At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Sunday, February 8, 2026
Saraunsh in Jalgaon Lokmat on 08 Feb, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260208_2_3&fbclid=IwY2xjawP1ctlleHRuA2FlbQIxMABicmlkETFrc0RsNDh0SGJsazdHZVJTc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHijbge9XyuP86mbpNq2BmlaQaRz7YYn4jSquH243JKrF3Sgjac4EItLx540e_aem_LeN6D7f1iIT_itwPaQK2fQ
नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान...
नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान...
जळगाव महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांचा नुकताच 'लोकमत'तर्फे सन्मान करण्यात आला. निवडणुका सरल्या, आता पक्षीय मतभेद विसरून शहराच्या विकासाची ग्वाही याप्रसंगी नवनिर्वाचितांनी दिली.
खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी, डॉ. ए. जी. भंगाळे, जिल्हा बँकेच्या संचालिका शैलजा निकम, उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, कार्यक्रमाचे सहयोगी आर. जी. गोल्डचे संचालक रामदयाल सोनी व रिगल पॅलेसचे संचालक विनोद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatEvent #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon #JMC
दिव्यांग बालकांच्या पालकांसाठी मार्गदर्शन...
31 Jan, 2026
दिव्यांग बालकांच्या पालकांसाठी मार्गदर्शन...
कुटुंबातील दिव्यांग बालकांचे पालन पोषण ही खूप अवघड बाब, संबंधित कुटुंबालाच त्यासाठीचे दिव्य ठाऊक असते. पण ही जबाबदारी पार पाडताना ती संतसेवेच्या भावनेने केली तर त्याचे ओझे वाटणार नाही, असा मोलाचा सल्ला नारायण रेकी संस्थानच्या प्रमुख मार्गदर्शिका राजेश्वरी मोदी तथा राजदीदी यांनी दिला आहे.
जळगाव येथे या संस्थेच्या पुढाकाराने व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या दिव्यांग विभागाच्या सहकार्याने अशा बालकांच्या पालकांसाठी विशेष समुपदेशनाचे सत्र आयोजिण्यात आले होते. राज दीदी व अन्य मान्यवरांसमवेत या सत्राचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्याची संधी लाभली. यानिमित्ताने दीदींशी संवादही साधता आला.
नारायण रेकी संस्थानच्या जळगाव केंद्रप्रमुख कला प्रशांतजी अग्रवाल, सुनीता दमानी, डॉ. सुरेश अग्रवाल, विनिता मंडोरा, दिनेश थोरात आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
#Rajdidi #RajeshwariModi #KiranAgrawal
Saraunsh in Jalgaon Lokmat on 01 Feb, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260201_5_1&fbclid=IwY2xjawP1b7dleHRuA2FlbQIxMABicmlkETFrc0RsNDh0SGJsazdHZVJTc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHgZWzY15BnGGPl7AO2X1a--NtTt4P8k9IkaW3IxjkQPhOG8lS7P47KnSjspA_aem_oIGP7c178jP17n_XxsiK8A
रावेरमध्ये ध्वजवंदन 2026
26 Jan, 2026
रावेरमध्ये ध्वजवंदन...
प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन यंदा रावेर येथे केले. सरदार जी जी हायस्कुलच्या प्रांगणातील मुख्य शासकीय सोहळ्यात तहसिलदार संजय तायडे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
सरदार जी जी मध्ये शिकायला होतो तेव्हा रावेरमध्ये धवजवंदन केले होते, त्यानंतर बाहेर गेलो. त्यामुळे इतक्या वर्षांनी आज मूळ गावी पुन्हा हा योग लाभला.
यावेळी पथसंंचलन व सांस्कृतिक कार्यक्रमानी देशभक्तीचा हुंकार भरला. विविध मान्यवरांचा सन्मान तसेच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे भाग्य लाभले. नगराध्यक्ष संगीता महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, स्वीकृत नगरसेवक पद्माकर महाजन, दिवंगत स्वातंत्र्य सेनानी यांच्या पत्नी शहानुरबी शेख, नायब तहसीलदार आर डी पाटील, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल तसेच डॉ. सुरेश पाटील, दिलीप कांबळे, सी एस पाटील, माऊली फाउंडेशनचे डॉ संदीप पाटील, पत्रकार स्नेही किरण चौधरी, दिलीप वैद्य आदी समवेत होते ...
#KiranAgrawal #Raver
Saraunsh in Jalgaon Lokmat on 25 Jan, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260125_3_1&fbclid=IwY2xjawP1bkJleHRuA2FlbQIxMABicmlkETFrc0RsNDh0SGJsazdHZVJTc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHiRvd5pUz7u6r2HzRgfjhdh182JFxUufqpcDqVclgX7njOSpt5HM3FuEZCY0_aem_8Va2LcvnHBjbTMd2dBPShw
लोकमत कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 2026
18 Jan, 2026
लोकमत कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा..
लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धां अनुभूती स्कूलच्या प्रशस्त मैदानावर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. यात भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजेता ठरला.
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा संघ उपविजेता, तर किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल संघ तृतीय विजेता ठरला.
या संघांना पारितोषिक वितरण प्रसंगी रविंद्र धर्माधिकारी समवेत होते.
#LokmatJalgaon #LokmatEvent #LokmatCampusClub #KiranAgrawalLokmatJalgaon
एक्सलंट टीचर्स अवॉर्ड्स 2025
18 Jan, 2026
एक्सलंट टीचर्स अवॉर्ड्स 2025
जळगाव व धुळे जिल्ह्यात ज्ञानदानाच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण सेवा बजावून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी झटणाऱ्या शिक्षकांचा लोकमत एक्सलेंट टीचर्स अवॉर्ड्स देऊन सन्मान करण्यात आला.
खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोरआप्पा पाटील, प्रख्यात सिने अभिनेत्री किशोरीताई शहाणे, खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, एल. एच. पाटील स्कुलचे संचालक जितेंद्र पाटील व लोकमतचे उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यावेळी
समवेत होते.
#LokmatJalgaon #LokmatEvent #LokmatJalgaonEvent #LokmatExcellentTeachersAward #KiranAgrawalLokmatJalgaon
'केसीई' सोसायटीचा क्रीडा महोत्सव 2026
17 Jan, 2026
'केसीई' सोसायटीचा क्रीडा महोत्सव..
जळगाव जिल्ह्यातील सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारी संस्था म्हणजे खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी. प्रज्ञावंत नंदूदादा बेंडाळे यांच्या अथक परिश्रमातून वाटचाल करणाऱ्या या संस्थेत परीक्षेत पास होणाऱ्या शिक्षणासोबतच मन व मनगट मजबूत करणारे उपक्रमही आवर्जून राबविले जातात. अध्यात्म व क्रीडा असा मेळ साधला जातो.
या संस्थेच्या यंदाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. 12 क्रीडा प्रकारातील स्पर्धा तीन दिवस होत आहेत. विविध संघांचे शानदार पथसंचलन व सांस्कृतिक कार्यक्रमात क्रीडा ज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचे उद्घाटन झाले.
सोसायटीचे अध्यक्ष संजय प्रभूदेसाई, डी टी पाटील, शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ भारंबे, प्रा बी व्ही पवार, प्रा विश्वनाथ झोपे, डेव्हिड दास, धनश्री फालक आदि यावेळी समवेत होते
#KCESocity #KiranAgrawal
Saraunsh in Jalgaon Lokmat on 18 Jan, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260118_4_1&fbclid=IwY2xjawP1ZeVleHRuA2FlbQIxMABicmlkETFrc0RsNDh0SGJsazdHZVJTc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHijbge9XyuP86mbpNq2BmlaQaRz7YYn4jSquH243JKrF3Sgjac4EItLx540e_aem_LeN6D7f1iIT_itwPaQK2fQ
लोकमत शौर्य पुरस्कार 2026
13 Jan, 2026
लोकमत शौर्य पुरस्कार...
कायदा व सुव्यवस्था राखून समाजाचे स्वास्थ्य जपण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या जळगाव जिल्हा पोलीस दलातील शूर बांधवांचा लोकमत शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
विविध गुन्ह्यांची तड लावून ते उघडकीस आणण्यापासून ते आरोपीस अटक करून न्यायालयापुढे उभे करण्यापर्यंत परिश्रम घेतलेल्या तसेच यापूर्वी गडचिरोली, गोंदिया आदी भागात सेवा देऊन विशेष कामगिरी बजावलेल्यांचा यात समावेश होता.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह प्रायोजक त्रिमूर्ती फाउंडेशनचे मनोज पाटील व डंबेलकर क्लासेसचे अमित डंबेलकर याप्रसंगी उपस्थित होते.
#LokmatJalgaon #LokmatShouryaPuraskar #LokmatJalgaonEvent #LokmatEvent
ोकमत भवन जळगावच्या हिरवळीवर पतंगोत्सव 2026
14 Jan, 2026
सहकारींसमवेत लोकमत भवन जळगावच्या हिरवळीवर पतंगोत्सव ..
मकर संक्रांतीच्या स्निग्ध शुभेच्छा... Kiran Agrawal
#MakarSankrant #LokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 11 Jan, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260111_2_1&fbclid=IwY2xjawP1Yp5leHRuA2FlbQIxMABicmlkETFrc0RsNDh0SGJsazdHZVJTc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHh41gpE-LX3q842qSCv_VMlCtoRC5hhUfLCcM3ZwlQpfkqFvATtO7DTkmSj9_aem_Ow9FBL5TQYRXE5GusbZS-g
'लोकमत'तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सन्मान...
04 Jan, 2026
'लोकमत'तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सन्मान...
थेट लोकांनी निवडून दिलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा 'लोकमत'तर्फे हृदय सन्मान करण्यात आला, यानिमित्त जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष प्रथमच एका व्यासपीठावर एकवटले.
लोकमत भवनच्या हिरवळीवर झालेल्या या सोहळ्याची संकल्पना खरे तर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा यांची. लोक 'मता'चे प्रतिनिधित्व म्हणून नवनिर्वाचितांचा सन्मान करून शुभेच्छा देतानाच त्यांच्या वाटचालीला उपयोगी ठरेल असे दिशादर्शन करण्याची 'लोकमत'ची भूमिका म्हणून हा सोहळा घेतला गेला आणि आनंद याचा, की सर्वांचाच त्यास अतिशय सकारात्मक प्रतिसाद लाभला.
रस्ते,पाणी, गटार, दिवाबत्ती अशी नित्याची कामे होतच राहणार. त्यासाठी त्या त्या ठिकाणचे प्रशासन कर्तव्यदत्त भावनेतून काम करतच असते, परंतु त्या पलीकडे जाऊन वेगळे व पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहील असे काही काम आपल्या कारकिर्दीत करून ठेवण्याची अपेक्षा यावेळी बोलून दाखविली.
नगरपालिकांच्या निवडणुका सरल्या. आता राजकारण नको. पक्षीय चौकटींचा विचार न करता संपूर्ण शहराचे प्रथम नागरिक म्हणून सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याची अपेक्षा आवर्जून मांडली.
जळगाव जिल्ह्यात नवनिर्वाचित नगराध्यक्षांमध्ये भगिनींची संख्या मोठी आहे, त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीच्या या लेकींसह सर्वांचा सन्मान सावित्रीचीच लेक खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते केला गेला.
#LokmatJalgaon #LokmatEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Jalgaon Lokmat on 04 Jan, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260104_4_1&fbclid=IwY2xjawP1YJ9leHRuA2FlbQIxMABicmlkETFrc0RsNDh0SGJsazdHZVJTc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHh41gpE-LX3q842qSCv_VMlCtoRC5hhUfLCcM3ZwlQpfkqFvATtO7DTkmSj9_aem_Ow9FBL5TQYRXE5GusbZS-g
नूतन वर्षाभिनंदन 2026...
नूतन वर्षाभिनंदन 2026...
बघता बघता 2025 हे वर्षही सरले.
अनेक कटू गोड आठवणी ठेवून ते गेले. अनेक चांगल्या बाबी घडल्या, काही बिघडल्याही.
चांगले ते सोबत घेऊया, जे बिघडले त्यातून शिकूया.
महत्त्वाचे म्हणजे, मानवी बुद्धीवर आक्रमण करणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा काळ आला आहे. यात सावधपणे वाटचाल करावी लागणार आहे.
डिजिटलायझेशन वाढून गेले आहे, सर्वांचा स्क्रीन टाईमही वाढला आहे. ते गरजेचे असले, तरी त्याचा अनावश्यक वापर व अतिरेक टाळायला हवा.
व्हर्चुअलिटी वाढलेल्या या काळात यंत्रावरचा विश्वास वाढला, पण माणसाचा माणसावरील विश्वास कमी होत चालला आहे. 'आभासी' दुनियेत आपण सारे वावरत आहोत.
कुणीतरी खूप छान म्हटले आहे,
कभी पड़ोसी भी घर का हिस्सा हुआ करते थे...
आज एक ही घर में ना जाने कितने पड़ोसी हैं ।।
आपण घरात असून घरच्यांशी संवाद हरवून बसलो आहोत. अबोला वाढीस लागला आहे. 'स्व'मग्नता ओढविली आहे.
पूर्वी पोस्ट कार्डावरील शब्दांनी भावनांचे आदान प्रदान होऊन जाई, मन गलबलून येई; आता तासनतास मोबाईलला बिलगुनही आणि व्हाट्सअप व्हिडीओ कॉल करूनही ती 'ओल' काही जाणवत नाही.
नवीन वर्षात पाऊल ठेवून त्याचे स्वागत करताना हा 'दुरावा' कमी करण्याचा प्रयत्न करूया, मनातून डोळ्यात उतरणारी ती ओल जपुया...
संवेदना ही आपल्या जगण्याची प्रेरणा आहे. मानवी मूल्याचा तो अतूट धागा आहे. AIचे भूत मानगुटीवर असले तरी मानवी बुद्धिमत्ता व संवेदनांना ते हरवू , बायपास करू शकणार नाही.
नववर्षातच नव्हे, आगामी काळात या संवेदना जपूया, माणूस होऊया...
नव्या विश्वासाने, उमेदीने व आश्वासकतेने मांगल्याचे तोरण बांधत, प्रसन्नतेने नववर्ष 2026चे स्वागत करूया....
Happy New Year मित्रांनो Kiran Agrawal
#KiranAgrawal
Subscribe to:
Comments (Atom)








































