Monday, June 7, 2021

Kiran Digital Cartoon ..

4 जून 2021 रोजी ९:५६ AM वाजता ·
कला कोणतीही असो, ती आनंद देणारी तर असतेच शिवाय जगण्याचे साधनही ठरते. ती कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही. नाशिक जिल्ह्याच्या वनसगाव मधील प्रणव सातभाई या युवा कलाकाराचेही तसेच झाले म्हणायचे. एसवाय ला असलेल्या मास मीडियाच्या या युवकाला फोटोग्राफीत करिअर करायचे आहे, तो त्याचा आवडता छंद; पण कोरोना व लॉकडाउनच्या काळात तो घरात बसल्या बसल्या डिजिटल पेंटिंगकडे वळला व गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत सुमारे चारशेहून अधिक व्यक्तिरेखांचे पेंटिंग त्याने साकारले. शरद पवार, राज ठाकरे या राजकीय नेत्यांपासून ते आशाताई भोसले, नाना पाटेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यात समावेश आहे. संकटाच्या, निराशेच्या मर्यादा कलेच्या आड येत नाहीत, हेच प्रणवनेही दाखवून दिले आहे. आता तर त्याला चक्क विदेशातूनही ऑफर्स यायला लागल्या हे आनंददायी आहे. Keep it up Pranav... God bless you Dear

No comments:

Post a Comment