Monday, June 7, 2021

कोकरे आनंदली...

३० मे रोजी ४:४९ PM वाजता · नाशिक ·
कोकरे आनंदली... अकोल्यात गेल्यानंतर सुमारे महिनाभराने आज रजा घेऊन घरी म्हणजे नाशकात आलोय. दोन्ही कोकरं जाम खुश आहेत, आल्या आल्या बिलगलीत. त्यांना सोडून इतके दिवस बाहेर कधी गेलो नव्हतो. मागे दहा वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल मधील लोकसभा निवडणुका कव्हर करायला गेलो होतो, परंतु तेव्हा तो दौरा पंधरा-वीस दिवसांचाच होता. त्यामुळे कौटुंबिक डिस्टंसिंगचा हाच आजवरचा दिर्घ कालावधी. आईची आठवण आली यानिमित्ताने. नाशकात असतांना उशिरा जरी ऑफिसवरून येत असलो तरी मी आल्यावर ती मध्यरात्री उठून दोन घटका माझ्यासोबत घालवून, बोलून मग पुन्हा झोपायला जायची. तीच माया लेकींची. आईची उणीव त्या भरून काढताहेत. मी अकोल्यात गेल्यापासून रोज दोन्हीवेळच्या डब्यात काय भाजी आली, डबा पूर्ण खाल्ला ना; याचा अहवाल घेतल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नाही. लेकींमध्ये आईचे वात्सल्य, बहिणीची माया, पत्नीचे प्रेम, मैत्रिणीचा हट्ट ... असे सारे काही एकवटलेले असते; ते असे. म्हणूनच म्हणतो... माझ्या लेकी, माझा अभिमान... #ShrutiKruti #KirananandNashik

No comments:

Post a Comment