Sunday, June 27, 2021

लोकमत रक्ताचं नातं...

15 June, 2021 #लोकमत_रक्ताचं_नातं.
स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती दिनापासून (2 जुलै) सुरू होणाऱ्या रक्तदान मोहिमेच्या लोगोचे अनावरण काल जागतिक रक्तदाता दिनी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रीपदी असतानाही कार्यकर्त्यासारखी धडपड सदोदित करणारे व ज्यांच्या समाजकारण तसेच राजकारणाची सुरुवातच रक्तदानासारख्या पुण्य कार्याने झाली, अशा बच्चुभाऊ यांच्या हस्ते या मोहीमेच्या जनजागरणाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मित्तल इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीराम मित्तल, सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले, लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा, जाहिरात विभागाचे विदर्भ प्रमुख आसमान सेठ, उप वृत्तसंपादक राजेश शेगोकार, वरिष्ठ उपसंपादक राजरत्न शिरसाठ यांच्यासमवेतची ही आनंदचित्रे ..., #AkolaLokmat #LokmatBloodDonation #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment