At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Sunday, February 8, 2026
'लोकमत'तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सन्मान...
04 Jan, 2026
'लोकमत'तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सन्मान...
थेट लोकांनी निवडून दिलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा 'लोकमत'तर्फे हृदय सन्मान करण्यात आला, यानिमित्त जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष प्रथमच एका व्यासपीठावर एकवटले.
लोकमत भवनच्या हिरवळीवर झालेल्या या सोहळ्याची संकल्पना खरे तर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा यांची. लोक 'मता'चे प्रतिनिधित्व म्हणून नवनिर्वाचितांचा सन्मान करून शुभेच्छा देतानाच त्यांच्या वाटचालीला उपयोगी ठरेल असे दिशादर्शन करण्याची 'लोकमत'ची भूमिका म्हणून हा सोहळा घेतला गेला आणि आनंद याचा, की सर्वांचाच त्यास अतिशय सकारात्मक प्रतिसाद लाभला.
रस्ते,पाणी, गटार, दिवाबत्ती अशी नित्याची कामे होतच राहणार. त्यासाठी त्या त्या ठिकाणचे प्रशासन कर्तव्यदत्त भावनेतून काम करतच असते, परंतु त्या पलीकडे जाऊन वेगळे व पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहील असे काही काम आपल्या कारकिर्दीत करून ठेवण्याची अपेक्षा यावेळी बोलून दाखविली.
नगरपालिकांच्या निवडणुका सरल्या. आता राजकारण नको. पक्षीय चौकटींचा विचार न करता संपूर्ण शहराचे प्रथम नागरिक म्हणून सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याची अपेक्षा आवर्जून मांडली.
जळगाव जिल्ह्यात नवनिर्वाचित नगराध्यक्षांमध्ये भगिनींची संख्या मोठी आहे, त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीच्या या लेकींसह सर्वांचा सन्मान सावित्रीचीच लेक खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते केला गेला.
#LokmatJalgaon #LokmatEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment