Sunday, June 20, 2021

प्रा. मधू जाधव ... लोकमत भेट

18 June 2021, at 10:22 ·
चळवळीतून आलेल्या व्यक्तीला स्वस्थता माहीतच नसते. धडपड व कळकळ हा तिचा स्थायिभाव बनून गेलेला असतो. माझे स्नेही, साथी प्रा. मधू जाधव यांच्याशी प्रदीर्घ काळानंतर झालेल्या भेटीतूनही हाच अनुभव आला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड येथे ते प्राध्यापकी करत असताना भोंदूगिरी करणार्‍या हनुमान बाबाला आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून एक्सपोज केले होते. त्यानंतर आमचे बऱ्याचदा फोनवर बोलणे झाले, पण प्रत्यक्ष भेट नव्हती. मी अकोल्यात आलो आहे हे समजल्यावर ते मुद्दाम भेटायला आले. चळवळीच्या मुशीतून घडलेले जाधव सर हे रंगकर्मी, व्याख्याते, समीक्षक, पत्रकार आदी भूमिकांतून गेलेले; त्यामुळे भरपूर गप्पा झाल्या. समाजाप्रतीची कळकळ व काहीतरी करण्याची त्यांची धडपड अजूनही टिकून असल्याचे या चर्चेत प्रकर्षाने दिसून आले. जाता जाता त्यांनी लिहिलेली 'चौफेर कलम' तसेच 'चौफेर व नाट्यांगण' ही दोन पुस्तके ते भेट देऊन गेले. आता निवांतपणे ती पुस्तके वाचणार आहे मी ... #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment