Monday, June 14, 2021

कादंबरीकार पुष्पराज गावंडे : लोकमत भेट

June 13, 2021 कादंबरीकार पुष्पराज गावंडे : लोकमत भेट
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे नवनियुक्त सदस्य तथा पहिल्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी आज लोकमत कार्यालयात येऊन त्यांची 'यलाई' कादंबरी भेट दिली. सुमारे दहा वर्षांपूर्वी, म्हणजे 2009 मध्ये त्यांनी लोकमतमध्ये 'काळी माती पांढरं सोनं' हा स्तंभ लिहिला होता अशी आठवण या निमित्ताने माझे सहकारी राजू चिमणकर यांनी करून दिली. कोरोना काळात राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रेडीओ खंडाळा उपक्रम राबविलेले जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुलसीदास खिरोडकर हेदेखील त्यांच्यासमवेत होते. साहित्य व पत्रकारिता अशा विविध विषयांवर गप्पा मारताना अकोल्यातील साहित्य चळवळीची धडपड गावंडे यांनी निदर्शनास आणून दिली. या चळवळीला लोकमतचे नेहमीच पाठबळ लाभत आले आहे, यापुढेही ते राहीलच... #AkolaLokmat

No comments:

Post a Comment