होता आणि आत कार्यक्रमस्थळी शुभेच्छांची बरसात सुरू होती. स्नेहाचे ते बंध अजूनही गहिरे असल्याची प्रचिती यातून आली. या प्रेम व स्नेहापेक्षा आणखी काय हवे? ****
यावेळी वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित 'प्रगतीच्या वाटा' या पुरवणीचे प्रकाशन व विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री एम. के. अण्णा पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण, निवृत्त न्यायमूर्ती संगीतराव पाटील, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, पोलीस अधिकारी संदीप पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, लोकमतमधील सहकारी उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी त्यासाठी समवेत होते. चाळीसगावमधील ज्येष्ठ सहकारी संजय सोनार, जिजाबराव वाघ, रविंद्र वरखेडे, पिलखोडचे निंबा सोनार, पाचोर्‍याचे श्यामकांत सराफ, भडगावचे अशोक परदेशी, कजगावचे प्रमोद ललवाणी आदींच्या परिश्रमातून हा योग घडून आला. Thanks Dear All... #LokmatJalgaon #LokmatChalisgaon #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment