Sunday, June 27, 2021

दिलासादायी व पंखात बळ भरणारी भेट...

25 June, 2021 दिलासादायी व पंखात बळ भरणारी भेट...
लोकमतचे एडिटर इन चीफ श्री. राजेंद्र बाबूजी दर्डा यांनी आज बुलडाणा, खामगाव व अकोला येथे भेटी देत संपादकीय विभागातील सहकाऱ्यांबरोबरच विविध मान्यवरांशीही हृद्य संवाद साधला ... कोरोनाच्या संकटातही पत्रकारिता परमो धर्माला जागत सेवा बजावणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करीत मा. बाबूजींनी आगामी काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी पंखात बळ भरले. 'आजचा दिवस उद्या असणार नाही, काही झाले तरी माणुस हिम्मत हारणार नाही...' असा दुर्दम्य आशावाद जागवत त्यांनी सर्व सहकारींना प्रेरणा व दिलासादायी मार्गदर्शन केले. कोरोना अजून पूर्णतः गेलेला नसताना आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी दौऱ्यावर निघालेल्या बाबूजींनी यानिमित्ताने पुन्हा लोकमत परिवाराच्या भावनेला बळकटी दिली. यावेळी त्यांनी अकोला येथील सहकारी श्री प्रवीण खेते व गजानन अवस्थी यांना कोरोना योद्धे म्हणून गौरवपत्रही प्रदान केले.
Washim visit.. #AkolaLokmat #RajendraDarda #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment