Friday, September 6, 2024

भुसावळ लोकमत कार्यालय वर्धापनदिन... 2024

12 August 2024 भुसावळ लोकमत कार्यालय वर्धापनदिन...
सूर्यकन्या तापीमाईच्या प्रवाहाचे वरदान आणि आदिशक्ती आईसाहेब संत मुक्ताईंच्या पुनीत वास्तव्याची पुण्याई लाभलेला भुसावल परिसर... रेल्वेचे माहेरघर व केळीचे आगर अशी या परिसराची सर्वदूर ख्याती आहे, पण त्याखेरीजही येथे खूप काही आहे व हा भाग वेगाने विकसित होतो आहे. या पुण्यभूमीतील लोकमतच्या विभागीय कार्यालयाचा 24वा वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला.
जळगाव खानदेश आवृत्ती सुवर्ण महोत्सवी उंबरठ्यावर आहे, आणि भुसावल मधील लोकमत विभागीय कार्यलयाने रौप्य महोत्सवी 25व्या वर्षात पदार्पण केले आहे. खान्देश आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे स्वीकारताच मला या सोहळ्यास उपस्थितीची अनोखी संधी लाभली. यावेळी गौरव कर्तृत्वाचा अशी एक पुरवणीही प्रकाशित करण्यात आली. आपल्या परिश्रमाने व समाजसेवेद्वारे स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटविणाऱ्या मान्यवरांचा गौरव या निमित्ताने 'लोकमत'तर्फे केला गेला. यावेळी आमदार शिरिषदादा चौधरी, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील, रेल्वेच्या डीआरएम इति पांडेय, सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, उद्योजक विश्वनाथ अग्रवाल, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, रेल्वेचे वाणिज्य अधिकारी अजय कुमार, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी मान्यवरांसमवेतची काही आनंदचित्रे... #LokmatJalgaon #HelloBhusawal #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment