Sunday, June 27, 2021

कुलगुरू डॉ. भाले यांची सदिच्छा भेट

21 June, 2021 कुलगुरू डॉ. भाले यांची सदिच्छा भेट
शेतीला उद्योगाचा दर्जा मिळो न मिळो, पण कोरोनाच्या संकटात बाकी सारे उद्योग-व्यवसाय ध्वस्त होत असताना शेतीची शाश्वतता अधोरेखित होऊन गेली आहे. या शेती क्षेत्रात कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान पुरविण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याबाबतीत केलेले काम अतुलनीय असे आहे. या विद्यापीठाने आतापावेतो अन्न धान्यासह फळे, फुले, भाजीपाल्याचे सुमारे 165 पेक्षा अधिक नवीन बियाणे विकसित केले असून, शेती विषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास भाले सर यांची आज सदिच्छा भेट घेतली. शाश्वत व सेंद्रिय शेती यासह शेतीपुढील आव्हाने आदी विषयांवर मोकळेपणे व विस्ताराने चर्चा झाली. समवेत मुख्य उपसंपादक राजरत्न शिरसाट होते. लोकमतद्वारे दि. 2 जुलैपासून आयोजित रक्तदान मोहीमेच्या उपक्रमाचे कौतुक करीत मा. कुलगुरूंनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी केले... Thank you Dr. Bhale sir... #DrPDKV #VCVilasBhale #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment