Friday, September 6, 2024

जळगावमधील 'हिमालये'...

13 August 2024 जळगावमधील 'हिमालये'...
पूर्वी टीव्हीवर 'ताज'ची एक जाहिरात यायची, पंडित झाकीर हुसेन असलेली. 'वाह ताज.. बस नाम ही काफी है...' काही व्यक्तित्व अशीच असतात, की ज्यांचं नावच पुरेसं असतं. हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असलेल्या जळगावातील अशा दिग्गजांशी एकाचवेळी भेटीचा योग जुळून आला तो लोकमत व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने आयोजित सूर्यदत्त एक्सलेंस अवॉर्ड्स 2024च्या निमित्ताने...
लोकमत जळगावच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच, म्हणजे अगदी अल्पावधीतच हा योग जुळून आला हे अतिशय आनंददायी ठरले. शिक्षणाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पुण्याच्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया यांनी ठिकठिकाणच्या अशा हिमालयीन उंचीच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा लोकमतच्या साथीने व माध्यमातून गौरव करून त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्याची भूमिका घेतली आणि हा कार्यक्रम घडून आला. सुशील अत्रे, डॉ हेमकांत बाविस्कर, शंभू पाटील, यजुर्वेन्द्र महाजन, डॉ प्रदीप जोशी, डॉ के. बी. पाटील, अनिल कांकरिया, डॉ सई नेमाडे, भरत अमळकर, अनिल भोकरे, अपर्णा भट, देवेश भैय्या, प्रणीलसिंह चौधरी, सुबोध चौधरी, दीपक चांदोरकर, अद्वैत दंडवते, अशोक गाडे, डॉ सागर जावळे, सुधा काबरा, डॉ आकाशा कुलकर्णी, धीरज महाजन, अभिलाष नागला, समाधान पाटील, राहुल सोनवणे, विजयकुमार वाणी, निशा जैन... या व्यक्तिमत्त्वांचा खरेच परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, अशा उत्तुंग कर्तृत्वाची गाथा आहे ही मंडळी. त्यांचा यावेळी गौरव केला गेला.
जळगावच्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये शानदार सोहळ्यात माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हासदादा पवार तसेच सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ अधिकारी प्रा. प्रशांत पितालिया, प्रा. मंदार दिवाने, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगीची ही गौरव चित्रे... #SuryadattaExcellenceAwards2024 #LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon #SuryadattaAwardsJalgaon

No comments:

Post a Comment